agriculture news in marathi, loan waiver scheme status, pune, maharashtra | Agrowon

कर्जमाफीची हवा, दुष्काळाने वसुली थंडावणार
टीम अॅग्रोवन
शनिवार, 12 जानेवारी 2019

शेतीशी निगडित कर्ज वसुलीचे महत्त्व यंदा सभासदांना कळकळीने समजावून सांगण्याचे आव्हान बॅंकांना पेलावे लागेल. सातारा जिल्हा बॅंक तालुकानिहाय मेळावे घेते व त्याला शेतकरीही प्रतिसाद देत असतात. वसुली कोलमडल्यास पुढे बॅंकाही अडचणीत येतात. त्यामुळे राज्यातील सर्व बॅंकांना यंदा अतिशय दक्ष राहून वसुली व वाटपाचा समतोल साधावा लागेल. कारण वसुली व वाटप एकाच नाण्याच्या बाजू आहेत.
 - डॉ. राजेंद्र सरकाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा जिल्हा सहकारी बॅंक

पुणे : निवडणुकांच्या तोंडावर संपूर्ण कर्जमाफीच्या चर्चेचा उठलेला धुराळा आणि त्यात पुन्हा दुष्काळामुळे पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतीशी निगडित कर्ज वसुलीचे नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे. 

‘‘जून २०१७ मध्ये राज्यात सहकारी बॅंकांची १८ हजार कोटीची वसुली ठप्प झाली होती. सध्याची स्थिती बघता काही पिकांची कर्जवसुली मार्चमध्ये तर काही पिकांची जूनअखेरपर्यंत केली जाते. त्यात पुन्हा दुष्काळामुळे काही भागात पुनर्गठनाची सवलत द्यावी लागणार आहे. त्यामुळेच यंदा किती प्रमाणात वसुलीवर परिणाम होईल याचा अंदाज आताच बांधता येत नाही,’’ अशी माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली. 

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचा जोरदार मुद्दा केंद्रीय पातळीवर कॉंग्रेसने लावून धरला आहे. ‘‘कर्जमाफी केल्याशिवाय झोपू देणार नाही, अशी घोषणा कॉंग्रेसचे प्रमुख नेते राहुल गांधी यांनी केल्यानंतर गावोगावी शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. त्याचा परिणाम निश्चित कर्जाच्या वसुलीवर होणार आहे. केंद्रातील निवडणुकांचे रागरंग व घोषणाबाजीचा अंदाज घेतल्याशिवाय शेतकरी यंदा परतफेड करणार नाहीत,’’ अशी माहिती जिल्हा बॅंकेच्या एका कार्यकारी संचालकाने दिली. 

राज्यातदेखील निवडणुकीच्या तोंडावर कर्जमाफी योजनेत मोठा बदल राज्य सरकार करेल, अशी चर्चा होत आहे. याबाबत राज्य बॅंकर्स समितीच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की,‘‘निवडणुका आणि दुष्काळ या दोन्ही घटकांचा परिणाम १०० टक्के कर्जवसुलीवर यंदा होईल. मुळात कर्जवाटपदेखील निम्म्याने घटले आहे. त्यामुळे वाटलेली कर्जे पुन्हा पूर्णतः वसूल होतील याची खात्री एकाही बॅंकेला नाही.’’

बॅंकांची वसुली यंदा कमी होणार असल्यामुळे केंद्र व राज्य सरकारला कृषी बॅंकिंग व्यवस्थेचा गांभीर्याने विचार करावा लागेल. बॅंकांना सावरण्यासाठी निवडणुकांपूर्वीच ठोस उपाय करावे लागतील, असे बॅंकांना वाटते. 

‘‘राज्य सरकारने यंदा कर्जमाफी तात्काळ करण्याची गरज होती. मात्र, अनेक निकष आणि सातत्याने कर्जमाफी योजनेची मुदत वाढविल्याने त्याचा अनिष्ठ परिणाम बॅंकिंग व्यवस्थेवर झाला आहे. त्यात पुन्हा केंद्रातदेखील कर्जमाफीचा मुद्दा राजकीय बनवून विरोधकांनीही चूक केली आहे,’’ असे मत कृषी पत पुरवठा व्यवस्थेतील एका ज्येष्ठ तज्ज्ञाने व्यक्त केले.
 

इतर अॅग्रो विशेष
मक्यावरील लष्करी अळीचे एकात्मिक नियंत्रणमहाराष्ट्रात फॉल आर्मी वर्म (स्पोडोप्टेरा...
राज्य अर्थसंकल्प : सर्वसमावेशक ‘निवडणूक...मुंबई : राज्यात मोसमी पाऊस लांबला असला तरी आगामी...
‘सबसरफेस ड्रीप’ तंत्राने  ऊस, टोमॅटोची...शेततळ्यातले जेमतेम पाणी आणि उपलब्ध पाण्याचा योग्य...
कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजपुणे   : राज्यातील मॉन्सूनचे आगमन...
जुनीच वाट की नवी दिशाप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ...
कोरड्या महाराष्ट्रावर घोषणांचा पाऊसराज्यात सत्तेत आल्यानंतर शेतीतील गुंतवणूक वाढविली...
लोकसहभागातून नागरी पर्जन्यजल संधारण शक्यप्रत्येक जलस्रोताचे पुनर्भरण करून त्याचं बळकटीकरण...
बोंडअळी निर्मूलन प्रकल्पात आठ राज्यांचा...नागपूर : देशात सर्वात आधी गुजरात त्यानंतर...
लांबलेला पाऊस आणि नियोजनशून्य कारभारजूनचा पहिला पंधरवाडा उलटून गेला तरी राज्यात...
पर्यावरणकेंद्री विकास ही जगाची गरच आजमितीला भारत व जगाला भेडसावणारी अव्वल समस्या आहे...
कृषी विकास दराची मोठी बुडीमुंबई  ः देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर...
कर्नाटकी बेंदराच्या निमित्ताने आज ...कोल्हापूर  : राज्यातील कर्नाटक सीमेलगतच्या...
उत्कृष्ट संत्रा व्यवस्थापनाचा युवा...वयाच्या विसाव्या वर्षीच शेतीत उतरलेल्या ऋषीकेश...
मॉन्सूनचे प्रवाह अजूनही मंदचपुणे  : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाजपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळ निवळल्यानंतर...
एफआरपी द्या, काटामारी रोखा : बच्चू...पुणे :  राज्यातील ऊस उत्पादक...
‘जीएम’चा तिढामहिनाभरापूर्वी हरियाना राज्यात एका शेतकऱ्याच्या...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारापुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने...
करारावरील अश्‍वगंधा लागवड ठरली डोकेदुखीगडचिरोली ः अश्‍वगंधा लागवड आणि खरेदीचा करार करीत...