सांगलीतील एक लाखांवर शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ

कर्जमाफी योजना
कर्जमाफी योजना
सांगली  ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील एक लाख ३३ हजार ५१९ शेतकऱ्यांची नावे आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या सात हिरव्या यादीमध्ये आली आहेत. त्यापैकी एक लाख ११ हजार ३२१ शेतकऱ्यांच्या खात्यावर २५१ कोटी ५१ लाख ४७ हजार रुपये वर्ग करण्यात आले आहेत. मात्र, उर्वरित शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ कधी मिळणार, असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.
 
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील ५ लाख ५० हजार शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी सुमारे १ लाख ८३ हजार शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज दाखल केले. उर्वरितमध्ये काही जणांनी ऑफलाइन अर्ज भरले आहेत. कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान आणि ओटीएससाठी मिळून ३०० कोटी ९ लाख रुपये जिल्ह्याला जाहीर झाले आहेत.
 
योजनेंतर्गत एक लाख ३३ हजार ५१९ शेतकऱ्यांची नावे आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या सात हिरव्या यादीमध्ये आली आहेत. त्यापैकी एक लाख ११ हजार ३२१ शेतकऱ्यांच्या खात्यावर २५१ कोटी ५१ लाख ४७ हजार रुपये वर्ग करण्यात आले. याचाय अर्थ हिरव्या यादीतील अद्यापही२२ हजार ९१८ शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. 

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत अर्ज दाखल करण्याची मुदतवाढ मिळत आहे. याचा फायदा होत आहे. यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज केले. त्यांची नावे हिरव्या यादीत आली. मात्र त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही, याचा अर्थ असा की, जिल्हा बॅंकेकडून याबाबतची प्रक्रिया संथगतीने सुरू असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com