कर्जमाफीतील खोटी माहिती आली अंगलट...

कर्जमाफीतील खोटी माहिती आली अंगलट...
कर्जमाफीतील खोटी माहिती आली अंगलट...

कोल्हापूर ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत खोटी माहिती सादर करून कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या सुमारे ६७२ लाभार्थ्यांना शासनाने झटका दिला आहे. या लाभार्थ्यांचे इतर उत्पन्नाचे स्रोत असल्याचे उघड झाल्याने यांची कर्जमाफी मागी घेतली जाणार आहे. या शेतकऱ्यांना दिलेले १ कोटी २६ लाख ९१ हजार ८१० रुपये वसूल करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.  राज्य सरकारने शेतकऱ्यांना कृषी कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. ही कर्जमाफी देत असताना बऱ्याच अटी व शर्ती घातल्या होत्या. शासकीय नोकर, लोकप्रतिनिधी, आयकर भरणारे, इतर उत्पन्नाची साधने असणाऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार नसल्याचे शासनाने जाहीर केले होते. संबंधित व्यक्‍तींनी कर्जमाफीचे फॉर्मही न भरण्याच्या सूचना केल्या होत्या, तरीही एवढ्या मोठ्या संख्येत आपलाही अर्ज खपून जाईल, या आशेने अनेकांनी अर्ज भरले; मात्र कर्जमाफीची सर्व माहिती ऑनलाईन भरल्याने या लबाड लाभार्थ्यांची माहिती उघड झाली. जिल्ह्यात ६७२ लाभार्थ्यांनी चुकीची माहिती भरल्याचे उघड झाले. यात राधानगरी, कागल, चंदगड तालुक्‍यांतील लाभार्थ्यांची सर्वाधिक आहे. लाभार्थ्यांकडून ही कर्जमाफीची रक्‍कम वसूल केली जाणार आहे. जिल्हा बॅंकेप्रमाणेच राष्ट्रीयीकृत बॅंकांनाही अशा लाभार्थ्यांची यादी आली असून, वसुलीस सुरवात झाली आहे. तालुकानिहाय अपात्र लाभार्थी संख्या व कंसात परत जाणारी कर्जमाफीची रक्‍कम. आजरा ४३ (८ लाख १ हजार ९२१), भुदरगड ६३ (१० लाख ४२ हजार ४९५), चंदगड ८० (१५ लाख ३४ हजार ६५७), गडहिंग्लज ६८ (१२ लाख ५२हजार ९८५), गगनबावडा ११ (३ लाख ६ हजार २०४), हातकणंगले ३१ (५ लाख २९ हजार १२८), कागल ७८ (१४ लाख ५६हजार २३१), करवीर पूर्व ३८ (५ लाख ९६हजार ७०९), करवीर पश्‍चिम ५७ (१० लाख १ हजार ९०९), पन्हाळा ५३ (९ लाख ७९ हजार ९३८), राधानगरी ८१ (१५ लाख ३८ हजार ३७०), शाहूवाडी ३८ (९ लाख ५० हजार ९०) आणि शिरोळ ३१ (७ लाख १६८).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com