गडचिरोलीत १८३ कर्जमाफी अर्जांवर आक्षेप
विनोद इंगोले
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017
गडचिरोली : जिल्ह्यात कर्जमाफी अर्जांच्या चावडी वाचनादरम्यान १८३ अर्जांवर आक्षेप घेण्यात आले. यानंतर आता तालुकास्तरावर आक्षेप नोंदविता येणार आहेत. दरम्यान काही शेतकऱ्यांच्या नावाचा यादीत समावेश नसल्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
 
कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सक्‍तीची करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हाभरात ६५ हजार ६४९ शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे अर्ज भरले. 
गडचिरोली : जिल्ह्यात कर्जमाफी अर्जांच्या चावडी वाचनादरम्यान १८३ अर्जांवर आक्षेप घेण्यात आले. यानंतर आता तालुकास्तरावर आक्षेप नोंदविता येणार आहेत. दरम्यान काही शेतकऱ्यांच्या नावाचा यादीत समावेश नसल्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
 
कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सक्‍तीची करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हाभरात ६५ हजार ६४९ शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे अर्ज भरले. 
शासकीय कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांना कर्जमाफी मिळणार नसल्याचे जाहीर केल्यानंतरही काही शासकीय कर्मचाऱ्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज केले. चावडी वाचनादरम्यान गावातील नागरिकांनी संबंधीतांच्या अर्जावर आक्षेप घेतले.
 
२९ सप्टेंबर ते ७ ऑक्‍टोबर या कालावधीत गावपातळीवर चावडी वाचन घेण्यात आले. यामध्ये १८३ अर्जांवर नागरिकांनी आक्षेप घेऊन सदर अर्ज रद्द करण्याची मागणी केली आहे. काही शेतकऱ्यांनी मात्र अर्ज केल्यानंतरही त्यांचे नाव यादीत नसल्याचा खुलासा झाला. अशा शेतकऱ्यांना तहसीलदारांकडे केलेल्या अर्जाची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
 
सरकारने पुन्हा नवीन सॉफ्टवेअर तयार करून त्यामध्ये शेतकऱ्यांची तीन गटात विभागणी केली आहे. यातील हिरव्या रंगाची यादी पात्र लाभार्थ्यांची राहील. पिवळ्या रंगाच्या यादीमध्ये तात्पुरत्या स्वरुपात अपात्र ठरविलेल्या शेतकऱ्यांचा समावेश राहील. लाल रंगाच्या यादीत कायमस्वरुपी रद्द केलेल्या शेतकऱ्यांच्या नावाचा समावेश असेल. जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायतींची निवडणूक असल्याने आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींमध्ये चावडी वाचन झाले नाही. 
 
 

तालुका व आक्षेप संख्या

भामरागड ११
सिरोंचा २५
देसाईगंज १७
कोरची २५
अहेरी    ०२
गडचिरोली ४९
आरमोरी १५
चामोर्शी २२
मुलचेरा ०३
एटापल्ली ०५
कुरखेडा ०१
धानोरा ०८

इतर ताज्या घडामोडी
नागपुरात सोयाबीन प्रतिक्‍विंटल २७५०...नागपूर ः बाजारात सोयाबीनच्या दरात होणाऱ्या किरकोळ...
केवळ अमळनेरलाच कडधान्य खरेदी केंद्र सुरू जळगाव  ः जिल्ह्यात मंगळवारपर्यंत (ता. १७)...
परभणीत प्रतिक्विंटल टोमॅटो १२०० ते १८००...परभणी ः येथील कृषी उत्पन्न बाजार...
आयुर्वेदिक रेसिपींच्या आस्वादासाठी...पुणे ः आयुर्वेदात उल्लेख असलेल्या...
परभणी जिल्ह्यात कृषी विभागातील ३१ टक्के...परभणी ः परभणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी...
वाटाणा लागवड कधी करावी?वाटाणा लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगल्या...
नागपूर ३६.४ अंशांवरपुणे : राज्यातील काही भागांत कमाल तापमानात वाढ...
कोल्हापुरात भाजीपाल्याचे दर वधारलेकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
जळगावात उडदाची आवक घटलीजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवड्यात...
नाशिकला टोमॅटोची आवक निम्म्याने घटलीनाशिक : नाशिक जिल्ह्यात ऑक्‍टोबरच्या पहिल्या...
उत्पादकता घटल्याने फूल मार्केटमध्ये...नागपूर : परतीच्या पावसाचा फटका बसल्याने या वर्षी...
मंचर बाजार समितीत कटतीद्वारे लूटपुणे : पालेभाज्यांसाठी आणि विशेषतः काेथिंबीरीसाठी...
नांदेड विभागात ३३ कारखान्यांच्या...परभणी : नांदेड विभागातील ५ जिल्ह्यांतील ३३ साखर...
समृद्धी महामार्गाच्या विरोधाची धार...घोटी, जि. नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
तापमान पुन्हा वाढू लागलेपुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांशी...
कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पाटण, जि. सातारा ः कोयना धरण पाणलोट क्षेत्रात...
सांगलीत ज्वारीच्या कणसांना दाणेच आले... सांगली : कृषी विभागाने शेतकऱ्यांना वाटप...
केळीवरील करपा निर्मूलनासाठी अनुदान... जळगाव : केळी पिकावर सातत्याने करप्याचा...
परतीच्या पावसाने रब्बी पेरणीचा खोळंबा परभणी : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...
शिरूर तालुक्यातील पिकांचे पावसामुळे... रांजणगाव सांडस, जि. पुणे : शिरूर तालुक्यातील...