agriculture news in marathi, loan waivers list reading in gramsabha, jalgaon,maharashtra | Agrowon

धुळे, जळगाव जिल्ह्यात कर्जमाफी अर्जांबाबत चावडीवाचन
चंद्रकांत जाधव
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017
किती अर्ज पात्र व किती अपात्र ठरले, हे तालुका कमिटीच्या कार्यवाहीनंतर समोर येईल. या प्रक्रियेला आणखी तीन ते चार दिवस लागू शकतील. कर्जमाफीसंबंधी बॅंकांनी सादर केलेली माहिती व जिल्हा कमिटीचा अंतिम अहवाल यासंबंधीचा विचार करून शासन कार्यवाही करील. 
- जे. के. ठाकूर, जिल्हा उपनिबंधक, धुळे. 
जळगाव : ‘छत्रपती शिवाजी शेतकरी सन्मान’ योजनेंतर्गत कर्जमाफीसंबंधी शेतकऱ्यांनी भरलेल्या अर्जांबाबतचे चावडीवाचन धुळे व जळगाव जिल्ह्यातील १४४९ ग्रामपंचायातींत सोमवारी (ता.२) पूर्ण झाले. यात किती आक्षेप आले, किती शेतकरी अर्ज भरू शकले नाहीत याची माहिती आज (मंगळवारी, ता.३) प्राप्त होईल. निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने जळगाव जिल्ह्यातील १३८ आणि धुळे जिल्ह्यातील ११० ग्रामपंचायतींमध्ये कर्जमाफीच्या अर्जांबाबतचे वाचन झाले नाही. 
 
चावडीवाचन या संकल्पनेंतर्गत महात्मा गांधी जयंती व ग्रामसभेचे औचित्य साधून ग्रामपंचायतींच्या कार्यालयातच सोमवारी कर्जमाफीसाठीच्या अर्जांचे वाचन झाले. ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायकांच्या उपस्थितीत हे वाचन झाले. अनेक ठिकाणी राष्ट्रीयीकृत बॅंका, जिल्हा बॅंकेचे काही अधिकारी, कर्मचारीदेखील ग्रामपंचायतींमध्ये उपस्थित होते. १ ते ८ नमुन्यांमध्ये हे वाचन झाले. या नमुन्यांच्या आधारे शासकीय कर्मचाऱ्यांना आपला अहवाल तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील तालुका कमिटीकडे दाखल करायचे आहेत.
 
अर्जांचे वाचन करताना शेतकऱ्यांनी भरलेला अर्ज, त्यांचे कर्ज, नाव याबाबत वाचन झाले. कोण वंचित राहिले का, याबाबतची विचारणा शासकीय कर्मचाऱ्यांनी ग्रामसभेत केली. जळगाव जिल्ह्यात १०३९; तर धुळे जिल्ह्यात ४१० ग्रामपंचायतींमध्ये कर्जमाफीच्या अर्जांचे चावडीवाचन झाले. 

तालुका कमिटीला आपला अहवाल तीन दिवसांत तयार करायचा आहे. तालुका कमिट्या जिल्हा कमिटीकडे येत्या शुक्रवारपर्यंत (ता.६) आपला अहवाल सादर करतील. त्यात पात्र व अपात्र अर्जांबाबतचे स्पष्ट उल्लेख असतील. १ ते ६६ या नमुन्याअंतर्गत ही कमिटी कार्यवाही करील. शासनाकडे येत्या आठवड्यापर्यंत जिल्हा कमिटी आपला अहवाल देईल. निवडणुकीमुळे चावडीवाचन न झालेल्या ग्रामपंचायती किंवा गावांमध्ये जळगाव जिल्ह्यात १० ऑक्‍टोबरनंतर; तर धुळे जिल्ह्यात १६ ऑक्‍टोबरनंतर वाचन होईल, अशी माहिती मिळाली.

इतर ताज्या घडामोडी
चोपडा, जळगावातून केळीचा पुरवठा वाढलाजळगाव ः जिल्ह्यात मागील आठवड्यात केळीच्या दरात...
नगरमध्ये मूग ५७६० रुपये प्रतिक्विंटलनगर ः खरिपातील मुगाचे पीक हाती आले असल्याने नगर...
केळी पीक सल्लासद्यःस्थितीत नवीन मृगबागेची केळी प्राथमिक...
सोलापुरात भाज्या वधारल्या सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हळद पिकातील कीड नियंत्रणसध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...
कर्बोदके, प्रथिनांचा उत्तम स्राेत ः...प्रथिनांसाठी कडधान्य हे समीकरण जसे सर्वश्रुत आहे...
नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पाऊसनाशिक : दुष्काळाच्या सावटाखाली सापडलेल्या मालेगाव...
इजिप्तमध्ये आढळले सर्वात जुने चीजचीज जितके जुने, तितके अधिक चांगले असे समजले जाते...
खनिज तेल उत्पादनासाठी पाणी खराब...अमेरिकेतील नैसर्गिक वायू आणि तेल उत्पादक...
निवडून येण्याची क्षमता असलेल्या...पुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात उमेदवार...
पुणे जिल्हा बॅंकेकडून ६४ टक्के पीककर्ज...पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने एक...
समविचारी पक्षांशी युती करून निवडणूक...भंडारा  ः केंद्र आणि राज्यातील सरकारकडून...
मराठा आरक्षणासाठी पुण्यात चक्री उपोषण...पुणे : मराठा समाजास आरक्षण मिळावे, आंदोलनादरम्यान...
अतिवृष्टीचा अकोला जिल्ह्यात ३०००...अकोला : गेल्या अाठवड्यात झालेल्या अतिवृष्टीचा...
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा...सातारा   ः कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
अकोला, वाशीममधील प्रकल्पांतील...अकोला  : कमी पावसामुळे प्रकल्पांमधील...
अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात पाऊस...नगर   ः जिल्ह्यामधील अकोले तालुक्‍याच्या पश्...
पुणे बाजारात २२५ ट्रक भाजीपाल्याची आवकपुणे ः राज्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे...
पुणे, साताऱ्यातील १५ गावे, ७५...पुणे  : पुणे व सातारा जिल्ह्यांच्या पश्‍चिम...
अौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा...औरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील...