agriculture news in marathi, loan waivers name reading start, parbhani, maharashtra | Agrowon

परभणीत शेतकरी याद्यांचे चावडीवाचन सुरू
माणिक रासवे
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017
परभणी ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज केलेल्या शेतकरी याद्यांच्या चावडीवाचनास रविवारपासून (ता. १) सुरवात झाली. रविवारी (ता. १) परभणी जिल्ह्यातील १७५ ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करून चावडीवाचन करण्यात आले असून, आज (सोमवारी, ता. २) उर्वरित ग्रामपंचायींमध्ये चावडीवाचन केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) गणेश पुरी यांनी दिली.
 
परभणी ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज केलेल्या शेतकरी याद्यांच्या चावडीवाचनास रविवारपासून (ता. १) सुरवात झाली. रविवारी (ता. १) परभणी जिल्ह्यातील १७५ ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करून चावडीवाचन करण्यात आले असून, आज (सोमवारी, ता. २) उर्वरित ग्रामपंचायींमध्ये चावडीवाचन केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) गणेश पुरी यांनी दिली.
 
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील ३ लाख ३४ हजार २४५ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे. अर्जदार शेतकऱ्यांपैकी कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची पडताळणी करण्याकरिता गावोगावी विशेष ग्रामसभांचे आयोजन करून याद्याचे चावडीवाचन केले जात आहे. ग्रामसेवक, कृषी सहायक, तलाठी, गट सचिव आदी कर्मचारी याद्याचे वाचन करत आहेत. या ग्रामसभांना शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत.
 
ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कर्जमाफीसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या लावण्यात आल्या आहेत. रविवारी (ता. १) झरी (ता. परभणी) येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आयोजित विशेष ग्रामसभेत जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) गणेश पुरी यांनी कर्जमाफीच्या यादीचे चावडीवाचन केले. या वेळी जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक राम खरटमल, बालाजी देशमुख आदी उपस्थित होते.
 
दरम्यान, जिल्ह्यातील ७०३ ग्रामपंचायतींपैकी निवडणूक असलेल्या ग्रामपंचायती वगळून रविवारीपर्यंत १७५ ग्रामपंचायतींमध्ये कर्जमाफी याद्यांचे चावडीवाचन करण्यात आले. उर्वरित ग्रामपंचायतीमध्ये सोमवारी (ता. २) महात्मा गांधी जयंतीनिमित्त आयोजित विशेष ग्रामसभांमध्ये कर्जमाफी यांद्याचे चावडीवाचन केले जाणार आहे, असे जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
खासदार सुप्रिया सुळे यांना नागपुरात अटक...नागपूर : राज्यातील झोपी गेलेल्या सरकारला जागे...
देशातील रब्बी पेरणी माघारलीनवी दिल्ली  : देशभरात शुक्रवारअखेर (ता. ८)...
कुपोषण, प्रथिने जागृतीकडे लक्ष...पुणे : भारतात प्रथिनांच्या कमततेअभावी होणाऱ्या...
‘त्या’ कंपनीला काळ्या यादीत टाका :...लातूर ः येथील शासनाच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर...
रेशन धान्य दुकानदारांनी ई-पॉस मशिन...वडूज, जि. सातारा : रेशन घेण्यास आलेल्या...
भारनियमनामुळे शेती ऑफलाइननांदुरा, जि. बुलढाणा : शासनाने सर्व योजनांचे...
दूध संघांना अनुदान द्या : अरुण नरकेपुणे ः राज्य सरकारने दुधाला २७ रुपये प्रतिलिटरचा...
पुण्यात पालेभाज्यांची आवक टिकून; दर...पुणे : मार्केट यार्ड येथील भाजीपाला बाजारात सलग...
साहित्य संमेलनाध्यक्षपदी लक्ष्मीकांत...नागपूर : बडोदा येथे फेब्रुवारीत होणाऱ्या 91 व्या...
नरभक्षक बिबट्याला अखेर ठार मारलेमेहुणबारे/ पिलखोड/ चाळीसगाव : गिरणा परिसरात...
सरसकट कर्जमाफीसाठी होणार जेल भरो औरंगाबाद  ः शेतकरी, शेतमजूर, शेतीपूरक...
उद्धव ठाकरे गप्प बसा; अन्यथा रहस्ये...सांगली ः शिवसेना सोडण्याचे कारण उद्धव ठाकरे आहेत...
गिरणा धरणातून पहिले आवर्तन सोडलेचाळीसगाव :  गिरणा धरणातून सिंचनासाठीचे पहिले...
पीक नुकसानीचे दहा दिवसांत पंचनामे...औरंगाबाद : कापूस व धान पिकाच्या झालेल्या...
दक्षिण गुजरात, सौराष्ट्राचा कौल मतपेटीत...अहमदाबाद, गुजरात : येथील विधानसभेच्या पहिल्या...
रोहित्र दुरुस्तीचा विलंब भोवला; भरपाई...अकोला :  वीज रोहित्राची वेळेवर दुरुस्ती न...
व्यावसायिक कल्चरमुळे वाढते...खाद्यपदार्थ किण्वनातील जिवाणूंचा झाला अभ्यास...
बोगस बियाणे निर्मितीच्या संशयावरून...बुलडाणा : नांदुरा तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर...
कृषि सल्ला : पालेभाज्या, फळभाज्याडिसेंबर महिन्यात बहुतांश पालेभाजी पिकांची लागवड...
औरंगाबादेत कांदा १००० ते ३५०० रुपयेऔरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...