agriculture news in marathi, loan waivers scheme beneficiary status, jalgon, maharashtra | Agrowon

जळगावमध्ये कर्जमाफीसाठीचे ५६९ कोटी लाभार्थ्यांच्या खात्यांवर वर्ग
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय करण्याचे काम सरकार करीत आहे. बॅंका व जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे याद्याच पाहायला मिळत नाहीत. जे दावे आहेत, ते फसवेच आहेत. याबाबत जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून कार्यवाही करावी, अशी अपेक्षा आहे. कारण शेतकऱ्यांना कुणीच जुमानत नाही. 
- भगवान पाटील, शेतकरी.
जळगाव : जिल्ह्यात कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकऱ्यांना ८११ कोटी ८२ लाख रुपये निधी देण्यात येणार असून, यापैकी ५६९ कोटी १६ लाख रुपये पात्र लाभार्थींच्या खात्यांवर वर्ग केल्याचा दावा जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने केला आहे. परंतु नियमित कर्जदार २५ टक्के सवलतीपासून वंचित असून, त्यांना आपल्या सवलतीसंबंधी बॅंक, सहायक निबंधक कार्यालयात सारख्या चकरा माराव्या लागत असल्याचे चित्र आहे. 
 
जिल्ह्यात दोन लाख सात हजार कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांची ग्रीन यादी जाहीर झाली आहे. परंतु या यादीमधील काही शेतकऱ्यांची माहिती मिसमॅच असल्याचे आढळले आहे. त्यामुळे घोळ वाढला आहे. संबंधित मिसमॅच माहिती दुरुस्त करण्यासह खात्री करण्याबाबत संबंधित शेतकऱ्यांना सहायक निबंधक कार्यालयाकडून बोलाविण्यात आल्याचा दावाही प्रशासन करीत आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीसह २५ टक्के सवलतीचा लाभही मिळालेला नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. 
नियमित कर्जदारांनी कर्ज भरून चूक केली का, असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.
 
पाच हजार लोकसंख्येच्या गावात फक्त आठ ते १० नियमित कर्जदारांनाच लाभ मिळाला आहे. निम्म्यापेक्षा अधिक कर्जदार वंचित आहेत. त्यामुळे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा केल्याचा दावा केला जात असला, तरी किती शेतकऱ्यांना पैसे मिळाले, याची पडताळणी करायला हवी, अशी मागणीही शेतकरी करीत आहेत.
 
जिल्ह्यात कर्जमाफीस पात्र १९ हजार ७१६ शेतकऱ्यांच्या दोन ग्रीन याद्या जाहीर झाल्या असून, या शेतकऱ्यांसाठी ७२ कोटी ६८ लाख २५ हजार ९३० रुपये निधी प्राप्त झाला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेअंतर्गत दोन लाख २७ हजार ५२८ कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिल्याचा दावा जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने केला आहे. 

इतर ताज्या घडामोडी
अवर्षणाचा पिकावरील ताण कमी करण्यासाठी...कोरडवाहू शेतीत पीक उत्पादनाच्या दृष्टीने “ओल तसे...
कोल्हापुरात केळी लागवड कमी होण्याची शक्...कोल्हापूर : पुरेशा पाण्याअभावी जिल्ह्यात केळीच्या...
नगरमधील आठ तालुके अद्यापही रब्बी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीची आतापर्यंत अवघी नऊ...
जनावरांच्या आहारातील क्षारमिश्रणाचे...जनावरांच्या हाडांच्या वाढीसाठी दूध उत्पादनासाठी,...
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...
साताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...
नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर  ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...
‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...
महसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात...
महाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर   ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...
सरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...
पुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक  : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...
इंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना...इंदापूर, जि. पुणे  ः महाराष्ट्र राज्य कृषी...
नगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई...नगर  ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे...
शेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची...अकोला   ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी...
नगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात...नगर  ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या...
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी...अकोला  ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा...