agriculture news in marathi, loan waivers scheme beneficiary status, sangli, maharashtra | Agrowon

सांगलीतील एक लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीपोटी २२५ कोटींचा लाभ
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 1 मार्च 2018
सांगली  ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत आतापर्यंत जिल्हा बॅंकेकडील १ लाख ८ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीपोटी २२५ कोटी ३० लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. सातवी ग्रीन लिस्ट पुढील आठवड्यात येण्याचे संकेत मिळत आहेत, अशी माहिती जिल्हा बॅंकेच्या सूत्रांनी दिली.
 
सांगली  ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत आतापर्यंत जिल्हा बॅंकेकडील १ लाख ८ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीपोटी २२५ कोटी ३० लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. सातवी ग्रीन लिस्ट पुढील आठवड्यात येण्याचे संकेत मिळत आहेत, अशी माहिती जिल्हा बॅंकेच्या सूत्रांनी दिली.
 
कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान, ओटीएस लाभाच्या एकूण ६ ग्रीन लिस्ट प्रसिद्ध झाल्या आहेत. कर्जमाफी प्रोत्साहन अनुदान ओटीएस पात्र १ लाख ३३ हजार ४४७ शेतकरी आहेत. त्यांना एकूण २९७ कोटी ६४ लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे. त्यापैकी १ लाख ८ हजार शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे. सहाव्या ग्रीन लिस्टमधील १९ हजार ३०८ शेतकऱ्यांना ३४.८८ कोटी रुपयांचा लाभ मिळाला. कर्जमाफीची रक्कम कर्जखात्याला, तर प्रोत्साहन अनुदानाची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. 
 
दरम्यान जिल्ह्यात ६ हजार ९९२ शेतकरी ओटीएससाठी पात्र आहेत. या शेतकऱ्यांनी दीड लाखांवरील थकीत रक्कम ३१ मार्चपर्यंत भरल्यास त्यांना दीड लाखांची कर्जमाफी मिळणार आहे. ही रक्कम ४७ कोटी रुपये आहे. कर्जमाफी योजनेचा मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेण्यात आला.
 
सांगलीतून जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रकाश अष्टेकर, जिल्हा बॅंकेचे व्यवस्थापक सुधीर काटे तसेच राष्ट्रीयकृत बॅंकांच्या प्रतिनिधींनी यात सहभाग घेतला. राज्यातील ३० हजार शेतकऱ्यांची सातवी ग्रीन लिस्ट पुढील आठवड्यात येईल, असे संकेत मिळत आहेत. जिल्ह्यातील आणखी एक हजार शेतकऱ्यांना लाभ मिळेल, अशी शक्‍यता वर्तवली जात आहे.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...