agriculture news in marathi, loan waivers scheme beneficiary status, status, maharashtra | Agrowon

कर्जमाफीच्या सहाव्या यादीत साताऱ्यातील २८ हजार शेतकरी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018
सातारा  : कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील २८ हजार ९८७ शेतकऱ्यांची सहावी हिरवी यादी (ग्रीन लिस्ट) जिल्हा बॅंकेकडे आली आहे. या यादीची तपासणी होणार असून, त्यातून किती शेतकरी लाभार्थी ठरणार हे स्पष्ट होणार आहे. कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या यामुळे आशा पल्लवित झाल्या आहेत. आतापर्यंत कर्जमाफी योजनेतून ३०५ कोटी रुपयांचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला आहे. 
 
सातारा  : कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील २८ हजार ९८७ शेतकऱ्यांची सहावी हिरवी यादी (ग्रीन लिस्ट) जिल्हा बॅंकेकडे आली आहे. या यादीची तपासणी होणार असून, त्यातून किती शेतकरी लाभार्थी ठरणार हे स्पष्ट होणार आहे. कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या यामुळे आशा पल्लवित झाल्या आहेत. आतापर्यंत कर्जमाफी योजनेतून ३०५ कोटी रुपयांचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला आहे. 
 
शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची अंमलबजावणी सध्या सुरू आहे. आतापर्यंत पाच ग्रीन याद्या शासनाकडून बॅंकांकडे आल्या व त्यातील पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ३०५ कोटी रुपयांचा कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे. यापूर्वी पाचव्या ग्रीन यादीतील जिल्हा बॅंकेकडील ४०३७ शेतकऱ्यांची यादी शासनाकडे पाठविली होती. त्यापैकी १२०७ शेतकरी लाभासाठी पात्र ठरले. उर्वरित शेतकऱ्यांच्या कर्जमाफी अर्जात त्रुटी राहिल्याने त्याची तपासणी करण्यात येत आहे.
 
आता शासनाने सहावी ग्रीन यादीही बॅंकेकडे पाठविली आहे. या यादीत २८ हजार ९८७ शेतकऱ्यांचा समावेश आहे. या यादीची तपासणी होणार आहे. यानंतरच त्यापैकी किती शेतकरी लाभार्थी होणार हे निश्‍चित होणार आहे. त्यानंतरच संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफी योजनेचे पैसे जमा होणार आहेत.
 
त्यामुळे कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना या सहाव्या यादीत आपले नाव येण्याची अपेक्षा आहे. सध्यातरी ही यादी जिल्हा बॅंकेकडे तपासणीसाठी आली आहे. त्यामुळे कर्जमाफीचे लाभार्थी होण्याची अपेक्षा आणखी वाढली आहे. 

इतर ताज्या घडामोडी
अवर्षणाचा पिकावरील ताण कमी करण्यासाठी...कोरडवाहू शेतीत पीक उत्पादनाच्या दृष्टीने “ओल तसे...
कोल्हापुरात केळी लागवड कमी होण्याची शक्...कोल्हापूर : पुरेशा पाण्याअभावी जिल्ह्यात केळीच्या...
नगरमधील आठ तालुके अद्यापही रब्बी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीची आतापर्यंत अवघी नऊ...
जनावरांच्या आहारातील क्षारमिश्रणाचे...जनावरांच्या हाडांच्या वाढीसाठी दूध उत्पादनासाठी,...
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...
साताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...
नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर  ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...
‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...
महसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात...
महाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर   ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...
सरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...
पुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक  : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...
इंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना...इंदापूर, जि. पुणे  ः महाराष्ट्र राज्य कृषी...
नगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई...नगर  ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे...
शेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची...अकोला   ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी...
नगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात...नगर  ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या...
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी...अकोला  ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा...