परभणी ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गंत जिल्ह्यातील १ लाख ३३ हजार २८० शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफी, तसेच प्रोत्साहन अनुदानाचे मिळून ७२१ कोटी ११ लाख रुपये जमा करण्यात आल्याची माहिती जिल्हा अग्रणी बॅंकेच्या सूत्रांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गंत कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील एकूण १ लाख ८० हजार ९४० शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत. जिल्ह्यातील विविध बॅंकांच्या मिळून एकूण १ लाख १२ हजार ७६६ शेतकऱ्यांचा कर्जमाफीअंतर्गत, तसेच प्रोत्साहनपर अनुदानासाठी २१ हजार ८७८ शेतकऱ्यांचा ग्रीन लिस्टमध्ये समावेश आहे. दोन्ही मिळून एकूण १ लाख ३४ हजार ६४४ शेतकऱ्यांसाठी एकूण ७२७ कोटी ९४ लाख रुपये निधी प्राप्त झाला.
यापैकी शुक्रवारपर्यंत (ता.९) १ लाख ३३ हजार २८८ शेतकऱ्यांच्या खात्यावर ७२१ कोटी ११ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. यामध्ये २१ हजार ८७८ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहनपर अनुदानअंतर्गत ४८ कोटी ३८ लाख रुपये आणि कर्जमाफीअंतर्गत १ लाख ११ हजार ४१० शेतकऱ्यांच्या खात्यावर ६७३ कोटी जमा जमा करण्यात आले आहेत.