agriculture news in marathi, loan waivers scheme distribution, jalgaon, maharashtra | Agrowon

शासन शेतीमाल प्रक्रिया उद्योगांवर भर देणार : महाजन
चंद्रकांत जाधव
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017
जळगाव  ः शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. आगामी काळ हा बदलांचा आहे. त्याला सामोरे जावे लागेल व नवीन तंत्रज्ञान उभे करावे लागेल. शेतीसह शेतकऱ्यांना बळ मिळावे, यासाठी शेतमाल प्रक्रिया उद्योगांवर शासन भर देईल. त्यासंदर्भात आगामी काळात गतीने कार्यवाही केली जाईल, असे आश्‍वासन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिले. 
 
जळगाव  ः शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. आगामी काळ हा बदलांचा आहे. त्याला सामोरे जावे लागेल व नवीन तंत्रज्ञान उभे करावे लागेल. शेतीसह शेतकऱ्यांना बळ मिळावे, यासाठी शेतमाल प्रक्रिया उद्योगांवर शासन भर देईल. त्यासंदर्भात आगामी काळात गतीने कार्यवाही केली जाईल, असे आश्‍वासन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिले. 
 
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनाच्या सभागृहात बुधवारी (ता.१८) शेतकऱ्यांना कर्जमाफीबाबतच्या प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या वेळी मंत्री महाजन बोलत होते. व्यासपीठावर सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खासदार ए. टी. पाटील, आमदार सुरेश भोळे, किशोर पाटील, उन्मेष पाटील, स्मिता वाघ, चंदुलाल पटेल, सुरेश भोळे, जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर, जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर आदी उपस्थित होते. 
 
शेतकऱ्यांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. अडचणी येतात, पण आत्महत्या हा त्याला पर्याय असू शकत नाही. जळगाव जिल्ह्याने कर्जमाफीसंबंधीच्या कामात ऐतिहासिक काम केले आहे. सर्वात प्रथम जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाल्याचा दावा या वेळी श्री. महाजन यांनी केला.
शासन शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी पावले उचलत असून, सर्व अडचणी दूर करण्याचा प्रयत्न शासन करीत असल्याचे सहकार राज्यमंत्री पाटील यांनी सांगितले.
 
जिल्ह्यातील ३० शेतकऱ्यांना कर्जमाफीसंबंधीचे प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. या शेतकऱ्यांचा सपत्नीक सत्कारदेखील करण्यात आला. 

इतर ताज्या घडामोडी
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...
जळगाव जिल्हा परिषदेत विरोधक शांत;...जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा...
नगर जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचे...नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि...
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची...भंडारा : गेल्या वीस दिवसांपासून धानपट्ट्यात...