agriculture news in marathi, loan waivers scheme distribution, kolhapur, maharashtra | Agrowon

कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक ः सदाभाऊ खोत
राजकुमार चौगुले
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017
कोल्हापूर : शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नयेत यासाठी शासन प्रयत्नशील आहे. गतवेळी दिलेल्या कर्जमाफीत राहिलेल्या त्रुटी लक्षात घेत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत कोणत्याही त्रुटी राहू नयेत यासाठी दक्षता घेतली आहे. सरसकट दीड लाखापर्यंतचे कृषी कर्ज माफ करून शेतकऱ्यांना सन्मानित करण्याचा शासनाने घेतलेला निर्णय ऐतिहासिक आहे, असे प्रतिपादन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. 
 
कोल्हापूर : शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नयेत यासाठी शासन प्रयत्नशील आहे. गतवेळी दिलेल्या कर्जमाफीत राहिलेल्या त्रुटी लक्षात घेत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत कोणत्याही त्रुटी राहू नयेत यासाठी दक्षता घेतली आहे. सरसकट दीड लाखापर्यंतचे कृषी कर्ज माफ करून शेतकऱ्यांना सन्मानित करण्याचा शासनाने घेतलेला निर्णय ऐतिहासिक आहे, असे प्रतिपादन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. 
 
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रमाणपत्र वितरण व सत्कार सोहळा बुधवारी (ता.१८) जिल्हाधिकारी कार्यालयात झाला. त्या वेळी ते बोलत होते. 
या वेळी लाभार्थी शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
 
या योजनेत कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ७० हजार ५९० अर्ज प्राप्त झाले आहेत. जिल्हा मध्यवर्ती बॅंकांमधील ५३,२६२ थकबाकीदार असून, २२३ कोटी १७ लाख रुपये थकबाकीची रक्कम आहे. राष्ट्रीयकृत, खासगी, ग्रामीण बॅंकांमधील ५४,७२९ थकबाकीदार असून, ६५ कोटी १३ लाख रुपये थकबाकीची रक्कम आहे. जिल्ह्यातील एकूण पात्र १८४७ विकास कार्यकारी सहकारी संस्थामधील २ लाख ५२ हजार ९७० सभासदांची माहिती अपलोड करण्यात आल्याची माहिती या वेळी देण्यात आली.
 
प्रत्येक तालुक्‍यातील २ अशा २४ लाभार्थी शेतकरी दांपत्यांचा प्रमाणपत्र, साडी-चोळी व पेहराव देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा उप निबंधक (सहकारी संस्था) अरुण काकडे, विभागीय सह निबंधक (सहकारी संस्था) तुषार काकडे, पणनचे विशेष लेखा परीक्षक बाळासाहेब यादव, जिल्हा विशेष लेखा परीक्षक डी. बी. बोराडे-पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
जळगावात हिरवी मिरची प्रतिक्विंटल ११००...जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
बारामती कृषी महाविद्यालय देशात रोल मॉडेलबारामती, जि. पुणे ः येथील कृषिक प्रदर्शनासाठी...
सांगली जिल्ह्यात तूर काढणी अंतिम...सांगली : जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ,...
मका विक्रीच्या रकमेसाठी जळगावमधील...जळगाव ः जिल्ह्यात खरिपातील मका विक्रीचे...
संपूर्ण कर्जमाफी; 'स्वामिनाथन'साठी...मुंबई : शेतकऱ्यांची कर्जमाफी, आत्मसन्मान योजना...
वाटाण्याच्या मुळांतील वैशिष्ट्यपूर्ण...पिकांची पांढरी मुळे ही खतांच्या शोषणामध्ये मोलाची...
साखर कारखानदारीला ५ हजार कोटींचा तोटाभवानीनगर, जि. पुणे ः साखरेच्या घसरलेल्या भावाचा...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ४७ टक्‍के...औरंगाबाद  : मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांमध्ये...
बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीच्या...औरंगाबाद : बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीच्या...
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या केंद्राचा...मुंबई : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जगातील चौथ्या...
खतांची कार्यक्षमता वाढवेल ठिबकचा वापरऊस पिकामध्ये केवळ पाटपाण्याऐवजी ठिबक सिंचनाचा...
मोसंबी बागेचे खत व्यवस्थापनप्रगत देशांमध्ये मोसंबीची उत्पादकता ही हेक्टरी २५...
प्रकल्पग्रस्त वयोवृद्ध शेतकऱ्याचा...मुंबई : धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील या...
हिरव्या मिरचीच्या दरात जळगावात सुधारणाजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शेतकरी कन्या झाली उत्पादन शुल्क निरीक्षकयवतमाळ : इंजिनिअर होऊन प्रशासकीय सेवेत आपले...
चिकू बागेत आच्छादन, पाणी व्यवस्थापन...चिकूचे झाड जस जसे जुने होते त्याप्रमाणे त्याचा...
‘गिरणा’तून दुसरे आवर्तन सुरू पण... जळगाव  ः जिल्ह्यातील शेतीसाठी महत्त्वपूर्ण...
मातीच्या ऱ्हासासोबत घडले प्राचीन...महान मानल्या जाणाऱ्या अनेक प्राचीन संस्कृतींचा...
अर्थसंकल्पासाठी नागरिकांनी सूचना...मुंबई : शासनाच्या ध्येय-धोरणांचे प्रतिनिधीत्व...
माफसूला जागतिक स्तरावर लौकिक मिळवून...नागपूर : पदभरती, ॲक्रीडेशन यासारखी आव्हाने...