agriculture news in marathi, loan waivers scheme distribution list status, sangli, maharashtra | Agrowon

सांगली जिल्ह्याच्या कर्जमाफीच्या चौथ्या यादीला स्थगिती
टीम अॅग्रोवन
रविवार, 24 डिसेंबर 2017
सांगली : सातत्याने शेतकरी कर्जमाफीच्या यादीत गोंधळ सुरू आहे. जिल्हा बॅंकेत आलेल्या कर्जमाफीच्या चौथ्या यादीला राज्य शासनाने स्थगिती दिली. त्यातील तांत्रिक त्रुटींच्या दुरुस्तीला विलंब होत आहे. चौथ्या यादीतील २८ हजार शेतकरी आणि त्यांच्यासाठीच्या ५१ कोटी रुपये अनुदानाबाबत आता उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. कर्जमाफीचा होणारा विलंब शेतकऱ्यांना सातत्याने धक्का देणारा ठरत आहे. 
 
सांगली : सातत्याने शेतकरी कर्जमाफीच्या यादीत गोंधळ सुरू आहे. जिल्हा बॅंकेत आलेल्या कर्जमाफीच्या चौथ्या यादीला राज्य शासनाने स्थगिती दिली. त्यातील तांत्रिक त्रुटींच्या दुरुस्तीला विलंब होत आहे. चौथ्या यादीतील २८ हजार शेतकरी आणि त्यांच्यासाठीच्या ५१ कोटी रुपये अनुदानाबाबत आता उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. कर्जमाफीचा होणारा विलंब शेतकऱ्यांना सातत्याने धक्का देणारा ठरत आहे. 
 
कर्जमाफीच्या कर्जदारांच्या यादीची फेरपडताळणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २८ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदानासाठी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. चौथी यादी सर्व विकास सोसायट्यांना पाठवण्यात आली होती. त्यांची फेरछाननी करून याद्या पुन्हा शासनाला ऑनलाइन पाठवण्यात आल्या आहेत.
 
चौथ्या यादीत कर्जमाफी मिळालेले ३ हजार ७४ शेतकरी आहेत. त्यांना १०.७८ कोटींची कर्जमाफी मिळणार आहे. प्रोत्साहन अनुदानाचे २५ हजार ४२३ शेतकरी आहेत. त्यांच्यासाठी ३९.२० कोटींची तरतूद करण्यात आली. वन टाईम सेटलमेंटसाठी (ओटीएस) पहिल्या यादीत एक हजार ५१९ शेतकरी होते. ती संख्या कमी होऊन अवघे ७९९ शेतकरी पात्र ठरले आहेत.
 
शासनाकडे पाठवलेली चौथी यादी अद्यापही दुरुस्त झाली नाही. त्यामुळे ही यादी कधी दुरुस्त होणार असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यातच चौथ्या यादीत तांत्रिक दुरुस्त्यांसाठी आयटी विभागाने कंबर कसली आहे. दोन दिवसांत फेर यादी जाहीर होईल, असे तीन दिवसांपूर्वी सांगितले होते. प्रत्यक्षात सहा दिवसांनंतरही यादी प्रसिद्ध झालेली नाही. त्यामुळे आयटी विभागाचा गलथानपणा सातत्याने समोर येत आहे. परिणामी आयटी विभागावर शासनाचे नियंत्रण नाही का, असा सवाल शेतकरी करू लागले आहेत.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...