agriculture news in marathi, loan waivers scheme distribution, nagar, maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यात सर्वाधिक शेतकऱ्यांना कर्जमाफी ः शिंदे
सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

नगर  : राज्यात कर्जमाफी मिळणारे सर्वाधिक शेतकरी नगर जिल्ह्यातील आहेत. हा आकडा तीन लाख ७६ हजार ८०४ आहे. त्यातील एकही लाभार्थी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री राम शिंदे यांनी दिली.

नगर  : राज्यात कर्जमाफी मिळणारे सर्वाधिक शेतकरी नगर जिल्ह्यातील आहेत. हा आकडा तीन लाख ७६ हजार ८०४ आहे. त्यातील एकही लाभार्थी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री राम शिंदे यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (ता.१८) जिल्ह्यातील २५ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची प्रमाणपत्रे देण्यात आली. शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचाही या वेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात शिंदे बोलत होते. खासदार दिलीप गांधी, आमदार बाळासाहेब मुरकुटे, महापौर सुरेखा कदम, जिल्हाधिकारी अभय महाजन, अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर, जिल्हा उपनिबंधक अनिल दाबशेडे आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्र्यांना दाखविण्यात येणार होता; मात्र तांत्रिक कारणाने तो दाखविता आला नाही.

शिंदे म्हणाले, की या प्रमाणपत्रासोबत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना लिहिलेले पत्रही देण्यात आले आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्यांनाही योजनेचा लाभ होणार आहे. एकही शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार नाही. ३६ वर्षांत पहिल्यांदा मोठा पाऊस झाला आहे. यातील थेंबन्‌ थेंब अडविणे हीच शेतकऱ्यांची बॅंक आहे.
गांधी म्हणाले, की यापूर्वी झालेल्या कर्जमाफीचा फायदा कारखानदार व बॅंकांना झाला. शेतकऱ्यांना त्याचा लाभ झालाच नव्हता. या वेळी पहिल्यांदाच कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना झाला आहे.

पालकमंत्री शिंदे म्हणाले, की शेतकऱ्यांना अर्ज भरताना अडचणींना सामोरे जावे लागले. त्यांना अनेक संकटे आली असा आरोप केला जातो; पण अडचण आलेला एकही शेतकरी मला भेटला नाही. विरोधकांकडून कर्जमाफीबाबत गैरसमज पसरविले जात होते. मात्र, आम्ही आज कर्जमाफी देऊन कृतीतून उत्तर दिले आहे. त्यामुळे विरोधकांना आता बोलण्याचा अधिकार राहिलेला नाही.

कार्यक्रमात दत्तात्रेय शेळके आणि धोंडिराम पालवे या शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्‍त केले. पालवे म्हणाले, ``२००९ पासून पाऊस व इतर साधनांअभावी पैसे उपलब्ध न झाल्याने कर्जाचे हप्ते भरू शकलो नाही. सरकारने आता कर्जमाफी केली आहे. त्यामुळे यापुढे कधीच कर्जाची थकबाकी ठेवणार नाही.’’

इतर बातम्या
स्मार्ट अचिव्हर्स योजनेचे विदर्भातील...पुणे ः राज्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास...
स्मार्ट अचिव्हर्स योजनेचे वऱ्हाडमधील...पुणे ः राज्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास...
रिलायन्स विमा कंपनीला पीकविमाप्रकरणी...परभणी ः २०१७ च्या खरीप हंगामात परभणी जिल्ह्यात...
वरुड येथे दूध दरप्रश्नी `स्वाभिमानी`चे...अमरावती   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध...
स्मार्ट अचिव्हर्स योजनेतील सहावे बक्षिस...पुणे ः राज्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास...
साखर कारखान्यांकडे १२ हजार कोटींची...लखनौ ः उत्तर प्रदेशात २०१७-१८ च्या हंगामात...
काेकण, विदर्भात तुरळक ठिकाणी...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र...
आंदोलन होणारचकोल्हापूर/ पुणे : अनेक दूध संघ अगोदरच गायीच्या...
पीककर्ज वितरण केवळ ३० टक्केचपुणे : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपात दिरंगाई...
संघांकडून दूध दरात तीन रुपयांची वाढपुणे ः दूध दरावर ताेडगा काढण्यासाठी राज्य सरकारने...
अन्य सस्तनापेक्षा उंदराची विचार...दृष्टी किंवा दृश्यावर आधारीत समस्या सोडविण्यासाठी...
विठ्ठला या सरकारला सुबुध्दी दे !...पंढरपूर, जि. सोलापूर : कर्नाटक व केरळच्या धर्तीवर...
आंदोलन होणार असेल तर, आमचेही कार्यकर्ते...नाशिक : दुधाला दरवाढ दिली असून दूध संघांनी...
पशुखाद्याद्वारेही विषारी घटक शिरताहेत...पर्यावरणामध्ये वाढत असलेल्या सेंद्रिय प्रदूषक...
सातत्याने हेडर्स ठरू शकतात मेंदूसाठी...सध्या विश्वचषकामुळे फुटबॉलचा ज्वर सर्वत्र पसरलेला...
हतनूर धरणाचे १० दरवाजे पूर्णपणे उघडलेजळगाव : भुसावळ व मुक्ताईनगरनजीकच्या तापी नदीवरील...
शेतकऱ्यांना अनुदान तत्त्वावर कामगंध...जळगाव : बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी...
दारणा धरण ५०, तर पुनंद १०० टक्के भरलेइगतपुरी, जि. नाशिक  :  इगतपुरी...
मुंबईला एक थेंबही दूध जाऊ देणार नाहीनाशिक : दुधाला ठरवून दिलेला दर मिळत नसल्याने...
सोलापूर बाजार समिती पदाधिकारी निवड...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...