agriculture news in marathi, loan waivers scheme distribution, nashik, maharashtra | Agrowon

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा सरकारचा प्रयत्न ः डॉ. भामरे
ज्ञानेश उगले
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

नाशिक : राज्यातील शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत कर्जमुक्तीचा लाभ मिळत असल्याने त्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड करण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले.

नाशिक : राज्यातील शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत कर्जमुक्तीचा लाभ मिळत असल्याने त्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड करण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन भवन येथे बुधवारी (ता.१८) छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-२०१७ अंतर्गत कर्जमुक्ती प्रारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण, महापौर रंजना भानसी, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, बाळासाहेब सानप, डॉ. राहुल आहेर, अनिल कदम, प्रभारी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, सहकार सहनिबंधक मिलिंद भालेराव आदी या वेळी उपस्थित होते.

डॉ. भामरे म्हणाले, की गारपीट, दुष्काळ आणि अवेळी पाऊस अशा नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत. कर्जाच्या चक्रातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी सरकारने कर्जमाफी जाहीर केली. या योजनेमुळे शेतकऱ्यांमध्ये नवा विश्वास निर्माण झाला असून, ते नव्या उमेदीने शेती करतील आणि कृषिक्षेत्राच्या विकासालाही चालना मिळेल.

शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून ज्यांनी अनेक वर्षे सत्ता उपभोगली त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात केवळ १६ टक्के सिंचन होते. शेतीचे नियोजन चुकल्याचे लक्षात आल्यामुळे हे सिंचन वाढविण्यासाठी भाजप सरकारने शाश्वत कार्यक्रम हाती घेतला असून, त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. जलयुक्त शिवार योजनेमुळे २० लाख हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली आले असून, १५ हजार गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याचा दावा डॉ. भामरे यांनी केला.

केंद्र सरकारने पंतप्रधान कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून राज्यातील २६ प्रकल्पांसाठी प्राधान्याने आर्थिक साह्य मंजूर केले आहे. त्यामुळे अपूर्ण प्रकल्प लवकर पूर्ण होण्यास मदत होईल. काश्‍मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या एअर कमांडो मिलिंद खैरनार यांच्या पत्नीने लष्करात नोकरी करण्याची इच्छा व्यक्त केल्यास नियमाप्रमाणे नोकरी दिली जाईल, असे आश्वासन संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांनी दिले. संरक्षण विभागाच्या नियमाप्रमाणे मिलिंद खैरनार यांचे पूर्ण वेतन त्यांच्या पत्नीला दिले जाणार आहे. सोबतच त्यांनी नोकरीची इच्छा व्यक्त केली तर स्वाती महाडिक यांच्या प्रमाणेच नियमांची तपासणी करून त्यांनाही नोकरी दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यातून एक लाख ७४ हजार ५२५ शेतकरी कुटुंबांचे अर्ज ऑनलाइन प्राप्त झाल्याची माहिती गावडे यांनी दिली. राज्यस्तरीय कर्जमुक्ती प्रारंभ कार्यक्रमातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाचे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले.

इतर ताज्या घडामोडी
`सेवाकर प्रश्न मिटेपर्यंत सांगलीत...सांगली   : मुंबईत भाजप कार्यालयातील...
पुणे जिल्ह्यात गव्हाचे क्षेत्र ४१ हजार...पुणे  ः जमिनीत ओल नसल्याने यंदा रब्बी...
राज्यात तरी लोकायुक्तांची नियुक्ती करा...नगर   : ‘लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी...
कांदा पट्टयात अस्वस्थता; चौघांनी संपवले...नाशिक   ः गंभीर दुष्काळ स्थिती, कर्ज,...
`कृषिक`मध्ये शेवंतीच्या जाती,...बारामती, जि. पुणे  ः येथे आयोजित कृषिक...
कांद्याच्या उभ्या पिकात चरण्यासाठी...राहुरी, जि. नगर  : कूपनलिकेचे पाणी अचानक...
‘एमसीडीसी’ शेतकरी कंपन्या स्थापन करणारपुणे : महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ नाबार्डच्या...
संत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल...नागपूर  ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित...
सूक्ष्म सिंचन विस्तारातील अडचणी, पर्याय...औरंगाबाद   : औरंगाबाद येथे आयोजित...
‘ई- टेंडरिंग’ रेशीम उत्पादकांच्या मुळावरपुणे  ः राज्यात पाणीटंचाईमुळे सर्वत्र...
आंदोलनामुळे शेतकऱ्यांना मिळाले ७४...पुणे  : साखर आयुक्तालयासमोर गेल्या तीन...
रोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात... नगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ...
लोणार तालुक्यात कडाक्याच्या थंडीमुळे...बुलडाणा : जिल्ह्यात द्राक्ष शेती टिकवून ठेवण्यात...
कृषी सल्ला (कोकण विभाग)भात रोप अवस्था : उन्हाळी भात रोपवाटिकेस...
थंडीच्या काळात केळी बागांची काळजीकेळीच्या पानांवर कमी तापमानाचे दुष्परिणाम २ ते ४...
पहाटे, रात्री थंडीचे प्रमाण अधिक राहीलमहाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वत रांगावर १०१४...
पाणंद रस्त्यांची निविदा प्रक्रिया सुरू अकोला : शासनाच्या पाणंद रस्ते योजनेतून...
`साखर उद्योगातील संघटित गुन्हेगारी...मुंबई : गेल्या वर्षीच्या हंगामातील ७०-३०...
शासकीय दूध डेअरीत अमोनियाची गळतीअकोला : येथील मूर्तिजापूर मार्गावर असलेल्या...
कृषी योजनेतील विहिरींनाही दुष्काळाचा...धुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशात विहिरींनी...