agriculture news in marathi, loan waivers scheme distribution, nashik, maharashtra | Agrowon

नाशिकमधील शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा
टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 नोव्हेंबर 2017
नाशिक  : गेल्या १८ ऑक्‍टोबरला मोठ्या थाटामाटात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफी योजनेला प्रारंभ झाला; परंतु महिन्यानंतरही कर्जमाफीच्या अर्जांची छाननी, माहिती अपलोड करण्याचेच काम सुरू आहे. त्यामुळे अद्यापही शेतकऱ्यांचे खाते निरंकच असल्याचे दिसून येते.
 
नाशिक  : गेल्या १८ ऑक्‍टोबरला मोठ्या थाटामाटात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफी योजनेला प्रारंभ झाला; परंतु महिन्यानंतरही कर्जमाफीच्या अर्जांची छाननी, माहिती अपलोड करण्याचेच काम सुरू आहे. त्यामुळे अद्यापही शेतकऱ्यांचे खाते निरंकच असल्याचे दिसून येते.
 
दिवाळीदरम्यान शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याची घोषणा झाली. विरोधी पक्षांतर्फे आंदोलने झाली. दिवाळीच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधून केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या हस्ते जिल्ह्यातील ३० शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर पुन्हा ८७९ पात्र लाभार्थ्यांची ग्रीन यादी शासनामार्फत प्राप्त झाली.तर दीड लाखाप्रमाणे ३ कोटी ७० हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला. मात्र दिवाळी होऊन महिना उलटला तरी अद्याप शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ मिळू शकलेला नाही.
 
तालुकास्तरीय समितीच्या अहवालानंतरच प्रत्यक्षात संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार असल्याचे सांगण्यात आले.जिल्ह्यात १ लाख ८९ हजार शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे अर्ज भरले असून, त्यापैकी सुमारे १ लाख ६ हजार शेतकरी पात्र ठरले. मात्र नेमके यात कोणाला कर्जमाफी मिळणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
 
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर व जळगाव जिल्ह्यांत शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्याने माहिती अपलोड करण्याचे काम अतिशय संथपणे सुरू आहे. त्यामुळे ५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांची माहिती सहकार विभागाकडे अद्ययावत व्हायची आहे.
 
सरकारने जाहीर केलेल्या लाभार्थ्यांच्या यादीत त्रुटी असल्यामुळे सरकारला ती यादीही संकेतस्थळावरून हटवावी लागली. वेगवेगळ्या यंत्रणांकडून तपासणी करूनही शेतकरी कजर्माफीच्या याद्या काही अंतिम होत नाहीत. त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये कर्जमाफीविषयी रोषच वाढतो आहे. यादीतही पती-पत्नी दोहोंना लाभ मिळतो का, त्यांना दीड लाखापेक्षा अधिक रकमेची कर्जमाफी मिळते का, अशा अनेक त्रुटी अजून दूर झालेल्या नाहीत. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात बॅंकांना नव्याने यादी अपलोड करण्याच्या सूचना दिल्या आहेत; पण त्या सूचना कागदावरच आहेत.

इतर ताज्या घडामोडी
फळपीक सल्ला : लिंबूवर्गीय फळ, केळी लिंबूवर्गीय फळ पीके मृग बहराची फळे काढणी...
तूर खरेदीस १५ मेपर्यंत मुदतवाढीचा अादेश...नागपूर : यापूर्वी निर्धारित केलेले अटी व नियम...
सीताफळ पीक सल्लासीताफळ हे पीक पावसावर घेतले जाते. मात्र,...
नेदरलॅंड फळ बाजारात ब्राझीलचे वर्चस्वगेल्या काही वर्षांमध्ये आंबा, लिंबू आणि...
चालण्याचा व्यायाम आरोग्यासाठी फायद्याचाआरोग्यासाठी व्यायामाची आवश्यकता कोणीही नाकारत...
पूर्वहंगामी कापूस लागवडीला बसणार फटका जळगाव  ः गुलाबी बोंड अळीचा धसका आणि...
कोकणवर अन्याय करणाऱ्यांची राखरांगोळी...नाणार  : नाणार प्रकल्प होऊ देणार नाही, नाणार...
रणरणत्या उन्हातील धान्य महोत्सवाकडे...नागपूर  ः विदर्भाचा उन्हाळा राज्यात सर्वदूर...
पुणे जिल्ह्यात दोन लाख टन खते उपलब्ध...पुणे : जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू झाली...
अकोला जिल्ह्यात १०३२ शेततळ्यांची कामे... अकोला ः पीकउत्पादन वाढीसाठी शाश्वत पाणीस्रोत...
मराठवाड्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या... औरंगाबाद  : गत आठवड्याच्या तुलनेत...
परभणीत‘शेतमाल तारण योजने अंतर्गत ४०... परभणी  ः परभणी कृषी उत्पन्न बाजार...
नगर जिल्ह्यात १७ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा नगर ः जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या...
परभणीत खरिपात सोयाबीन, मूग, तुरीचे... परभणी  : जिल्ह्यात यंदाच्या खरीप...
नगरमधील २ लाख ४७ हजार शेतकऱ्यांना... नगर ः राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी जाहीर...
नाशिक विभागातील ११०० गावांची "जलयुक्त... नाशिक : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी...
सार कसं सामसूम तरंग नाही तलावात...शेती कोरडवाहू. तरीही स्वबळावर दुग्ध व्यवसायातून...
बालिकांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची...नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून ‘पॉक्‍सो’ कायद्यात...
पुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीतपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्तयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून...