agriculture news in marathi, loan waivers scheme distribution, pune, maharashtra | Agrowon

शेतीपूरक व्यवसायाच्या आराखड्याचे काम सुरू : बापट
संदीप नवले
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017
पुणे : शेतकऱ्यांना कर्जमाफी केली असली तरी, शेतकऱ्यांसाठी शाश्वत उत्पन्नाचे स्त्रोत उभे करावे लागणार आहे. त्यासाठी शासकीय विभागांचे पूरक व्यवसायांचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. पशुसंवर्धन विभागाने पूरक व्यवसायाचा आराखडा केंद्र सरकारला सादर केला असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली. 
 
पुणे : शेतकऱ्यांना कर्जमाफी केली असली तरी, शेतकऱ्यांसाठी शाश्वत उत्पन्नाचे स्त्रोत उभे करावे लागणार आहे. त्यासाठी शासकीय विभागांचे पूरक व्यवसायांचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. पशुसंवर्धन विभागाने पूरक व्यवसायाचा आराखडा केंद्र सरकारला सादर केला असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली. 
 
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमुक्ती प्रारंभ कार्यक्रम बुधवारी (ता.१८) विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. या वेळी श्री. बापट बोलत होते. विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, अतिरिक्त आयुक्त डॉ. आनंद जोगदंड, जिल्हाधिकारी सौरभ राव, विभागीय सहनिंबधक दीपक तावरे, सहकार संस्थेचे जिल्हा उपनिबंधक आनंद कटके आदी उपस्थित होते. 
 
श्री. बापट म्हणाले, की शेतकरी हा घटक मानून त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. पाऊस आला तरी नाही आला तरी शेतकऱ्यांना नियोजन करावे लागते. पूरक उद्योगांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज, पाणी अशा सुविधा वेळेवर उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे.
 
याशिवाय गेल्यावर्षी जलयुक्त शिवार योजना राबवली. त्याचा मोठा फायदा झाला असून टॅंकरची संख्या कमी झाली आहे. दरवर्षी टॅंकरवर सुमारे तीनशे कोटी रुपये खर्च होत होते. परंतु, यंदा ‘जलयुक्त शिवार’मुळे टॅंकरवर फक्त ५१ टक्के खर्च झाला आहे. ग्रामीण भागात रोजगार, शिक्षण असे प्रश्न आहे. त्यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध योजनेतून लाभ दिला जात आहे.
 
विभागीय आयुक्त दळवी म्हणाले, की शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले. दाखल अर्जांची ऑनलाईन छाननी करून दिवाळीपूर्वी कर्जमाफीची रक्कम देण्यात येत आहे. या कर्जमाफीमध्ये गैरप्रकार होणार नाही, याची मला खात्री आहे. येत्या १५ नोव्हेंबरपूर्वी कर्जमाफीची रक्कम दिली जाईल.
 
जिल्ह्यातील तेरा तालुक्‍यांतील २५ हून जास्त शेतकरी कुटुंबीयांचा प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी जिल्ह्यातून आमदार बाबूराव पाचर्णे आणि शहरातून आमदार जगदीश मुळीक वगळता एकही आमदार या कार्यक्रमास उपस्थित नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी या आमदारांना किती गांभीर्य आहे याची चर्चा दबक्‍या आवाजात सभागृहात सुरू होती. जिल्ह्यात आणि शहर मिळून एकूण २१ आमदार आहेत. त्यापैकी फक्त दोन आमदार या कार्यक्रमाला उपस्थित होते. धक्कादायक बाब म्हणजे जिल्ह्यातील एकही खासदार कार्यक्रमासाठी उपस्थित नव्हते. 

इतर ताज्या घडामोडी
सोलापूरात कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वीसोलापूर - सोलापुरात मागील चार दिवसांपासून...
नांदेड: माहूर मंडळात मुसळधारमाहूर, जि. नांदेड : गेल्या अनेक दिवसापासून...
औरंगाबादेत श्रावणाची पहिली सरऔरंगाबाद : गेल्या वीस पंचवीस वडीवसंपासून पावसाने...
एक महिन्याच्या विश्रांतीनंतर लातूर...लातूर : गेल्या एक महिन्यापासून गायब झालेल्या...
पोपट पाळल्यास तुरुंगवासमुंबई - घरात पोपट पाळण्याची हौस महागातही पडू...
मराठवाड्यात पावसाची रिपरिप; पिकांना...औरंगाबाद : पावसाने ओढ दिल्याने मराठवाड्यातील...
भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे...मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार (वय ७७...
हुतात्मा जवान औरंगजेब यांना मरणोत्तर '...नवी दिल्ली : हुतात्मा जवान औरंगजेब यांना...
साताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
ऊस तांबेरा नियंत्रणलक्षणे ः १) पानाच्या दोन्ही बाजूंवर लहान, लांबट...
ऊस पीक सल्ला आडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम...
सस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा...स्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग...
केळी उत्पादकांना जोरदार पावसाची...रावेर, जि. जळगाव  : पावसाळ्याचे सव्वादोन...
नगर जिल्ह्यात सोयाबीनने यंदाही सरासरी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढत...
बाजार समितीवर नियुक्त्या न झाल्याने...पुणे ः जिल्ह्यातील महत्त्वाचे आर्थिक सत्ता केंद्र...
कोल्हापुरात धरणक्षेत्रात पाऊस सुरूचकोल्हापूर : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी (...
आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार विनायकराव...सातारा : महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव...
संत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...
श्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...