agriculture news in marathi, loan waivers scheme distribution, satara, maharashtra | Agrowon

देशातील सर्वांत मोठी कर्जमाफी ः पालकमंत्री शिवतारे
विकास जाधव
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017
सातारा  : शेती आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस यावेत म्हणून शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतला असून, ही कर्जमाफी देशातील सर्वांत मोठी कर्जमाफी आहे. या कर्जमाफीचा लाभ जास्तीत जास्त सर्वसामान्य शेतकऱ्यांना होणार असून, त्यांचा सातबारा उतारा कोरा होईल, असा विश्वास पालकमंत्री विजय शिवतारे यांनी व्यक्त केला.
 
‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७’अंतर्गत शेतकरी कर्जमुक्ती प्रमाणपत्राचे वितरण बुधवारी (ता. १८) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पालकमंत्री श्री. शिवतारे यांच्या हस्ते जिल्ह्यातील २२ शेतकऱ्यांना करण्यात आले.
 
सातारा  : शेती आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस यावेत म्हणून शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतला असून, ही कर्जमाफी देशातील सर्वांत मोठी कर्जमाफी आहे. या कर्जमाफीचा लाभ जास्तीत जास्त सर्वसामान्य शेतकऱ्यांना होणार असून, त्यांचा सातबारा उतारा कोरा होईल, असा विश्वास पालकमंत्री विजय शिवतारे यांनी व्यक्त केला.
 
‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७’अंतर्गत शेतकरी कर्जमुक्ती प्रमाणपत्राचे वितरण बुधवारी (ता. १८) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पालकमंत्री श्री. शिवतारे यांच्या हस्ते जिल्ह्यातील २२ शेतकऱ्यांना करण्यात आले.
 
या वेळी ते बोलत होते. सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, जिल्हा उपनिबंधक महेश कदम, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक महादेव शिरोळकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे राजेंद्र सरकाळे आदी या वेळी उपस्थित होते.
 
पालकमंत्री शिवतारे म्हणाले, की राज्यभरातून ५६ लाख ५९ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले हाते. ऑनलाइन अर्ज भरल्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यालाही कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत आहे. या योजनांमधून शेतकऱ्यांचे जीवमान उंचविण्यास मदत होत आहे. शासनाने कर्जमाफी देण्यासाठी ३ वर्षे अभ्यास केला व योग्य वेळी कर्जमाफी दिली, त्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष अभिनंदन करतो.
 
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील थकबाकीदार ६० हजार, नियमित परतफेड करणारे १ लाख ७५ हजार, तर पुनर्गठित कर्जदार शेतकारी १५ हजार असे एकूण २ लाख ५० हजार शेतकऱ्यांना अंदाजे ४९० कोटींचा लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी व त्यांना शाश्वत पाणी उपलब्ध व्हावे यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरू केले आहे. या अभियानातून दुष्काळी भागातही टॅंकरची संख्या कमी झालेली असल्याचे त्यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
सोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊससोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी...
नव्या सहकारी संस्थांना भागभांडवल :...नाशिक : सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था...
पुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांत काही...पुणे ः पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान...
हिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व...
संगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस,...संगमनेर, जि. नगर ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...
कोल्हापुरात ऐन हंगामातच गुऱ्हाळघरे शांतकोल्हापूर  : यंदा गूळ दरात काहीशी वाढ...
दुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान...मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत...
परिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...
जुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...
कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी  : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...
नाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक  : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...
शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा   ः तुम्ही संकटात असताना...
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक   : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...
व्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...
सरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...
नगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...
पुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे  ः कोकणातील हापूस आंब्यांची या...