agriculture news in marathi, loan waivers scheme distribution, solapur, maharashtra | Agrowon

सोलापूर जिल्ह्यातील २८०० शेतकरी कर्जमुक्त
टीम अॅग्रोवन
बुधवार, 29 नोव्हेंबर 2017
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून सोलापूर जिल्ह्यातील ३१ हजार ९२५ शेतकऱ्यांसाठी १७० कोटी ३३ लाख २२ हजार ९२४ रुपये सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडे वर्ग करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या या याद्यांतदेखील त्रुटी असल्याने बॅंकेच्या वतीने शेतकऱ्यांच्या माहितीची पडताळणी करूनच रक्कम जमा केली जात आहे. सोमवारी (ता. २७) रात्री नऊपर्यंत जिल्ह्यातील २८०० शेतकऱ्यांच्या खात्यावर १६ कोटी ८४ लाख रुपये जमा करून या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात आले आहे. 
 
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून सोलापूर जिल्ह्यातील ३१ हजार ९२५ शेतकऱ्यांसाठी १७० कोटी ३३ लाख २२ हजार ९२४ रुपये सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडे वर्ग करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या या याद्यांतदेखील त्रुटी असल्याने बॅंकेच्या वतीने शेतकऱ्यांच्या माहितीची पडताळणी करूनच रक्कम जमा केली जात आहे. सोमवारी (ता. २७) रात्री नऊपर्यंत जिल्ह्यातील २८०० शेतकऱ्यांच्या खात्यावर १६ कोटी ८४ लाख रुपये जमा करून या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात आले आहे. 
 
मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी यांनी कर्जमाफी योजनेत राज्यातील सहकारी व राष्ट्रीयीकृत बॅंका, सहकार विभाग यांचा सातत्याने आढावा घेतल्याने व प्रशासकीय यंत्रणा गतिमान केल्याने कर्जमाफी योजनेला आता गती येऊ लागली आहे. कर्जमाफी योजनेचा आढावा घेण्यासाठी दर तीन दिवसांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठका आयोजित केल्या जात आहेत.
 
राज्य सरकारने जिल्हा बॅंकेला दिलेली रक्कम फक्त विविध विकास सेवा सहकारी संस्थेला न देता थेट शेतकऱ्यांना मिळावी. रक्कम मिळाल्यानंतर त्यांची नोंद खतावणीला व्हावी, यासाठी जिल्हा बॅंक व राज्य सरकारच्या वतीने कटाक्षाने लक्ष दिले जात आहे.
 
कर्जमाफीच्या यादीत आलेल्या ३१ हजार शेतकऱ्यांची माहिती पडताळण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, सोमवारी दुपारपर्यंत ३१ हजार शेतकऱ्यांपैकी २१ हजार शेतकऱ्यांची माहिती पडताळून झाली आहे.
 
उर्वरित शेतकऱ्यांची माहिती येत्या एक ते दोन दिवसांत पूर्ण होणार असून, कर्जमाफीची रक्कम खात्यावर जमा करण्यासाठी येत्या एक ते दोन दिवसांत अधिक वेग येण्याची शक्‍यता आहे. कर्जमाफी योजनेतील तालुकानिहाय लाभार्थी  ः अक्कलकोट : ३४३६, बार्शी : ४७२६, करमाळा : ३५३४, माढा : २६८४, माळशिरस : २४८१, मंगळवेढा : ३४६४, मोहोळ : २७२२, उत्तर सोलापूर : ११३५, पंढरपूर : ३४६२, सांगोला : १५६३, दक्षिण सोलापूर : २७१८, एकूण : ३१ हजार ९२५.

इतर ताज्या घडामोडी
देशातील रब्बी पेरणी माघारलीनवी दिल्ली  : देशभरात शुक्रवारअखेर (ता. ८)...
कुपोषण, प्रथिने जागृतीकडे लक्ष...पुणे : भारतात प्रथिनांच्या कमततेअभावी होणाऱ्या...
‘त्या’ कंपनीला काळ्या यादीत टाका :...लातूर ः येथील शासनाच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर...
रेशन धान्य दुकानदारांनी ई-पॉस मशिन...वडूज, जि. सातारा : रेशन घेण्यास आलेल्या...
भारनियमनामुळे शेती ऑफलाइननांदुरा, जि. बुलढाणा : शासनाने सर्व योजनांचे...
दूध संघांना अनुदान द्या : अरुण नरकेपुणे ः राज्य सरकारने दुधाला २७ रुपये प्रतिलिटरचा...
पुण्यात पालेभाज्यांची आवक टिकून; दर...पुणे : मार्केट यार्ड येथील भाजीपाला बाजारात सलग...
साहित्य संमेलनाध्यक्षपदी लक्ष्मीकांत...नागपूर : बडोदा येथे फेब्रुवारीत होणाऱ्या 91 व्या...
नरभक्षक बिबट्याला अखेर ठार मारलेमेहुणबारे/ पिलखोड/ चाळीसगाव : गिरणा परिसरात...
सरसकट कर्जमाफीसाठी होणार जेल भरो औरंगाबाद  ः शेतकरी, शेतमजूर, शेतीपूरक...
उद्धव ठाकरे गप्प बसा; अन्यथा रहस्ये...सांगली ः शिवसेना सोडण्याचे कारण उद्धव ठाकरे आहेत...
गिरणा धरणातून पहिले आवर्तन सोडलेचाळीसगाव :  गिरणा धरणातून सिंचनासाठीचे पहिले...
पीक नुकसानीचे दहा दिवसांत पंचनामे...औरंगाबाद : कापूस व धान पिकाच्या झालेल्या...
दक्षिण गुजरात, सौराष्ट्राचा कौल मतपेटीत...अहमदाबाद, गुजरात : येथील विधानसभेच्या पहिल्या...
रोहित्र दुरुस्तीचा विलंब भोवला; भरपाई...अकोला :  वीज रोहित्राची वेळेवर दुरुस्ती न...
व्यावसायिक कल्चरमुळे वाढते...खाद्यपदार्थ किण्वनातील जिवाणूंचा झाला अभ्यास...
बोगस बियाणे निर्मितीच्या संशयावरून...बुलडाणा : नांदुरा तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर...
कृषि सल्ला : पालेभाज्या, फळभाज्याडिसेंबर महिन्यात बहुतांश पालेभाजी पिकांची लागवड...
औरंगाबादेत कांदा १००० ते ३५०० रुपयेऔरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
मध्यम आकाराचे मांसभक्षक येतील पर्यावरण...मध्यम आकाराच्या मांसभक्षक प्राण्यांवर...