agriculture news in marathi, loan waivers scheme distribution, usmanabad, maharashtra | Agrowon

राज्य सरकारचे धोरण शेतकरी हिताचे ः जानकर
सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

उस्मानाबाद  : राज्य सरकारचे धोरण शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. कर्जमाफी निर्णयाच्या अंमलबजावणीने राज्यातील शेतकऱ्यांना सरकारने दिवाळीची भेट दिली आहे. जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना ऑक्‍टोबरअखेरपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळेल, असा विश्वास पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसायमंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केला.

उस्मानाबाद  : राज्य सरकारचे धोरण शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. कर्जमाफी निर्णयाच्या अंमलबजावणीने राज्यातील शेतकऱ्यांना सरकारने दिवाळीची भेट दिली आहे. जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना ऑक्‍टोबरअखेरपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळेल, असा विश्वास पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसायमंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केला.

राज्यात बुधवारपासून कर्जमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. त्यानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात प्रातिनिधिक स्वरूपात काही शेतकऱ्यांना श्री. जानकर यांच्या हस्ते कर्जमाफीच्या प्रमाणपत्रांचे वितरण झाले. त्या वेळी ते बोलत होते. आमदार सुजितसिंह ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगूलवार, जिल्हा उपनिबंधक व्ही. एस. जगदाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष चोले आदी उपस्थित होते.जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांपैकी २३ लाभार्थी शेतकरी कुटुंबांना कर्जमाफी प्रमाणपत्राचे वाटप झाले.

शासनातर्फे शेतकऱ्यांसाठीची ही सर्वात मोठी कर्जमाफी आहे. शेतकऱ्यांचे दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ झाले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील एकूण १ लाख ३९ हजार ५७७ शेतकऱ्यांनी ऑनलाइन फॉर्म भरलेले असून पात्र सर्व शेतकऱ्यांना ऑक्‍टोबरअखेरपर्यंत कर्जमुक्‍ती देण्यात येणार असल्याचा विश्वास मंत्री जानकर यांनी व्यक्त केला.

लाभार्थी शेतकरी असे ः उस्मानाबाद तालुका- चनबस शिवय्या कपाळे (रा. बावी), भारत तात्या तांबे (रा. बावी).  तुळजापूर ः नागनाथ गुंड (रा. सुरतगाव), चंद्रकांत शेनमारे (रा. पिंपळा बु.), भीमा आंबुरे (रा. सुरतगाव). लोहारा ः तुकाराम साठे (रा. माकणी), शिवाजी करदुरे (रा. माकणी), रहेमान पठाण (रा. माकणी). कळंब ः शरद सावंत (रा. सौंदाणा ढोकी), नारायण कुलकर्णी (रा. सातेफळ), शिवहरी शेळके (रा. भोसा). वाशी ः गोरोबा तावरे (रा. जिन्नर), राजेंद्र शिंदे (रा. बावी), प्रताप घुले, (रा. वाशी). भूम ः दत्तात्रय चव्हाण (रा. वालवड). परंडा ः भास्कर तनपुरे (रा. खासापुरी), विक्रम देशमुख (रा. खासापुरी), सुरेश बारसकर (रा. अंदोरी).
 

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...