अौरंगाबाद विभागात ४ लाख ४० हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ

कर्जमाफी योजना
कर्जमाफी योजना

औरंगाबाद  : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत मार्चअखेर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील ४ लाख ४० हजार ७८२ शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची १९२१ कोटी ४८ लाख १८ हजार २०० रुपयांची रक्‍कम वर्ग करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांतील ५ लाख १७ हजार ९६९ शेतकऱ्यांचा कर्जमाफीच्या लाभार्थ्यांमध्ये समावेश होता. मार्चअखेर या लाभार्थी शेतकऱ्यांपैकी ४ लाख ४० हजार ७८२ शेतकऱ्यांच्या खात्यावर १९२१ कोटी ४८ लाख १८ हजार २०० रुपये वर्ग करण्यात आले आहेत.

मार्चअखेरपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांमध्ये जिल्हा मध्यवर्ती बॅंकच्या ९५ हजार २४५, राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या ३९ हजार तर ग्रामीण बॅंकेच्या १३ हजार ७२८ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

जालना जिल्ह्यात कर्जमाफीचा लाभ  मिळालेल्या शेतकऱ्यांमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेअंतर्गत ३० हजार ८७६, राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या ६५ हजार ३६१ तर ग्रामीण बॅंकेच्या २७ हजार ६१४ शेतकऱ्यांचा समावेश आहे.परभणी जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने ३२ हजार ५९६, राष्ट्रीयीकृत बॅंकेने ८१ हजार ३०४ तर ग्रामीण बॅंकेने १८ हजार ५७१ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला आहे.

हिंगोली जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने १९ हजार ७२०, राष्ट्रीयीकृत बॅंकेने १० हजार ५३४ तर ग्रामीण बॅंकेने ६ हजार २३३ शेतकऱ्यांना ३१ मार्चअखेरपर्यंत कर्जमाफीचा लाभ दिला आहे. चारही जिल्ह्यांतील कर्जमाफीच्या लाभार्थी ५ लाख १७ हजार ९६९ शेतकऱ्यांच्या खात्यावर २५४१ कोटी २ लाख ८२ हजार २६४ रुपये वर्ग होणे अपेक्षित आहे. त्यापैकी १९२१ कोटी ४८ लाख १८ हजार २०० रुपये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यांवर वर्ग करण्यात आले आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांपैकी ७७ हजार १८७ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणे बाकी आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील २५ हजार ३५६, जालना जिल्ह्यातील ३४ हजार ३५, परभणी जिल्ह्यातील १० हजार ७७१ तर हिंगोली जिल्ह्यातील ७ हजार २५ शेतकऱ्यांचा समावेश आहे. अर्थात जसजसा लाभ देणे सुरू राहील तसतशी ही संख्या कमी होत जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com