agriculture news in Marathi, loan waiving amount again credited in those farmers account, Maharashtra | Agrowon

कर्जमाफीची रक्कम पुन्हा ‘त्या’ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा
टीम अॅग्रोवन
बुधवार, 29 नोव्हेंबर 2017

पंढरपूर, जि. सोलापूर : पंढरपूर तालुक्‍यातील उपरी येथील देवानंद गणपत जगदाळे आणि गादेगाव येथील शेतकरी अर्जुन शंकर कदम यांच्या खात्यात ३१ ऑक्‍टोबरला कर्जमाफी योजनेनुसार शासनाकडून पैसे जमा करण्यात आले होते. परंतु कोणतेही कारण न दाखवता या दोन्ही शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा करण्यात आलेली रक्कम शासनाकडून १३ नोव्हेंबरला पुन्हा काढून घेण्यात आली होती. मात्र, सोमवारी (ता. २७) आपल्या बॅंक खात्यात पुन्हा ही रक्कम जमा झाली आहे, अशी माहिती श्री. जगदाळे यांनी दिली. 

पंढरपूर, जि. सोलापूर : पंढरपूर तालुक्‍यातील उपरी येथील देवानंद गणपत जगदाळे आणि गादेगाव येथील शेतकरी अर्जुन शंकर कदम यांच्या खात्यात ३१ ऑक्‍टोबरला कर्जमाफी योजनेनुसार शासनाकडून पैसे जमा करण्यात आले होते. परंतु कोणतेही कारण न दाखवता या दोन्ही शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा करण्यात आलेली रक्कम शासनाकडून १३ नोव्हेंबरला पुन्हा काढून घेण्यात आली होती. मात्र, सोमवारी (ता. २७) आपल्या बॅंक खात्यात पुन्हा ही रक्कम जमा झाली आहे, अशी माहिती श्री. जगदाळे यांनी दिली. 

कर्जमाफीमध्ये या दोन्ही शेतकऱ्यांसंबंधी घडलेल्या या प्रकाराचे वृत्त गुरुवारच्या (ता. २३) रोजी ‘ॲग्रोवन’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते.

याबाबतची माहिती अशी, की उपरी येथील देवानंद गणपत जगदाळे यांनी विदर्भ कोकण ग्रामीण बॅंकेच्या गादेगाव शाखेतून ६४ हजार ४०१ रुपये कर्ज घेतले होते. शासनाने कर्जमाफी योजना जाहीर केल्यानंतर श्री. जगदाळे यांच्या खात्यात ३१ ऑक्‍टोबरला कर्जाची रक्कम जमा झाली होती. त्यामुळे बॅंकेने जगदाळे यांना कर्जखाते संपल्याचे मोबाईलवर संदेश पाठवून कळवले होते. परंतु, १३ नोव्हेंबरला बॅंकेने जगदाळे यांना त्यांच्या खात्यातील रक्कम काढून घेण्यात आली असल्याचे बॅंकेत प्रत्यक्ष दाखवले होते. 

जगदाळे यांच्याप्रमाणेच गादेगाव येथील अर्जुन शंकर कदम यांनाही शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ झाला होता. त्यांना ५६ हजार ५१६ रुपये कर्जमाफी मिळाली होती. परंतु, श्री. कदम यांनाही त्यांच्या खात्यातील रक्कम शासनाने काढून घेतली असल्याचे बॅंकेने कळवले होते. त्यानंतर तब्बल १४ दिवसांनी सोमवारी (ता. २७) श्री. जगदाळे व श्री. कदम यांच्या खात्यात पुन्हा कर्जमाफीची रक्कम जमा झाल्याचे बॅंकेकडून कळविण्यात आले.

या संदर्भात श्री. जगदाळे यांना विचारले असता ते म्हणाले, की शनिवारी (ता. २५) दुपारी कर्जमाफीची रक्कम आपल्या खात्यात जमा झाल्याचा मोबाईलमध्ये एसएमएस आला. सोमवारी (ता. २७) बॅंकेत जाऊन प्रत्यक्ष पाहिले असता रक्कम पुन्हा खात्यात जमा झाल्याचे दिसून आले. आता संपूर्ण कर्जमाफी मिळाल्याने समाधान मिळाले आहे. 

या संदर्भात बॅंकेचे शाखाधिकारी शिवाजी रायभान यांना विचारले असता ते म्हणाले, श्री. जगदाळे व श्री. कदम यांचे खाते एनपीए (नॉन परफॉमिंग अकाउंट) असल्याने शासनाने तूर्तास कर्जमाफीची रक्कम परत घेतली होती. शासनाकडे निधी उपलब्ध झाल्यानंतर पुन्हा ही रक्कम दोन्ही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे.

इतर अॅग्रो विशेष
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...
दक्षिण आशियात यंदा सर्वसामान्य मॉन्सून...पुणे  : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या...
कृषिउद्योग महामंडळाकडून ‘बायोकॅप्सूल’चा...पुणे : सेंद्रिय शेतीकडे वळालेल्या शेतकऱ्यांच्या...
शासन दरबारी रब्बी हंगामात नागपूर...नागपूर  : खरिपानंतर पाण्याअभावी रब्बी...
बीटी बियाणे १५ मेपूर्वी विक्रीस मनाईपुणे : राज्यातील बियाणे उत्पादक कंपन्यांनी १५...
जमिनीचे जैविक पृथक्करणआजकाल शेतकऱ्यांना मातीचा पृथक्करण अहवाल करून...
सांगलीतून १२ टन द्राक्षे निर्यातसांगली ः यंदा प्रतिकूल परिस्थतीतही जिल्ह्यातील...
काळजी घ्या : उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : उन्हाच्या झळा वाढल्याने विदर्भ,...
शून्यातून राऊत दांपत्याने उभारली...लातूर जिल्ह्यात नागरसोगा (ता. औसा) येथील राऊत...
संत्रा बागेत काटेकोर पाणी व्यवस्थापन संत्रा पिकात पाणी व्यवस्थापन अत्यंत चोख ठेवावे...
दक्षिण अशियात मॉन्सूनचा पाऊस सरासरी...पुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...
राज्यात उरले अवघे ३०५ टीएमसी पाणीपुणे (प्रतिनिधी) : उन्हाच्या झळांना होरपळ वाढून...
केंद्राकडून यंदा खरिपात १२ टक्के अधिक...पुणे : राज्यासाठी गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत...