agriculture news in marathi, loan will be given for bamboo cultivation | Agrowon

बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना कर्ज देणार
मारुती कंदले
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

मंडळाने बांबूच्या बल्कोआ, ब्रारडीसी, नुतन्स, अस्पेर आणि तुलदा या पाच प्रजातींची लागवड करण्याचे ठरवले आहे.
-सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री

मुंबई : शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील उपलब्ध जागेवर बांबू उत्पादन घ्यावे, यासाठी नाबार्ड आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडून शेतकऱ्यांना कर्ज मिळावे, यासाठी महाराष्ट्र बांबू विकास मंडळाने प्रयत्न सुरू केले आहेत.

बांबू प्रजाती ही बहुउपयोगी असून शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील उपलब्ध जागेवर बांबू लागवड केल्यास त्यांना अतिरिक्त लाभ मिळू शकतो. याच कारणासाठी शासनाने बांबूला वन विभागाच्या वाहतूक परवान्यातून मुक्त केले आहे. यामुळे आदिवासी तसेच इतर युवकांनाही मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकेल. उत्पन्नवाढीतून त्यांच्या जीवनमानात सुधारणा होऊ शकेल. यासाठी बांबू विकास मंडळ प्रयत्न करत आहे.

विदर्भातील एकूण ८०० शेतकऱ्यांनी १०३५ हेक्टर जमीन बांबू पिकासाठी वापरण्यास परवानगी दिली आहे. शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध झाले, तर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात बांबूची लागवड करता येईल. बांबू विकास मंडळ शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी तांत्रिक मदत करणार आहे. शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षितता प्रदान करणारा बांबू नैसर्गिक प्रतिकूल परिस्थितीतही तग धरून राहतो.

संस्थांनी रोपे पुरविण्याचे मान्य केले
रत्नागिरी जिल्ह्यात दरवर्षी ३ हजार ट्रक मंगा बांबू प्रजातीची विक्री होते. बांबू विकास मंडळाने बंगलुरु, जबलपूर, रायपूर, येथील टिश्युकल्चर रोपे मिळवण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण केली असून तेथील संस्थांनी रोपे पुरविण्याचे मान्य केले आहे. मंडळाने बांबूच्या बल्कोआ, ब्रारडीसी, नुतन्स, अस्पेर आणि तुलदा या पाच प्रजातींची लागवड करण्याचे ठरवले आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

इतर ताज्या घडामोडी
बारामतीतील विकासाचे काम देशातील...बारामती : ग्रामीण विकासाच्या माध्यमातून सामान्य...
मराठवाड्यात पीककर्ज वितरण कासवगतीनेऔरंगाबाद : आढावा बैठकींचा सपाटा, काही ठिकाणी...
‘बोंड अळी व्यवस्थापनाचा महाराष्ट्र...परभणी : कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या...
रताळ्याच्या पिठापासून ‘अ’...टांझानियातील एका खासगी कंपनीने ‘अ’ जीवनसत्त्वांनी...
पोकराअंतर्गत ८४ गावांत आंतरपीक...परभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत...
पीककर्ज वाटपाचा टक्का वाढेनाअकोला  : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाच्या...
‘एकात्मिक व्यवस्थापनातून एकरी १०० टन ऊस...आळेफाटा, जि. पुणे : मातीपरीक्षणानुसार खतांचा...
फुलपिके लागवडीसाठी हवी निचऱ्याची जमीनखरीप हंगामात पाऊस भरपूर पडत असल्याने हा हंगाम...
कुलगुरू भट्टाचार्य यांचा राजीनामा अखेर...पुणे : दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
नाशिक बाजार समिती संचालकांवर गुन्हे...नाशिक : आचारसंहिता काळात शासकीय वाहनाचा वापर...
‘प्रलंबित वीजजोडणीसाठी मोबाईल नोंदणी...मुंबई : मार्च-२०१८ अखेर राज्यात...
पुणे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन...पुणे : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या...
ऊस उत्पादनवाढीसाठी तंत्रज्ञान...पुणे ः सहकारी साखर कारखाने शक्तिस्थळे असून,...
सातारा जिल्ह्यात सर्वदूर पाऊस; चार...सातारा : जिल्ह्यात दडी मारलेल्या पावसाने...
शेतकऱ्यांनी अपघात विमा योजनेचा लाभ...सातारा : राज्यातील सातबारा उताराधारक...
नगर जिल्ह्यात बियाण्यांची अवघी दहा...नगर ः खरिपासाठी जिल्ह्यामध्ये मागील तीन वर्षांची...
सांगली जिल्हा बॅंकेकडून २९८ कोटींचे...सांगली : खरीप हंगामाची तयारी सुरू झाली असताना...
तूर नोंदणीपासून वंचित ठेवल्याचा खुलासा...नगर : शेवगाव बाजार समितीअंतर्गत सुरू...
कोल्हापूर जिल्ह्याचा ३६५ कोटींचा योजना...कोल्हापूर : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत या...
कुपोषण मुक्तीसाठी शेतकऱ्याने शेवगा...नाशिक  : कुपोषण निर्मूलनाच्या कार्यास आपलाही...