agriculture news in marathi, Loans for 2% interest on drip | Agrowon

ठिबकसाठी २ टक्के व्याजाने कर्जपुरवठा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

सांगली ः पाण्याची बचत व ऊस उत्पादनवाढीसाठी कमी व्याजदरात कर्ज देण्यास राष्ट्रीयीकृत बॅंकांनीदेखील तयारी दर्शवली आहे. उसाला हेक्‍टरी २५ हजार घनमीटर पाणी लागते. ठिबकमुळे पन्नास टक्के पाणी कमी लागेल. ठिबकद्वारे खत व्यवस्थापनातून उत्पादकतेत वाढ होईल. जमिनीच्या सुपीकतेची जोपासना, वीजबिल आणि मजुरीत बचत होणार आहे.

सांगली ः पाण्याची बचत व ऊस उत्पादनवाढीसाठी कमी व्याजदरात कर्ज देण्यास राष्ट्रीयीकृत बॅंकांनीदेखील तयारी दर्शवली आहे. उसाला हेक्‍टरी २५ हजार घनमीटर पाणी लागते. ठिबकमुळे पन्नास टक्के पाणी कमी लागेल. ठिबकद्वारे खत व्यवस्थापनातून उत्पादकतेत वाढ होईल. जमिनीच्या सुपीकतेची जोपासना, वीजबिल आणि मजुरीत बचत होणार आहे.

राज्यात नव्या धोरणानुसार काही सिंचन प्रकल्पांमधून प्रवाही पद्धतीचे पाणी वितरण बंद केले जाणार आहे. सांगली जिल्ह्यातील टेंभूसह भीमा, मुळा, हतनूर, उर्ध्वपूस, कान्होळी नाला आणि अंबोली या प्रकल्पांच्या भागातील शेतकऱ्यांना बारमाही सिंचनासाठी हवे असल्यास ठिबक किंवा तुषार सिंचनचे बंधन घातले आहे, असे बंधन राज्यातील सर्व धरण प्रकल्पांवर भविष्यात सरकार लागू करणार आहे.

उत्तर प्रदेशमध्ये ठिबकसाठी ९० टक्के अनुदान मिळते. या योजनेत अनुदान नाही. जीएसटीमुळे ठिबक संचाच्या किमती एक लाखापर्यंत गेल्या असल्यामुळे ८५ हजारांत शेतकऱ्यांना संच देणे अवघड होणार आहे. ऊस ठिबक योजना राबविताना कृषी आयुक्तालयातील फलोत्पादन संचालक, साखर आयुक्तालय, साखर संघ, ऊस उत्पादकांच्या शेतकरी संघटना या घटकांशी चर्चा केली नसल्याचे दिसते.

या योजनेत शेतकऱ्यांना अनुदान मिळणार नसून, व्याजात भरपूर सूट मिळेल. ही योजना २०२४ पर्यंत सुरू राहणार आहे. बॅंका शेतकऱ्यांना सव्वासात टक्के दराने ठिबकसाठी कर्ज देतील, मात्र शेतकऱ्याने फक्त दोन टक्के व्याज भरायचे आहे. कमी व्याजात ठिबकला कर्ज देण्यासाठी शेतकऱ्यांतर्फे शासन चार टक्के व साखर कारखाने सव्वाटक्के व्याज भरणार आहेत. शेतकऱ्याला प्रवाही सिंचन पाणीपट्टीत २५ टक्के सवलत मिळेल.

इतर ताज्या घडामोडी
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी...
निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष;...पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना...
नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी...नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत...
सभा मोदींची; प्रशासनाने घेतली...नाशिक : लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ २२ एप्रिल...
नगर : पशुधन वाचविण्यासाठी इतर...नगर : जिल्ह्यात २८ लाख लहान-मोठे जनावरे आहेत....
सौर कृषिपंप योजना खोळंबलीजळगाव : सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मराठवाड्यात पाणीपुरवठ्यासाठी २३५९ टँकरऔरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळामुळे होणारी...
नत्र ऱ्हास रोखण्यासोबत वाढवता येईल...शेतकरी आपल्या मक्याच्या उत्पादनांचा अंदाज...
खानदेशात पाणंद रस्त्यांची कामे ठप्पजळगाव : खानदेशात जानेवारीत मंजुरी मिळालेल्या,...
म्हैसाळची विस्तारित योजना पूर्ण करणार...जत, जि. सांगली : ‘‘जत तालुक्याच्या पूर्व भागाला...
पुणे विभागात रब्बी कांद्याचे ३६ लाख टन...पुणे   ः रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी...
गारपीट, वादळी पावसाने पुणे जिल्ह्याला...पुणे  : जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या...
जळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ६५००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
अवकाळी पावसाने वऱ्हाडात दाणादाणअकोला   ः वऱ्हाडातील अनेक भागात...
नगर जिल्ह्यातील १२८ गावांत दूषित पाणीनगर  : ‘सर्वांना शुद्ध पाणी’ यासाठी सरकार...
आमच्या काळात एकही घोटाळा नाही :...सोलापूर : काँग्रेस आघाडी देशाला मजबूत करू...
सातारा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी...सातारा : जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून ढगाळ...
बहुपयोगी नत्रयुक्त खत `कॅल्शिअम...सावकाश उपलब्ध होण्याच्या क्षमतेमुळे कॅल्शियम...
जल, मृद्‌संधारणासाठी पूर्वमशागत...जमिनीमध्ये चांगले पीक उत्पादन येण्याकरिता भौतिक,...
कृषी सल्ला : भुईमूग, आंबा पीक भुईमूग शेंगा अवस्था भुईमूग पीक आऱ्या...