agriculture news in marathi, loans for marginal farmers will be waived, mumbai, maharashtra | Agrowon

अल्पभूधारक शेतकऱ्यांचे खावटी कर्ज माफ होणार
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018

मुंबई : शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमधून वगळण्यात आलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांची खावटी कर्जे माफ करण्याचा निर्णय कर्जमाफीसंबंधी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आहे. एकरकमी कर्ज परतफेड योजनेला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचाही निर्णय शासनाने केला आहे.

मुंबई : शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमधून वगळण्यात आलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांची खावटी कर्जे माफ करण्याचा निर्णय कर्जमाफीसंबंधी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आहे. एकरकमी कर्ज परतफेड योजनेला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचाही निर्णय शासनाने केला आहे.

शेतकरी कर्जमाफीचा आढावा बैठक महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झाली. या वेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आजपर्यंत २३ लाख ५१ हजार कर्ज खात्यांवरील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले असून, त्यापैकी २२ लाख १३ हजार खात्यांवर कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी या वेळी दिली.

अल्पभूधारक शेतकऱ्यांनी शेतीसाठी घेतलेली खावटी कर्ज माफ करण्यासंबंधी राज्य शासन विचार करत होते. यावर मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये चर्चा होऊन अल्पभूधारक शेतकऱ्यांची खावटी कर्जे माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती श्री. पाटील यांनी बैठकीनंतर दिली.या निर्णयाचा लाभ घेण्यासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहेत. त्यासाठी १ नोव्हेंबरपर्यंत http://aaplesarkar.maharashtra.gov.in/en/ संकेतस्थळावरुन ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे.

ओटीएसला तीन महिने मुदतवाढ
कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एकरकमी परतफेड करण्यासाठी ३० सप्टेंबर २०१८ पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्याला आता तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत शेतकरी याचा लाभ घेऊ शकणार आहेत. यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

इतर अॅग्रो विशेष
भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...
साखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...
कांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...
देशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...
किमान तापमानात चढ-उतार शक्य;...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे...
शेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...
पोकळ घोषणा, की भक्कम आधार  पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...
दुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...
मराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...
‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...
कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...
विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...
महिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...
द्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई  ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...
राज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...
देशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...