agriculture news in marathi, loanwaiver payment reversed without reason by goverment | Agrowon

कर्जमाफीची जमा झालेली रक्कम, पुन्हा काढून घेतली
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 नोव्हेंबर 2017

पंढरपूर, जि. सोलापूर : कर्जमाफीच्या अंमलबावणीतील घोळ अजूनही संपण्याचे नाव घेत नाही. पंढरपूर तालुक्‍यातील उपरी येथील देवानंद गणपत जगदाळे आणि गादेगाव येथील शेतकरी अर्जुन शंकर कदम यांच्या खात्यावर कर्जमाफी योजनेनुसार शासनाकडून पैसे जमा करण्यात आले; परंतु कोणतेही कारण न दाखवता या दोन्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेली रक्कम शासनाकडून पुन्हा काढून घेण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी औटघटकेची ठरली आहे. या निर्णयामुळे कर्जमाफीच्या घोळावर पुन्हा एकदा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

पंढरपूर, जि. सोलापूर : कर्जमाफीच्या अंमलबावणीतील घोळ अजूनही संपण्याचे नाव घेत नाही. पंढरपूर तालुक्‍यातील उपरी येथील देवानंद गणपत जगदाळे आणि गादेगाव येथील शेतकरी अर्जुन शंकर कदम यांच्या खात्यावर कर्जमाफी योजनेनुसार शासनाकडून पैसे जमा करण्यात आले; परंतु कोणतेही कारण न दाखवता या दोन्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेली रक्कम शासनाकडून पुन्हा काढून घेण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी औटघटकेची ठरली आहे. या निर्णयामुळे कर्जमाफीच्या घोळावर पुन्हा एकदा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

उपरी येथील देवानंद गणपत जगदाळे यांनी विदर्भ कोकण ग्रामीण बॅंकेच्या गादेगाव शाखेतून ६४ हजार ४०१ रुपये कर्ज घेतले होते. शासनाने कर्जमाफी योजना जाहीर केल्यानंतर श्री. जगदाळे यांच्या खात्यावर ३१ ऑक्‍टोबर रोजी कर्जाची रक्कम जमा झाली. त्यामुळे बॅंकेने जगदाळे त्यांना कर्जखाते संपल्याचे मोबाईलवर मेसेज पाठवून कळवले. परंतु १३ नोव्हेंबर रोजी बॅंकेने जगदाळे यांना त्यांच्या खात्यातील रक्कम काढून घेण्यात आली असल्याचे बॅंकेत प्रत्यक्ष दाखवून दिले. जगदाळे यांच्याप्रमाणेच गादेगाव येथील अर्जुन शंकर कदम यांनाही शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ झाला होता. त्यांना ५६ हजार ५१६ रुपये कर्जमाफी मिळाली होती. परंतु श्री. कदम यांनाही त्यांच्या खात्यातील रक्कम शासनाने परत काढून घेतली असल्याचे बॅंकेने कळवले आहे.

कोणतीही सूचना न देता या दोन्ही शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफी योजनेनुसार बॅंकेत जमा करण्यात आलेली रक्कम परत घेण्यात आली असल्याने या दोन्ही शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात श्री. जगदाळे यांना विचारले असता ते म्हणाले, कर्जमाफी मिळाल्याने दिलासा मिळाला होता, परंतु अवघ्या १२ दिवसांनंतर कर्जमाफीची रक्कम पुन्हा शासनाकडून काढून घेतली गेल्याने, आता परत आपल्या खात्यावर कर्जाची रक्कम दिसू लागली आहे. आपल्याला संपूर्ण कर्जमाफी मिळावी, ही अपेक्षा आहे. 

श्री. जगदाळे यांच्या खात्यावर ३१ ऑक्‍टोबर रोजी कर्जमाफी योजनेनुसार पैसे जमा झाले होते; परंतु १३ नोव्हेंबर रोजी पुन्हा त्यांच्या खात्यावर कर्जाची रक्कम दाखवली गेली आहे. या संदर्भात आपणही माहिती घेत आहोत.
- शिवाजी रायभान, शाखाधिकारी, विदर्भ कोकण ग्रामीण बॅंक

इतर ताज्या घडामोडी
मार्चअखेरपर्यंत टप्प्याटप्याने... मंदीतील ब्रॉयलर्सचा बाजार मार्चअखेरपर्यंत...
पुण्यात लसूण, फ्लॉवर, मटार वधारलापुणे ः वाढता उन्हाळ्यामुळे शेतीमालाचे उत्पादन...
चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये...चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये प्रति...
राहुल गडपाले ‘सकाळ’चे चीफ कन्टेंट क्‍...पुणे : सकाळ माध्यम समूहाच्या संपादक संचालकपदी...
सत्तावीस कारखान्यांकडून १ कोटी २१ लाख... नगर  ः नगर, नाशिक जिल्ह्यांत सुरू असलेल्या...
पुणे जिल्ह्यातील १०० मंडळांमध्ये... पुणे  ः हवामान अंदाजाबाबत अचूक माहिती...
लाचखोर तालुका कृषी अधिकारी 'लाचलुचपत'...अकोला : जलसंधारणाच्या केलेल्या कामांची देयके...
परभणी जिल्ह्यातील चार लघू तलाव कोरडे परभणी ः पाणीसाठा संपुष्टात आल्यामुळे...
स्वखर्चाने शेततळे करणाऱ्यांना मिळेना...औरंगाबाद : शेतीला पाण्याची सोय व्हावी म्हणून...
कोल्हापुरात गुळाचे पाडव्यानिमित्त सौदे कोल्हापूर : येथील बाजार समितीत पाडव्यानिमित्त...
साखरेप्रमाणे कापसासाठी धाेरण ठरवावे :...पुणे : साखरेप्रमाणेच कापसासाठी दरावर लक्ष कें....
राज्यात आज अन्नत्याग आंदोलनमाळकोळी, नांदेड ः आजवर आत्महत्या केलेल्या...
'ईव्हीएम'ऐवजी आता मतपत्रिकांचा वापर...नवी दिल्ली : आगामी निवडणुकांमध्ये इलेक्‍...
राज-पवार भेटीने चर्चेला उधाणमुंबई : दिल्ली येथे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
परभणीत ढोबळी मिरची १२०० ते १८०० रुपये... परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
औरंगाबाद येथे मोसंबी २००० ते ४५०० रुपये औरंगाबाद  : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी...
कृषी सल्लामार्च महिन्यात उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी करू...
पशू सल्लागोठ्यातील अस्वच्छतेमुळे बऱ्याचदा दुधाळ जनावरांना...
सांगलीतील द्राक्ष, बेदाणा उत्पादक ढगाळ... सांगली : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ...
जळगावमधील शेतकऱ्यांचा परदेश अभ्यास दौरा... जळगाव : परदेशातील शेतीचे तंत्रज्ञान, शेती,...