agriculture news in marathi, loanwaiver scheme | Agrowon

सरसकट कर्जमाफी मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही
टीम अॅग्रोवन
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

अर्धापूर, जि. नांदेड :  राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळेपर्यंत काँग्रेस स्वस्थ बसणार नाही. त्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल. सहकार क्षेत्रातील उद्योग अडचणीत आणण्यासाठी गेल्या तीन वर्षांत राजकीय हस्तक्षेप झाला. तसेच नैसर्गिक आपत्ती आली. पण या दोन्ही संकटांवर मात करून कारखाने वाचविल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी गुरुवारी  (ता.२) केले. 

अर्धापूर, जि. नांदेड :  राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळेपर्यंत काँग्रेस स्वस्थ बसणार नाही. त्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल. सहकार क्षेत्रातील उद्योग अडचणीत आणण्यासाठी गेल्या तीन वर्षांत राजकीय हस्तक्षेप झाला. तसेच नैसर्गिक आपत्ती आली. पण या दोन्ही संकटांवर मात करून कारखाने वाचविल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी गुरुवारी  (ता.२) केले. 

भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या २२ व्या गळीत हंगामाची सुरवात गुरुवारी गव्हाणीत ऊस मोळी टाकून करण्यात आली. या वेळी आयोजित शेतकरी मेळाव्यामध्ये खा.चव्हाण बोलत होते. या वेळी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार डी.पी.सावंत, माजी आमदार हणमंत पाटील बेटमोगरेकर, माधवराव पाटील जवळगावकर, कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव तिडके, बाजार समितीचे सभापती बी.आर. कदम, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर केशवराव इंगोले पाटील, जगदीश पाटील कल्याणकर, संजय देशमुख लहानकर, किशोर भवरे, उपमहापौर विनय पाटील गिरडे आदी उपस्थित होते. 

श्री. चव्हाण पुढे म्हणाले की, कारखाना चालवताना शेतकऱ्यांचे हित जोपासून काटकसरीने कारभार केला. आसवनी प्रकल्प पूर्ण झाल्यावर उसाला जादा भाव देता येईल. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, की राज्यातील फडणवीस सरकार हे आंधळ्यांचे व बहिऱ्यांचे सरकार आहे. या सरकारला कर्ज माफी द्यायची नाही. केवळ हे सरकार चालढकल करीत आहे. 

इतर बातम्या
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
मक्यातील लाग रंग येण्यामागील गूढ उलगडलेमक्यामध्ये काहीवेळा दिसणाऱ्या लाल रंगाच्या...
रब्बीत १०६ कोटींचे पीककर्ज वाटपपरभणी : यंदाच्या रब्बी हंगामामध्ये...
गव्हाची ६५ हजार ५४३ हेक्टरवर पेरणीनांदेड :नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा ६५...
एफआरपी तुकड्यात घेणार नाही : खासदार...सांगली : राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन ८० दिवस...
पाणी योजनांचा वीजपुरवठा सुरळीतजळगाव : जिल्ह्यातील सुमारे ९३५ गावांच्या...
पाणीपुरवठ्यांच्या देयकासाठी दोन कोटीअकोला : दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेल्या...
सांगली जिल्ह्यात हळद काढणीला वेगसांगली : जिल्ह्यात हळदीच्या काढणीला प्रारंभ झाला...
अपुऱ्या सदस्यांच्या उपस्थितीत जिल्हा...धुळे : पुरेशी सदस्यसंख्या नसतानाही (कोरम)...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
जतमधील ४२ गावांना कर्नाटकातून पाणीसांगली : जत तालुक्यातील ४२ गावांना कर्नाटकातून...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
पाण्याचे प्रस्ताव सादर करा : पालकमंत्रीसोलापूर : पाणीटंचाई भासणाऱ्या गावातील...
व्याज सवलती योजनेबाबत बँकांनी गांभीर्य...सोलापूर : पीककर्जाची नियमितपणे कर्जफेड...
राज्यात १७८६ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे  : सलग दोन वर्षे पावसाने ओढ दिल्यानंतर...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...