शेतकरी कर्जमाफीतील दीड लाखावरील थकबाकीस मुदतवाढ

दीड लाखावरील थकबाकीस मुदतवाढ
दीड लाखावरील थकबाकीस मुदतवाढ

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी आलेल्या एकूण ७७ लाख अर्जांपैकी ७० लाख अर्ज पात्र ठरले. त्यातील ४७ लाख ८८ हजार ९९५ शेतकऱ्यांची खाती ‘क्‍लिअर’ करण्यात आली आहेत. याशिवाय दीड लाखावरील कर्जाची थकबाकी भरण्यास ३१ डिसेंबरपर्यंत असलेली मुदत ३१ मार्चपर्यंत वाढविण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार (ता. २०) विधानसभेत केली.  विरोधकांनी सादर केलेल्या कर्जमाफीच्या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, की कर्जमाफीसाठी एकूण ७७ लाख अर्ज आले. त्यापैकी कर्जमाफी आणि ओटीएसच्या खात्यांची संख्या ३४ लाखांवर आहे. सर्व प्रकारच्या खात्यांमधील एकत्रित रक्कम २३ हजार ३०० कोटी एवढी आहे. शिवसेनेचे आमदार प्रकाश आबीटकर यांच्यासह माजी खासदार सुरेश मोरे यांच्या खात्यात बॅंकेच्या चुकीमुळे रक्कम जमा झाल्याची कबुली मुख्यमंत्र्यांनी दिली.  आबीटकरप्रकरणी मूळ अर्ज प्रकाश सुतार यांचा असून, केवळ चुकीने आबीटकरांच्या खात्याशी तो जोडला गेला आहे; तर माजी खासदार सुरेश मोरे यांच्या प्रकरणातही असाच प्रकार घडला असून, लताबाई सुरेश पाटील यांचा अर्ज आणि मोरेंचा खाते क्रमांक असा हा घोळ झाला आहे. ही ‘डेटा एरर’ची प्रकरणे असून, असे आणखी प्रकार असू शकतात. या त्रुटी दूर करून लवकरच खऱ्या अर्जधारकांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com