नाशिक जिल्हा बॅँकेच्या संचालकांच्या नियुक्तीसाठी लॉबिंग?

जिल्हा बॅँकेच्या संचालकांच्या नियुक्तीसाठी लॉबिंग?
जिल्हा बॅँकेच्या संचालकांच्या नियुक्तीसाठी लॉबिंग?

नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत रिक्त झालेल्या दोन जागा भरण्याचे राज्य सहकारी सहकार निवडणूक प्राधिकरणाचे आदेश आहेत. मात्र, प्राधिकरणाचे नियम वेशीला टांगून या दोन जागा भरण्याचा घाट संचालक मंडळाकडून सुरू असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. ठराविक माजी संचालकांसाठी संचालक मंडळाकडून अट्टहास केला जात असल्याची चर्चा आहे.

जिल्हा बँकेचे माजी संचालक अपूर्व हिरे (ओबीसी गट) व अद्वय हिरे (मालेगाव तालुका गट) यांनी गेल्या वर्षी राजीनामा दिला. तत्कालीन संचालक मंडळाने हे दोन्ही राजीनामे मंजूर केले. त्यामुळे या दोन्ही जागा रिक्त आहेत. त्या भरण्यासाठी निवडणूक प्राधिकरणाने बँकेला पत्र पाठविले. त्यात या रिक्त जागा, ज्या प्रवर्गातील आहेत, त्यातील सदस्यांमधून भराव्यात. त्यासाठी स्वीकृतीने संस्थेच्या समितीकडून संचालक मंडळाच्या सभेमध्ये निर्णय घ्यावा, असे आदेश आहेत. त्यासाठी प्राधिकरणाने कार्यपद्धती नमूद केली आहे. त्यात प्रामुख्याने इच्छुक पात्र सभासदांकडून अर्ज मागविणे, ती व्यक्ती सहकारातील तज्ज्ञ असावी, तिचा बँकेला लाभ होईल, असे नियम आहेत. परंतु, ते पायदळी तुडवून संचालक मंडळांकडून ठराविक व्यक्तींची नेमणूक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी काही संचालकांनी अट्टहास धरला असून, त्यासाठी आर्थिक देवाण-घेवाण झाल्याची जोरदार चर्चा जिल्हा बँकेच्या वर्तुळात आहे. अनेक संचालकांनी दबावतंत्र सुरू केल्याचे कळते. 

आगामी निवडणुका लक्षात घेऊन संचालकांनी नावे पुढे केल्याचे समजते. मात्र, यातील अनेक नावे ही नियमबाह्य आहेत. परंतु, ती निश्चित करण्याचा संचालकांकडून घाट घातला जात असल्याचे समजते. दरम्यान, या जागा भरण्याकरिता संचालक मंडळाची विशेष बैठक घेण्याची तयारी सुरू आहे. त्यात नावांवर शिक्कामोर्तब होईल.

सर्वपक्षीयांची तयारी दोन संचालकपदांसाठी जिल्हा बँकेचे माजी संचालक राजेंद्र भोसले, मविप्रचे चिटणीस अ‍ॅड. सुनील ढिकले, माजी संचालक राजेंद्र डोखळे, नाशिक मर्चंट बँकेचे माजी संचालक सोहनलाल भंडारी, माजी आमदार अनिल अहेर, शिवसेनेचे कुणाल दराडे, पंढरीनाथ थोरे यांच्या नावाची चर्चा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com