agriculture news in marathi, local administration did not give the details of the farmer's death | Agrowon

शेतकरी मृत्यूंची माहिती स्थानिक प्रशासनाने कळवली नाही
टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 डिसेंबर 2017

नागपूर : कापूस आणि सोयाबीन पिकांवर विषारी कीटकनाशक फवारणी केल्यामुळे काही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा विषबाधेने मृत्यू झाला होता. या संदर्भातील अहवाल गृह, कृषी, सार्वजनिक आरोग्य, ग्रामविकास आणि वन विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना सादर केला नाही, याची राज्य सरकारने कबुली दिली आहे. विधान परिषदेतील तारांकित प्रश्नाला कृषिमंत्री पाडुरंग फुंडकर यांनी दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती पुढे आली आहे.

नागपूर : कापूस आणि सोयाबीन पिकांवर विषारी कीटकनाशक फवारणी केल्यामुळे काही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा विषबाधेने मृत्यू झाला होता. या संदर्भातील अहवाल गृह, कृषी, सार्वजनिक आरोग्य, ग्रामविकास आणि वन विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना सादर केला नाही, याची राज्य सरकारने कबुली दिली आहे. विधान परिषदेतील तारांकित प्रश्नाला कृषिमंत्री पाडुरंग फुंडकर यांनी दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती पुढे आली आहे.

या संदर्भात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह इतर आमदारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी ही माहिती देताना म्हटले आहे, की विशेषतः विदर्भातील यवतमाळ, बुलडाणा, अकोला, वर्धा, नागपूर, चंद्रपूर तसेच खानदेश आणि मराठवाड्यात जुलै ते ऑक्टोबर २०१७ या कालावधीत बीटी कापूस आणि सोयाबीन पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना ५१ शेतकरी, शेतमजुरांचा मृत्यू झाला. यापैकी २१ शेतकरी यवतमाळमधील आहेत, तर ७८३ शेतकऱ्यांना यामुळे विषबाधा झाली. गृह, कृषी, सार्वजनिक आरोग्य, ग्रामविकास आणि वन विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी या विषबाधेबाबतचा अहवाल वरिष्ठांना सादर केला नाही, ही बाब खरी आहे.

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे. या समितीने या संदर्भातील अहवाल राज्य सरकारला नुकताच सादर केला आहे. कीटनाशके फवारणीमुळे विषबाधा होऊन मृत्यू झालेल्या १८ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांच्या विमा संरक्षणाचा लाभ देण्यासाठी विमा कंपन्यांकडे प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे कृषिमंत्री फुंडकर यांनी स्पष्ट केले आहे.

कीटकनाशक कायद्यातील तरतुदीनुसार दोषी बियाणे कंपन्या व विक्रेते यांच्यावर न्यायालयीन खटले, पोलिस गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच परवाना निलंबन, परवाना रद्द, कीटकनाशकांची जप्ती आणि विक्री बंद आदेश यासारखी कारवाईसुद्धा करण्यात आली आहे. तसेच कीटकनाशकांनी बाधित झालेल्या शेतकरी, शेतमजुरांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात यावी, अशी मागणी संघटनांनी केल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

इतर अॅग्रो विशेष
गोकुळकडून गायीच्या दूध खरेदी दरात २...कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा दूध संघाने (गोकुळ)...
तीस टन हापूसची रत्नागिरीतून थेट निर्यातरत्नागिरी ः रत्नागिरीतील प्रक्रिया केंद्रातून...
उन्हाचा चटका; उकाडा नकोसापुणे : मे महिन्याच्या सुरवातीपासून कमाल तापमान...
पूर्वमोसमी वळीवाच्या सरींचाही दुष्काळपुणे: उन्हाच्या झळा वाढल्याने राज्याला तीव्र...
ग्राम स्तरावरील पीककापणी प्रयोग रद्द !पुणे: राज्यात येत्या खरिपात पीकविम्यासाठी ग्राम...
पराभव मान्य; पण लढाई संपलेली नाही... :...राज्यातील शेतकरी चळवळीचा चेहरा असलेले स्वाभिमानी...
दुधाचा कृशकाळ सुरू होऊनही दर कमीच !पुणे: दुष्काळामुळे दुधाचा कृशकाळ सुरू झालेला असून...
उष्ण, कोरड्या हवामानाचा अंदाज पुणे: राज्यातील कमाल तापमानाचा पारा गेल्या काही...
एचटीबीटीविरोधात मोहीम तीव्र पुणे: राज्यात सुरू असलेल्या अनधिकृत तणनाशकाला...
फलोत्पादनासाठी अर्ज करण्यात नगर अव्वलनगर : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानअंतर्गत...
राज्यात पाणीटंचाईचा आलेख वाढताचपुणे: उन्हाचा चटक्याबरोबरच राज्यात पाणीटंचाईचा...
शेतकरी कंपन्या लातूरमध्ये उभारणार डाळी...लातूर : स्पर्धाक्षम बाजार घटक म्हणून शेतकरी...
देशातील जलाशयांमध्ये २१ टक्के पाणीसाठानवी दिल्ली ः उन्हाचा चटका वाढतानाच देशभरात...
नंदुरबारच्या दुर्गम भागात ‘सातपुडा भगर'...अक्कलकुवा तालुक्‍यातील आदिवासी महिला,...
गटशेती : काळाची गरजशेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने शेती...
शिक्षण, आरोग्य अन्‌ प्रशिक्षणातून...नांदगाव (ता. बोदवड, जि. जळगाव) गावामध्ये विजय...
सरकारबी मदत करंना अन्‌ बॅंका कर्ज देईनातनांदेड ः गेल्या वर्षीबी अन्‌ औंदाबी पावसानं मारलं...
पाण्याअभावी संत्राबागा होताहेत सरपणपरभणी ः जिल्ह्यातील प्रमुख संत्रा उत्पादक गाव...
‘कृष्णा’ आली दिघंचीच्या अंगणीदिघंची, जि. सांगली ः  अनेक वर्षे दिवास्वप्न...
जनावरांच्या बाजारातील व्यवहार उधारीवरचपरभणी: खरिपाच्या पेरणीच्या तोंडावर काहीशी...