टँकर मंजुरीचे अधिकार स्थानिक पातळीवर :शिंदे

टँकर मंजुरीचे अधिकार स्थानिक पातळीवर :शिंदे
टँकर मंजुरीचे अधिकार स्थानिक पातळीवर :शिंदे

सिन्नर, जि. नाशिक : ‘‘सिन्नर तालुक्यात पहिल्यांदाच भयानक दुष्काळीस्थिती ओढवली आहे. स्थिती गंभीर आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधी व जनतेने एकत्रित येऊन त्यावर मात करण्याची गरज आहे. टँकर सुरू करण्यासाठी उशीर लागू नये म्हणून त्याच्या मंजुरीचे अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात येणार असून, येत्या चार दिवसांत त्यावर निर्णय घतला जाईल,`` असे जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांनी सांगितले.

वावी, मुसळगाव या गावांमध्ये दुष्काळ पाहणी दौरा केल्यानंतर शिंदे यांनी सिन्नर पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठक घेतली. जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पंचायत समितीचे सभापती भगवान पथवे, उपसभापती जगन्नाथ भाबड, जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे, नीलेश केदार, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, उपविभागीय अधिकारी महेश पाटील, तहसीलदार नितीन गवळी, भाजपचे गटनेते विजय गडाख, शिवसेनेचे गटनेते संग्राम कातकाडे उपस्थित होते.

टंचाई आराखडा तयार करताना त्यात त्रुटी ठेवू नका. दुष्काळाचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करावा, दुष्काळ गंभीर स्थितीत असल्याचा अहवाल राज्य सरकारला सादर करावा, शेतकऱ्यांना पीकविम्याची भरपाई मिळेल, असे नियोजन प्रशासनाने करावे, अपूर्ण पाणी योजना वेळेत पूर्ण करा, भविष्यात जनावरांनाही पाणी कसे उपलब्ध करता येईल, याचाही निर्णय घेण्यात येईल. नरेगातून रस्ते होऊ शकतात. प्रत्येक गावात कामांच्या उपलब्धतेची माहिती चावडीवर लावावी. बारागावपिंप्रीसह सात गावे योजनांची पाहणी आमदार वाजे यांच्यासह जिल्हाधिकारी आठ दिवसांत करतील, अशा सूचना शिंदे यांनी दिल्या.

किती लोकसंख्येला पाणी पुरवले जाते याबाबत अधिकाऱ्यांना ठामपणे उत्तर देता आले नाही. बैठकीत एवढा गोंधळ तर नियोजनात किती असेल? अशा शब्दांत शिंदे यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.

भाजप-शिवसेना आमने-सामने

आढावा बैठक सुरू झाल्यानंतर भाजपचे गटनेते विजय गडाख यांनी पंचायत समितीतील अधिकारी पाणी नियोजनाची किंवा अन्य कोणतीही माहिती देत नसल्याची तक्रार केली. शिवसेनेचे उपसभापती जगन्नाथ भाबड यांनी सदर बैठक पंचायत समितीची नसल्याचे सांगितले. भाजप-सेना पुन्हा एकदा आमने-सामने आल्याचे चित्र दिसून आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com