agriculture news in Marathi, lock for congress office, Maharashtra | Agrowon

काँग्रेस भवनला ठोकले टाळे
टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 मार्च 2019

सांगली ः  सांगलीची लोकसभेची जागा मित्रपक्षाला देण्यास पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला. "नहीं चलेगी.. नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी'', "सांगली आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची'' अशा जोरदार घोषणा देत नेत्यांसमोरच कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस भवनला शुक्रावारी (ता. १५) टाळे ठोकले. युवा नेते विशाल पाटील समर्थकांनी टाळे ठोकल्यानंतर शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दोनच मिनिटांत ते उघडले. टाळे लावायचे की नाही यावरून गटबाजीही दिसून आली. 

सांगली ः  सांगलीची लोकसभेची जागा मित्रपक्षाला देण्यास पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला. "नहीं चलेगी.. नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी'', "सांगली आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची'' अशा जोरदार घोषणा देत नेत्यांसमोरच कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस भवनला शुक्रावारी (ता. १५) टाळे ठोकले. युवा नेते विशाल पाटील समर्थकांनी टाळे ठोकल्यानंतर शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दोनच मिनिटांत ते उघडले. टाळे लावायचे की नाही यावरून गटबाजीही दिसून आली. 

लोकसभेची सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्याबाबत सुरू असलेल्या हालचालीची माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी सकाळपासून कॉंग्रेस नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात चर्चा सुरू झाली होती. पदाधिकाऱ्यांना कार्यकर्ते मोबाईलवरून कॉल करून खात्री करून घेत होते. हक्काची जागा मित्र पक्षांना देऊ नये म्हणून पदाधिकारी व कार्यकर्ते संतप्त बनले. सांगलीची जागा कोणत्याही परिस्थितीत कॉंग्रेसशिवाय कोणाला द्यायची नाही, असा निर्धार करत नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते कॉंग्रेस कमिटीत एकत्र जमले.

सांगली लोकसभेची जागा ही काँग्रेस पक्षाकडे अनेक वर्षांपासून आहे. दादांचा हा बालेकिल्ला आहे.  मात्र या निवडणुकीत सांगलीची जागा ही अन्य पक्षाला देण्याची तयारी काँग्रेसकडून सुरू आहे. जागा काॅंग्रेसलाच मिळाली पाहिजे. अन्यथा निवडणुकीपर्यंत कुलूप लावले जाईल, असा इशारा कार्यकर्ते यांनी दिला. यानंतर काही वेळातच काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयाकडे धावले. कुलूप ठोकण्यापूर्वी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील, जयश्री पाटील तिथे आले. त्यानी कार्यकर्त्यांना शांत केले. पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील यांनी कॉंग्रेसला जागा मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

सांगलीचे ज्येष्ठ आणि निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी याचा निषेध करीत काँग्रेस कार्यालयाला कुलूप घातले. या वेळी पक्ष श्रेष्ठीच्या निर्णयाविरोधात सांगलीत काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले असून काँग्रेस हाय कमांडचा काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे.

टाळे ठोकण्यासाठी चढाओढ 
पदाधिकारी व कार्यकर्ते बैठकीत पृथ्वीराज पाटील समर्थक रवी खराडे यांनी टाळे ठोकण्याचा इशारा देत टाळे हातात घेऊन दरवाजा गाठला. परंतु टाळे ठोकू नये म्हणून काहींनी त्यांना विरोध करत समजावले. त्यामुळे खराडे, कार्यकर्ते शांत झाले. परंतु विशाल पाटील समर्थक उमेश पाटील व कार्यकर्त्यांनी अचानक घोषणाबाजी करत टाळे ठोकले. त्यावरून दोन गटातील चढाओढ दिसली. 

इतर ताज्या घडामोडी
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...
नाशिक जिल्हा बँकेने रेणुकादेवी संस्थेचा...नाशिक : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासमोर...
शेतकऱ्यांचा 'वसाका' प्रशासनाला घेरावनाशिक  : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी...
मीटर रीडिंगची पूर्वसूचना संदेशाद्वारे...सोलापूर  : ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर...
दिव्यांग मतदारांना सुविधा द्या :डॉ....सोलापूर : दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी...
कोल्हापुरात २३०० हेक्टरवर उन्हाळी पेरणीकोल्हापूर  : जिल्ह्यात उन्हाळी हंगामाची...
जळगावात गवारीला प्रतिक्विंटल ७५०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (...
नंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीरनंदुरबार  : जिल्ह्यातील पाणीटंचाई वाढत आहे....
पुणे विभागात ४१५ टॅंकरने पाणीपुरवठापुणे : विभागात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र...
रणजितसिंहाच्या भाजप प्रवेशाने खरच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यातील विशेषतः पश्चिम...
काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी बारा...मुंबई ः आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील...
आचारसंहिता भंगाच्या ७१७ तक्रारीमुंबई : नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी...
भाजपकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी...नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी तर...
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
इतिहासकालीन जलसंधारण अन् त्यामागचे...दरवर्षी पिढ्यानपिढ्या पावसाचे पाणी वेगवेगळे उपाय...
अभ्यासक्रमात हवा भूसूक्ष्मजीवशास्त्राचा...महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे असून, तिथे १२...