agriculture news in marathi, Lockup branch of District Bank opened after the promise of distribution of pikvima | Agrowon

पीकविमा वाटपाच्या आश्‍वासनानंतर उघडले बॅंकेचे कुलूप
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 जून 2018

कुंभार पिंपळगाव, जि. जालना : पीकविम्याचे पैसे उद्यापासून (ता. १९) वाटप करण्यात येतील, असे आश्‍वासन दिल्यानंतर स्थानिक जिल्हा बॅंक शाखेला शेतकऱ्यांनी लावलेले कुलूप उघडण्यात आले.

कुंभार पिंपळगाव, जि. जालना : पीकविम्याचे पैसे उद्यापासून (ता. १९) वाटप करण्यात येतील, असे आश्‍वासन दिल्यानंतर स्थानिक जिल्हा बॅंक शाखेला शेतकऱ्यांनी लावलेले कुलूप उघडण्यात आले.

मागील अनेक दिवसांपासून शेतकरी पीकविम्याच्या पैशांची वाट पाहत होते. दहा दिवसांपूर्वी पीकविमा बॅंकेत जमा झाला. मात्र जमा झालेल्या विम्याचे पैसे वाटप करण्यास विलंब होत असल्याच्या कारणाने शेतकरी संतप्त झाले होते. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. १८) जिल्हा बॅंकेच्या शाखेस कुलूप ठोकले. शाखा अधिकारी विजय कंटुले यांनी मंगळवारपासून पीकविम्याची रक्कम वाटप करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याने दुपारी कुलूप उघडण्यात आले.

जिल्हा बॅंकेच्या शाखेत गतवर्षी खरीप हंगामात १३ हजार शेतकऱ्यांनी एक कोटी दहा लाख रुपयांचा पीक विमा भरला होता. नैसर्गिक संकटामुळे सर्वच पिके हातची गेली. शेतकऱ्यांना पीकविम्याची चांगली रक्कम मिळेल, अशी आशा होती मात्र तुटपुंजी रक्कम मिळाली. दहा दिवसांपूर्वी ११ हजार शेतकऱ्यांचा चार कोटी ५०लाख रूपयांचा विमा बॅंकेत जमा झाला; मात्र हे पैसे वाटप करण्यास उशीर होत असल्याने संतप्त झालेल्या बापूसाहेब आर्दड, कुंडलिक आर्दड यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी बॅंकेला सकाळी कुलूप ठोकले. दरम्यान, मंगळवारपासून ए ते झेड या इंग्रजी अक्षरांप्रमाणे गावनिहाय रक्कम वाटप केली जाईल, असे सांगितल्याने दुपारी कुलूप उघडण्यात आले.

इतर ताज्या घडामोडी
अब आया उंट पहाड के निछे; राजू शेट्टींचा...सोलापूर : शेतकऱ्यांच्या दूध दराच्या प्रश्‍...
सरकार रिलायन्स, पतंजलीच्या दुधाची वाट...नागपूर : एकीकडे समाधानकारक पाऊस पडत असताना...
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस-...नागपूर : कधी देणार कधी देणार...कापूस, धानाला...
पीक सल्ला१६ जुलै ते ३१ जुलैपर्यंत पेरणी लांबल्यास संकरीत...
खानदेशात दूध आंदोलनास अल्प प्रतिसादजळगाव ः खानदेशात कुठेही दूध आंदोलनाला उग्र स्वरुप...
संत गजानन महाराज पालखीचे सोलापुरात...सोलापूर : पावसाच्या संततधार सरी झेलत ‘गण गण गणात...
रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेधसांगली ः दूध दरवाढीच्या स्वाभिमानी शेतकरी...
दूध दरप्रश्नी तारसा फाटा येथे आंदोलननागपूर  ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
पुणे जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलनपुणे  ः  दूध दरप्रश्‍नी स्वाभिमानी...
दूध दरप्रश्‍नी वऱ्हाडात आंदोलनअकोला   ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
मराठवाड्यात विविध ठिकाणी दूध संकलन बंदऔरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या आंदोलनाच्या...
नगर जिल्ह्यात दूध संकलन बंदनगर  : दूध दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी...
केनियात आढळल्या पिवळ्या वटवाघळांच्या...केनियामध्ये पिवळ्या रंगाच्या वटवाघळांच्या जनुकीय...
सातारा जिल्ह्यात दूध दर आंदोलनास मोठा...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला...
झाडांच्या संवर्धनामध्ये हवामान बदलासोबत...तापमानवाढीमुळे अधिक उंचीकडे किंवा उत्तरेकडे...
नागपूर, गडचिरोलीत संततधारनागपूर  : हवामान विभागाने विदर्भात सोमवारी (...
मराठवाड्यातील २४५ मंडळांत पावसाची रिपरिपऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी जवळपास...
पुणे जिल्ह्यात दमदार पाऊसपुणे   : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली...
अकोले तालुक्यात पावसाचा जोर कायमनगर   ः अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील २६...नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६...