agriculture news in marathi, lok sabha election campaign,aurangabad, maharashtra | Agrowon

मराठवाड्याचा पाणी प्रश्‍न सोडविणार : नितीन गडकरी
टीम अॅग्रोवन
रविवार, 21 एप्रिल 2019

पैठण, जि. औरंगाबाद   : पश्चिम घाटातून वाहून जाणारे पाणी आपल्याकडील नद्यांमध्ये आणले जाणार आहे. त्यासाठी ४० हजार कोटी रुपये खर्चाचे नियोजन असून ते पाणी जायकवाडी धरणात आणले जाईल. हे पाणी कालव्याऐवजी पाइपलाइनने द्यायचा विचार आहे. मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडविल्याशिवाय राहणार नाही. यासाठी भाजपचे मजबूत सरकार सत्तेवर आणा, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. 

पैठण, जि. औरंगाबाद   : पश्चिम घाटातून वाहून जाणारे पाणी आपल्याकडील नद्यांमध्ये आणले जाणार आहे. त्यासाठी ४० हजार कोटी रुपये खर्चाचे नियोजन असून ते पाणी जायकवाडी धरणात आणले जाईल. हे पाणी कालव्याऐवजी पाइपलाइनने द्यायचा विचार आहे. मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडविल्याशिवाय राहणार नाही. यासाठी भाजपचे मजबूत सरकार सत्तेवर आणा, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. 

पैठण येथे शनिवारी (ता. २०) जालना लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचार सभेत श्री. गडकरी बोलत होते. या वेळी आमदार संदीपान भुमरे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष रेखा कुलकर्णी, नगराध्यक्ष सूरज लोळगे, उपनगराध्यक्ष सुचित्रा जोशी, सुलोचना साळुंके, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सुनील शिंदे, माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी, दत्ता गोर्डे, ॲड. कांतराव औटे, दत्ता गोर्डे,  शेखर पाटील उपस्थित होते. 

श्री. गडकरी म्हणाले, की  राज्यातील सर्व देवस्थानांना जोडणाऱ्या रस्त्यांची कामे या सरकारच्या काळात झाली आहेत. सरकारने पाच वर्षात विकासाची कामे केली. पैठण-औरंगाबाद या मार्गाचे काम निवडणुकीनंतर तीन महिन्यांच्या आत केले जाणार आहे. या कामासाठीचा विकास आराखडा तयार आहे. यापुढे सिंचन प्रकल्प करताना पाइपलाइनचा उपयोग केला जाणार असून त्या माध्यमातून सिंचनासाठी पाणी देण्याची सोय केली जाणार आहे. राज्यात रस्त्यांची पाच लाख कोटींची कामे सुरू केली आहेत. दोन हजार कोटी रुपयांच्या बळिराजा प्रकल्पातून साडेपाच लाख हेक्‍टर शेती सिंचनाखाली आणली जाणार आहे. पंतप्रधान सिंचन योजनेंतर्गत राज्यातील प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यात मराठवाड्यातील चार प्रकल्पांचा समावेश आहे.

मराठवाड्यातील सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी येणाऱ्या काळात आयात-निर्यात उद्योग सुरू करण्यात येणार आहेत. जालना येथून या उद्योगाला सुरुवात करण्यात आली आहे. नदीजोड प्रकल्पामुळे महाराष्ट्राची सध्याची २० टक्‍क्‍यांवर असलेली सिंचन क्षमता ५० टक्के होणार आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी व आता नेहरू यांचे पणतु राहुल गांधी या देशात गरिबी हटावचा नारा देत आहेत. कॉंग्रेसचा नारा हा खोटा असून कॉंग्रेस हा जातीयवादी विष पेरणारा पक्ष असल्याचा आरोप त्यांनी केला.  

इतर बातम्या
कान्हूरपठार, करंदी परिसरात वादळी वा-...टाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः पारनेर...
वर्धा : रोजगारासाठी स्थलांतरामुळे गावं...वर्धा : शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून...
गावाेगावी पाण्याच्या टॅंकरकडं नजरानगरः तलाव, धरणं कोरडी पडली. कधीच आटल्या नाहीत,...
सेंद्रिय पशुपालन पक्ष्यांच्या...फिनलँड येथील युनिव्हर्सिटी ऑफ हेलसिंकी येथील...
शिकारीमुळे स्थानिक अन्नसुरक्षेवर होतोय...वर्षावनातील जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात होत...
नाशिकला डोंगराची काळी मैना विक्रीसाठी...नाशिक : आदिवासी भागात सध्या मोठ्या प्रमाणावर...
सिन्नर तालुक्यातील छावण्यांमध्ये १०९४...नाशिक : नाशिक जिल्ह्यात गेल्या महिण्याभरापासून...
सावळी मोहितकर ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून...नागपूर ः शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी स्तरावर...
हळदीला १० हजार रुपये क्विंटल हमीभाव...नांदेड : राज्य आणि केंद्र सरकारने हमीभावाच्या...
यवतमाळ जिल्ह्यात अधिग्रहित विहिरींना...उमरखेड, यवतमाळ ः पाणीटंचाई निवारण्यासाठी म्हणून...
चिखलीतील तेल्हारा धरणाच्या गेटदुरुस्तीस...बुलडाणा ः पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या चिखली...
हिंगोली : टॅंकरद्वारे ५६ हजार...हिंगोली : जिल्ह्यातील पाणीटंचाईची समस्या गंभीर...
अंबाबरवा अभयारण्यात चार वाघांचे दर्शनअकोला ः मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत...
गंगापुरात बनावट खतसाठा जप्तऔरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर येथील एका खत...
सहकार आयुक्तालयातील नियुक्त्यांचे घोळ...पुणे  : दुष्काळ, कर्जमाफी आणि घसरलेले...
चारा, पाण्याची व्यवस्था करा : आमदार...सांगोला, जि. सोलापूर  : राज्यात दुष्काळी...
संत्रा बाग वाळल्याने नयाखेडा येथील...अमरावती ः चार बोअरवेल घेतले, इतरांच्या...
गाळ उपसण्यासाठी गावकऱ्यांचे ‘एकीचे बळ'संगमेश्‍वर, जि. रत्नागिरी : ‘एकीचे बळ मिळते फळ’...
सोलापूर, माढ्याचा निकाल उशिरासोलापूर : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी...
झाडावर नाही, काळजावर घाव पडतात नगर ः ‘‘दहा वर्षांपूर्वी संत्र्याची लागवड केली...