agriculture news in marathi, lok sabha election campaign,nashik, maharashtra | Agrowon

कांदा दर वाढले, तेव्हा भाजपने विरोध केला : शरद पवार
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 एप्रिल 2019

नाशिक   ः कृषिमंत्री असताना मी निर्यातबंदी उठवली. त्या वेळी कांद्याचे भाव वाढले. विरोधात असलेल्या भाजपने संसद बंद करण्याचा घाट घातला होता. कांद्याचे भाव वाढले असताना विरोध करणारे हे सरकार कसे काय कांदा उत्पादकांना आधार देणार, गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक घोषणा केल्या. देशातील शेतीबाबत आणि शेतकऱ्यांच्या हिताचे कोणतेही काम केले नाही. अनेक घोषणा केल्या असताना अंमलबजावणी केल्याचे दाखवा, असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. 

नाशिक   ः कृषिमंत्री असताना मी निर्यातबंदी उठवली. त्या वेळी कांद्याचे भाव वाढले. विरोधात असलेल्या भाजपने संसद बंद करण्याचा घाट घातला होता. कांद्याचे भाव वाढले असताना विरोध करणारे हे सरकार कसे काय कांदा उत्पादकांना आधार देणार, गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक घोषणा केल्या. देशातील शेतीबाबत आणि शेतकऱ्यांच्या हिताचे कोणतेही काम केले नाही. अनेक घोषणा केल्या असताना अंमलबजावणी केल्याचे दाखवा, असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. 

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनराज महाले यांच्या प्रचारार्थ निफाड येथे बुधवारी (ता. २४) आयोजित प्रचारसभेत श्री. पवार बोलत होते. या वेळी आरपीआयचे (एकतावादी) नानासाहेब इंदिसे, ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, राजाराम पानगव्हाणे, माजी आमदार दिलीप बनकर, स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले, चांगदेवराव होळकर, माणिकराव बोरस्ते, राजेंद्र डोखळे उपस्थित होते. 

या वेळी श्री. पवार म्हणाले, की देशात शेतीबाबत जे काम केले ते पंतप्रधानांनी सांगावे. २०१७ ते १९ या काळात ११,९९८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतीबाबत धोरणे नसल्याने पीक उत्पादन घसरले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शेतीबाबत कोणतेही तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग व संबंधित कारखानदारी उभी केली नाही. शेती अडचणीत आल्याने देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आहे. 

कृषिमंत्री असताना मी निर्यातबंदी उठवली. त्या वेळी कांद्याचे भाव वाढले. विरोधात असलेल्या भाजपने संसद बंद करण्याचा घाट घातला होता. कांद्याचे भाव वाढले असताना विरोध करणारे हे सरकार कसे काय कांदा उत्पादकांना आधार देणार, असा सवाल श्री. पवार यांनी या वेळी केला. या सरकारला शेतीबद्दल आस्था नाही. आज शेतमालाला भाव नाही. सरकारकडे धोरणांचा अभाव असल्याने संपन्न नाशिक जिल्ह्यातही आत्महत्या वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची बाजू मांडणारे सरकार स्थापन करण्यासाठी साथ द्या, मी अजून थकलो नसून मोदी सरकारला घालविल्याशिवाय शांत बसणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 

यावेळी जयंत पाटील म्हणाले की, नरेंद्र मोदी हे सामान्यांचे प्रतिनिधित्व करत नाही. शेतमालाच्या बाबतीत या सरकारने फसवले आहे. या चालू वर्षात नाशिक जिल्ह्यात २५ शेतकरी आत्महत्या झाल्या. हे या सरकारचे अपयश आहे.
 
...तर कांद्याचे लिलाव का बंद केले?
मोदी सरकारचे धोरण व्यापार वाढविणार, शेतकऱ्यांना व्यवस्था देणार व अर्थव्यवस्था वाढविणार असल्याचे सांगितले जाते, तर मग सभेच्या पार्श्वभूमीवर सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून कांद्याचा लिलाव बंद करून बाजार समितीचे कामकाज व व्यवहार का थांबविले, असा सवाल शरद पवार यांनी या वेळी उपस्थित केला. 

इतर ताज्या घडामोडी
सेंद्रिय पशुपालन पक्ष्यांच्या...फिनलँड येथील युनिव्हर्सिटी ऑफ हेलसिंकी येथील...
सावळी मोहितकर ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून...नागपूर ः शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी स्तरावर...
हळदीला १० हजार रुपये क्विंटल हमीभाव...नांदेड : राज्य आणि केंद्र सरकारने हमीभावाच्या...
चिखलीतील तेल्हारा धरणाच्या गेटदुरुस्तीस...बुलडाणा ः पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या चिखली...
गंगापुरात बनावट खतसाठा जप्तऔरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर येथील एका खत...
सहकार आयुक्तालयातील नियुक्त्यांचे घोळ...पुणे  : दुष्काळ, कर्जमाफी आणि घसरलेले...
संत्रा बाग वाळल्याने नयाखेडा येथील...अमरावती ः चार बोअरवेल घेतले, इतरांच्या...
नाशिकमध्ये टरबूज प्रतिक्विंटल ७०० ते...नाशिक : नाशिकमध्ये टरबुजाची आवक ९६० क्विंटल झाली...
झाडावर नाही, काळजावर घाव पडतात नगर ः ‘‘दहा वर्षांपूर्वी संत्र्याची लागवड केली...
सातारा जिल्ह्यात २५४ टँकरद्वारे...सातारा  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळाची...
नगरमधील शेतकऱ्यांना साडेचाळीस कोटींचे...नगर  ः सरकारने कांद्याला प्रतिक्विंटल २००...
सांगलीत शेतकऱ्यांचा जनावरांसह मोर्चासांगली  : जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता...
वऱ्हाडात बाजी कुणाची?अकोला ः  लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही...
पुणे विभागात ‘जलयुक्त’ची आठ हजारांवर...पुणे : भूजल पातळी वाढविण्याच्या उद्देशाने...
नेता निवडीचा अधिकार राहुल गांधींनामुंबई  ः काँग्रेस पक्षाचा विधिमंडळ नेता...
लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची...नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून...
उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले...सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे...
नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठानांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे...
जलसंधारण कामांसाठी पुणे जिल्ह्याला ११...शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त...
पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर...रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी...