agriculture news in marathi, lok sabha election, mumbai, maharashtra | Agrowon

प्रभावी अपक्ष उमेदवारांमुळे लढती रंगतदार
टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 एप्रिल 2019

मुंबई : राज्यात तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील २१ पैकी सहा लोकसभा मतदारसंघांत राजकीयदृष्ट्या प्रभावी असलेल्या अपक्ष उमेदवारांनी दंड थोपटल्याने येथील लढती रंगतदार बनल्या आहेत. आमदार अनिल गोटे, हर्षवर्धन जाधव, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उमेदवारीमुळे महायुतीच्या उमेदवारांच्या अडचणीत भर पडली आहे. राजकीय उपद्रव्यमूल्य असलेले अपक्ष उमदेवार किती मते घेतात यावर युती आणि आघाडीचे भवितव्य अवलंबून आहे.

मुंबई : राज्यात तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील २१ पैकी सहा लोकसभा मतदारसंघांत राजकीयदृष्ट्या प्रभावी असलेल्या अपक्ष उमेदवारांनी दंड थोपटल्याने येथील लढती रंगतदार बनल्या आहेत. आमदार अनिल गोटे, हर्षवर्धन जाधव, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उमेदवारीमुळे महायुतीच्या उमेदवारांच्या अडचणीत भर पडली आहे. राजकीय उपद्रव्यमूल्य असलेले अपक्ष उमदेवार किती मते घेतात यावर युती आणि आघाडीचे भवितव्य अवलंबून आहे.

धुळ्यात आमदार अनिल गोटे यांनी भाजपचे अधिकृत उमेदवार सुभाष भामरे यांना आव्हान दिले आहे. धुळे महापालिका निवडणुकीत भाजपने केलेल्या अवमानाचा बदला घेण्यासाठी गोटे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. गोटे यांचा धुळे शहराच्या राजकारणावर प्रभाव आहे. याशिवाय धुळ्याच्या आसपास असलेल्या संपर्कामुळे गोटे ३० ते ३५ हजारांच्या आसपास मते घेतील, असा अंदाज आहे. त्यामुळे हा मतांचा खड्डा कसा भरून काढायचा? याची चिंता भाजपला आहे.

नाशिकमध्ये माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी शड्डू ठोकला आहे. कोकाटे हे शिवसेना, काँग्रेस असा प्रवास करून भाजपमध्ये दाखल झाले आहेत. युतीत नाशिकची जागा भाजपने लढवावी, अशी मागणी त्यांनी केली होती. परंतु, ही जागा शिवसेनेकडे गेल्याने कोकाटे यांनी बंड केले आहे. नाशिकच्या सिन्नर परिसरात कोकाटे यांना मानणारा एक वर्ग आहे. हा वर्ग त्यांच्यासोबत गेल्यास त्याचा परिणाम शिवसेनेवर होऊ शकतो. नाशिकमध्ये शिवसेनेचे हेमंत गोडसे आणि राष्ट्रवादीचे समीर भुजबळ यांच्यात लढत आहे.

नंदूरबार मतदारसंघात भाजपच्या डॉ. सुहास नटावदकर यांनी बंडखोरी केली आहे. डॉ. नटावदकर यांनी २००४ आणि २००९ ची लोकसभा निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढवली. दोन्ही निवडणुकीत त्यांना काँग्रेसच्या माणिकराव गावित यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. भाजपने नंदूरबारमधून डॉ. हिना गावित यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नाराज डॉ. नटावदकर हे अपक्ष म्हणून निवडणूक मैदानात उतरले आहेत. नंदूरबारमध्ये काँग्रेस आणि भाजप यांच्यात सामना आहे. 

औरंगाबादमध्ये आमदार हर्षवर्धन जाधव यांची उमेदवारी शिवसेनेसाठी अडचणीची ठरत आहे. जाधव हे ट्रॅक्टर चिन्ह घेऊन लढत आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जाधव हे कन्नडमधून विधानसभेवर निवडून आले होते. मात्र, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. जाधव यांच्या उमेदवारीमुळे मराठा मते विभागली जाण्याची शक्यता आहे. औरंगाबादमध्ये शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, काँग्रेसचे सुभाष झांबड आणि एमआयएमचे इम्तियाज जलिल अशी लढत आहे. शिर्डी मतदारसंघात माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे तर नगरमध्ये संजीव भोर हे अपक्ष उमेदवार नशीब अजमावत आहेत.

इतर ताज्या घडामोडी
लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची...नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून...
उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले...सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे...
नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठानांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे...
जलसंधारण कामांसाठी पुणे जिल्ह्याला ११...शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त...
पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर...रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी...
अठराशेवर गावांमध्ये घेतल्या जाणार २६५२...औरंगाबाद   : येत्या खरीप हंगामात...
खानदेशात बाजरी मळणीचा हंगाम आटोपलाजळगाव  ः खानदेशात बाजरीचा मळणी हंगाम आटोपला...
धुळे, नंदुरबारमध्ये राष्ट्रीयीकृत...धुळे : धुळे व नंदुरबार जिल्हा बॅंकेने १२ हजारांवर...
कोल्हापुरात ‘पाणीबाणी’ची शक्यताकोल्हापूर : जिल्ह्यात वेळेवर पाऊस सुरू न झाल्यास...
आरग येथे नागिलीच्या पानांचे सौदे सुरूसांगली  ः कधीकाळी खाण्यासाठी वापरण्यात...
अकोला जिल्ह्यात २० टक्क्यांपर्यंत...अकोला :  आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पीक...
नगर जिल्ह्यातील १२४ गावांचे पाणी दूषितनगर  : जिल्ह्यातील २६४५ गावांचे पाणीनमुने...
बुलडाणा जिल्हा कृषी विक्रेता संघटनेच्या...बुलडाणा ः जिल्हा कृषी विक्रेता संघटनेची १४...
निफाड तालुक्यात द्राक्षबागांच्या...नाशिक  : निफाड तालुक्यातील द्राक्षबागांमध्ये...
सोलापूर जिल्हा परिषद करणार ‘रोहयो’ची...सोलापूर ः जिल्हा परिषदेच्या वतीने यंदाच्या...
भूगर्भात पाणीसाठा टिकविण्यासाठी भूमिगत...भूमिगत बंधारा बांधण्याचे काम जमिनीखाली असल्याने...
सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांत टाकली...नागपूर ः दुष्काळी मदत नाही, कर्जमाफीच्या...
वडगाव येथील पाटबंधारे कार्यालयासमोर...वडगाव निंबाळकर, जि. पुणे  ः नीरा डावा...
पुणे बाजार समितीवर पुन्हा प्रशासकीय...पुणे : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पुणे बाजार...
अळिंबी उत्पादनातून केली संकटांवर मातलोणी (जि. जळगाव) येथील अनिल माळी यांच्याकडे कृषी...