agriculture news in marathi, lok sabha election, nagar, maharashtra | Agrowon

नगर मतदारसंघात अठरा लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क
टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 एप्रिल 2019

नगर  : नगर मतदारसंघात १८ लाख ५४ हजार २४८ मतदारांची अद्ययावत यादी तयार आहे. यात नऊ लाख ७० हजार ६३१ पुरुष, आठ लाख ८३ हजार ५२९ महिला व अन्य ८८ मतदारांचा समावेश आहे.  मंगळवारी (ता. २३) मतदान होणार आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. 

नगर  : नगर मतदारसंघात १८ लाख ५४ हजार २४८ मतदारांची अद्ययावत यादी तयार आहे. यात नऊ लाख ७० हजार ६३१ पुरुष, आठ लाख ८३ हजार ५२९ महिला व अन्य ८८ मतदारांचा समावेश आहे.  मंगळवारी (ता. २३) मतदान होणार आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. 

जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद पार पडली. पोलिस अधीक्षक इशू सिंधू, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील, जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण, नायब तहसीलदार प्रशांत गोसावी आदी या वेळी उपस्थित होते. 

द्विवेदी म्हणाले, की दिव्यांग, वयोवृद्ध मतदारांना मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. १५२ मतदान केंद्रांवर निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. १९२ मतदान केंद्रांवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.  सर्व मतदान केंद्रांवर आठ हजार ९३२ अधिकारी व कर्मचारी, तसेच १९८ क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतदान साहित्य घेऊन जाणारे अधिकारी व कर्मचारी एक दिवस आधीच ४४६ वाहनांद्वारे मतदान केंद्रांवर पोचतील. या वाहनांना जीपीएस प्रणालीची व्यवस्था करण्यात आली आहे.

नगर मतदारसंघात एकही मतदान केंद्र संवेदनशील नाही. तरीही संशयास्पद असलेल्या काही ठिकाणांवर करडी नजर राहणार असून, मोठा फौजफाटा तैनात राहील. नगर मतदारसंघात दहा मतदान केंद्रे सखी मतदान केंद्र म्हणून निश्‍चित करण्यात आले आहेत. मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात नियुक्त करण्यात आलेले अधिकारी, कर्मचारी वगळता इतरांना मोबाईल बाळगण्यास बंदी आहे. दोनशे मीटर हद्दीबाहेर उमेदवारांना बूथ लावण्यास परवानगी असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 
 
व्होटर्स स्लीपवर चिन्ह आढळल्यास कारवाई 
नगर मतदारसंघात १४ लाख १२ हजार ८२९ मतदारांना मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत व्होटर्स स्लीपचे वाटप करण्यात आले आहे. उमेदवारांनी व्होटर्स स्लीप वाटताना सुधारित मतदार यादीचा उपयोग करावा. परंतु स्लीपवर चिन्ह येणार नाही, याची दक्षता घ्यावी, असा प्रकार आढळल्यास कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

इतर ताज्या घडामोडी
सेंद्रिय पशुपालन पक्ष्यांच्या...फिनलँड येथील युनिव्हर्सिटी ऑफ हेलसिंकी येथील...
सावळी मोहितकर ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून...नागपूर ः शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी स्तरावर...
हळदीला १० हजार रुपये क्विंटल हमीभाव...नांदेड : राज्य आणि केंद्र सरकारने हमीभावाच्या...
चिखलीतील तेल्हारा धरणाच्या गेटदुरुस्तीस...बुलडाणा ः पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या चिखली...
गंगापुरात बनावट खतसाठा जप्तऔरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर येथील एका खत...
सहकार आयुक्तालयातील नियुक्त्यांचे घोळ...पुणे  : दुष्काळ, कर्जमाफी आणि घसरलेले...
संत्रा बाग वाळल्याने नयाखेडा येथील...अमरावती ः चार बोअरवेल घेतले, इतरांच्या...
नाशिकमध्ये टरबूज प्रतिक्विंटल ७०० ते...नाशिक : नाशिकमध्ये टरबुजाची आवक ९६० क्विंटल झाली...
झाडावर नाही, काळजावर घाव पडतात नगर ः ‘‘दहा वर्षांपूर्वी संत्र्याची लागवड केली...
सातारा जिल्ह्यात २५४ टँकरद्वारे...सातारा  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळाची...
नगरमधील शेतकऱ्यांना साडेचाळीस कोटींचे...नगर  ः सरकारने कांद्याला प्रतिक्विंटल २००...
सांगलीत शेतकऱ्यांचा जनावरांसह मोर्चासांगली  : जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता...
वऱ्हाडात बाजी कुणाची?अकोला ः  लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही...
पुणे विभागात ‘जलयुक्त’ची आठ हजारांवर...पुणे : भूजल पातळी वाढविण्याच्या उद्देशाने...
नेता निवडीचा अधिकार राहुल गांधींनामुंबई  ः काँग्रेस पक्षाचा विधिमंडळ नेता...
लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची...नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून...
उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले...सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे...
नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठानांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे...
जलसंधारण कामांसाठी पुणे जिल्ह्याला ११...शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त...
पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर...रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी...