agriculture news in marathi, lok sabha election third phase, mumbai, maharashtra | Agrowon

राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदान
टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 एप्रिल 2019

मुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 14 मतदार संघांमध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजे 61.30 टक्के मतदान झाले असून काही मतदान केंद्रांवर सायंकाळी सहानंतरही मतदारांच्या रांगा असल्याने उशिरापर्यंत मतदान सुरु होते. दिवसभरात कुठेही अनुचित प्रकार घडल्याची घटना झाली नसून मतदान शांततेत पार पडले. राज्यात आतापर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये 63.04 टक्के, दुसऱ्या टप्प्यात 62.88 टक्के मतदान झाले आहे, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

मुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 14 मतदार संघांमध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजे 61.30 टक्के मतदान झाले असून काही मतदान केंद्रांवर सायंकाळी सहानंतरही मतदारांच्या रांगा असल्याने उशिरापर्यंत मतदान सुरु होते. दिवसभरात कुठेही अनुचित प्रकार घडल्याची घटना झाली नसून मतदान शांततेत पार पडले. राज्यात आतापर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये 63.04 टक्के, दुसऱ्या टप्प्यात 62.88 टक्के मतदान झाले आहे, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सह मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, उप मुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड उपस्थित होते.

दरम्यान, काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशिन आणि व्हीव्हीपॅट यंत्रात बिघाड झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ते तात्काळ बदलून देण्यात आले. आज झालेल्या 14 मतदार संघात एकूण 249 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. तर 28 हजार 691 मतदान केंद्रांपैकी 3 हजार 825 मतदान केंद्रांचे लाईव्ह वेबकास्टींग करण्यात आले. 1 लाख 54 हजार कर्मचारी या मतदान केंद्रांवर कार्यरत होते. 90 मतदान केंद्रांवर संपूर्ण महिला कर्मचारी होत्या तर चार मतदान केंद्र दिव्यांग कर्मचाऱ्यांद्वारे कार्यरत होती.

तिसऱ्या टप्प्यात सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजित मतदान अशाप्रकारे : जळगाव 58.00 टक्के, रावेर 58.00 टक्के, जालना 63.00 टक्के, औरंगाबाद 61.87 टक्के, रायगड 58.06 टक्के, पुणे 53.00 टक्के, बारामती 59.50 टक्के, अहमदनगर 63.00 टक्के, माढा 63.00 टक्के, सांगली 64.00 टक्के, सातारा 57.06 टक्के, रत्नागिरी-सिंधुदुर्ग 62.26 टक्के, कोल्हापूर 69.00 टक्के, हातकणंगले 68.50 टक्के. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत या 14 मतदार संघात 62.88 टक्के मतदान झाले होते.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील १४ मतदारसंघांमध्ये मंगळवारी (ता. २३) सायंकाळी पाच वाजेपर्यंत बहुतांश ठिकाणी शांततेत आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान प्रक्रिया पार पडली. 

तिसऱ्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, उदयनराजे भोसले, भाजपचे रावसाहेब दानवे, गिरीश बापट, संजयकाका पाटील, शिवसेनेचे अनंत गिते, चंद्रकांत खैरे, ‘स्वाभिमानी’चे राजू शेट्टी आदींसह तब्बल २४९ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम यंत्रात बंद झाले.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील १४ मतदारसंघांत मंगळवारी मतदानप्रक्रिया पार पडली. जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, नगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या मतदारसंघांत या टप्प्यात मतदान झाले.

दुपारी ३ वाजेपर्यंत याठिकाणी सरासरी ४६.२८ टक्के मतदान झाले होते. दुपारी तीन वाजेपर्यंत जळगाव येथे ४२.६२, रावेर येथे ४६.०४, जालन्यात ४९.४०, औरंगाबादमध्ये ४७.३६, रायगडमध्ये ४७.९७, पुण्यात ३६.२९, बारामतीत ४५.३५, नगरमध्ये ४५.६५ टक्के, माढा येथे ४४.१३, सांगलीत ४६.६४, साताऱ्यात ४४.७७, रत्नागिरी-सिंधुदुर्गात ४७.१८, कोल्हापुरात ५४.२४, हातकणंगलेत ५२.२७ टक्के मतदान झाले. 

दुपारी रणरणत्या उन्हातही मतदार उत्साहाने मतदानासाठी येत होते. कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात, तर चुरशीने मतदान होताना दिसून आले. त्यामुळे याठिकाणी दुपारी तीनपर्यंतच मतदानाचा टक्का ५० टक्क्यांच्या पुढे गेला होता. पुणे लोकसभा मतदारसंघात मात्र मतदारांचा निरुत्साह दिसून आला. त्यामुळे त्याठिकाणी मतदानाचा टक्का घसरल्याचे पाहायला मिळाले.

मतदानाची वेळ संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असल्याने मतदानाच्या टक्केवारीत आणखी वाढ झाली. संध्याकाळी पाचपर्यंत या सर्व चौदा मतदारसंघांत सरासरी ५५ टक्के मतदान झाले. त्यामुळे आता वाढलेल्या मतांचा लाभ कुणाला होणार आणि पुण्यात मतदानाच्या टक्केवारीत घट झाल्याने त्याचा तोटा कोणाला होईल, याबाबत तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. तिसऱ्या टप्प्यात एकूण २ कोटी ५७ लाख ८९ हजार ७३८ मतदार मतदानासाठी पात्र होते. यात १ कोटी ३३ लाख १९ हजार १० पुरुष, १ कोटी २४ लाख ७० हजार ७६ महिला आणि ६५२ इतर नागरिक मतदार होते.

इतर बातम्या
कान्हूरपठार, करंदी परिसरात वादळी वा-...टाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः पारनेर...
वर्धा : रोजगारासाठी स्थलांतरामुळे गावं...वर्धा : शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून...
गावाेगावी पाण्याच्या टॅंकरकडं नजरानगरः तलाव, धरणं कोरडी पडली. कधीच आटल्या नाहीत,...
सेंद्रिय पशुपालन पक्ष्यांच्या...फिनलँड येथील युनिव्हर्सिटी ऑफ हेलसिंकी येथील...
शिकारीमुळे स्थानिक अन्नसुरक्षेवर होतोय...वर्षावनातील जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात होत...
नाशिकला डोंगराची काळी मैना विक्रीसाठी...नाशिक : आदिवासी भागात सध्या मोठ्या प्रमाणावर...
सिन्नर तालुक्यातील छावण्यांमध्ये १०९४...नाशिक : नाशिक जिल्ह्यात गेल्या महिण्याभरापासून...
सावळी मोहितकर ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून...नागपूर ः शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी स्तरावर...
हळदीला १० हजार रुपये क्विंटल हमीभाव...नांदेड : राज्य आणि केंद्र सरकारने हमीभावाच्या...
यवतमाळ जिल्ह्यात अधिग्रहित विहिरींना...उमरखेड, यवतमाळ ः पाणीटंचाई निवारण्यासाठी म्हणून...
चिखलीतील तेल्हारा धरणाच्या गेटदुरुस्तीस...बुलडाणा ः पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या चिखली...
हिंगोली : टॅंकरद्वारे ५६ हजार...हिंगोली : जिल्ह्यातील पाणीटंचाईची समस्या गंभीर...
अंबाबरवा अभयारण्यात चार वाघांचे दर्शनअकोला ः मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत...
गंगापुरात बनावट खतसाठा जप्तऔरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर येथील एका खत...
सहकार आयुक्तालयातील नियुक्त्यांचे घोळ...पुणे  : दुष्काळ, कर्जमाफी आणि घसरलेले...
चारा, पाण्याची व्यवस्था करा : आमदार...सांगोला, जि. सोलापूर  : राज्यात दुष्काळी...
संत्रा बाग वाळल्याने नयाखेडा येथील...अमरावती ः चार बोअरवेल घेतले, इतरांच्या...
गाळ उपसण्यासाठी गावकऱ्यांचे ‘एकीचे बळ'संगमेश्‍वर, जि. रत्नागिरी : ‘एकीचे बळ मिळते फळ’...
सोलापूर, माढ्याचा निकाल उशिरासोलापूर : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी...
झाडावर नाही, काळजावर घाव पडतात नगर ः ‘‘दहा वर्षांपूर्वी संत्र्याची लागवड केली...