बारामतीत शांततेत मतदान

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या

पुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी (ता. २३) शांततेत मतदान झाले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत  बारामती मतदारसंघात ५९.५० टक्के मतदान झाले. उन्हाचा चटका असतानाही मतदार रांगा लावून मतदान करत असल्याचे दिसून आले, बॅटरी संपल्याने र्इव्हीएम बदलाव्या लागण्याची एखादं दुसरी घटना वगळता कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.  

सकाळी सात वाजता मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाल्यानंतर मतदानासाठी गर्दी झाली होती. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी बारामतीतील रिमांड होममध्ये, कांचन कुल यांनी दौंड, नवनाथ पडळकर यांनी बारामतीतील तांदुळवाडी येथे मतदानाचा हक्क बजावला. दुपारनंतर उन्हाच्या तीव्रतेने मतदानावर काहीसा परिणाम झाल्याचे चित्र दिसले. मात्र, दुपारी तीन नंतर पुन्हा मतदानाने वेग घेतला होता. यंदा व्हीलचेअरच्या सुविधेमुळे ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींची सोय झाली.  

यंदाच्या निवडणुकीत प्रथमच मतदान करण्याची संधी मिळालेल्या युवकांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. प्रथमच व्हीव्हीपॅट मशिनचा वापर करण्यात येत आहे. मतदाराला आपल्या आवडीच्या उमेदवाराला मतदान केल्यानंतर तत्काळ ‘व्हीव्हीपॅट मशिन’च्या स्क्रीनवर संबंधित उमेदवाराचा क्रमांक, नाव व निशाणी दिसत असल्याने आपण केलेले मतदान त्याच उमेदवाराला मिळाले याची खात्री होत असल्याने जुन्या मतदारांसह नवीन मतदारांमध्ये कमालीची उत्‍सुकता पहावयास मिळाली.  विधानसभा निहाय मतदानाची टक्केवारी (सायंकाळी पाचपर्यंत) : दौंड - ५२.०१, इंदापूर-५१.२०,बारामती-६२.८०, पुरंदर-५२.७०, भोर-४८.४४, खडकवासला-४६.८७.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com