agriculture news in marathi, lok sabha election voting,nagar, maharashtra | Agrowon

नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदान
टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 एप्रिल 2019

नगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३) मतदान प्रक्रिया पार पडली. तांत्रिक बिघाडामुळे मशिन बंद होण्याचे काही प्रकार वगळता मतदारसंघात मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. उन्हाचा तडाखा असूनही मतदानासाठी नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस, शिवसेना- भाजप, बहुजन वंचित आघाडी या पक्षांसह १९ उमेदवार रिंगणात होते. सायंकाळी सहा वाजेपर्यंत 63 टक्के मतदान झाले. महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिकांसह दिव्यांग व्यक्तींचाही मतदानासाठी उत्साह दिसत होता.

नगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३) मतदान प्रक्रिया पार पडली. तांत्रिक बिघाडामुळे मशिन बंद होण्याचे काही प्रकार वगळता मतदारसंघात मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. उन्हाचा तडाखा असूनही मतदानासाठी नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस, शिवसेना- भाजप, बहुजन वंचित आघाडी या पक्षांसह १९ उमेदवार रिंगणात होते. सायंकाळी सहा वाजेपर्यंत 63 टक्के मतदान झाले. महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिकांसह दिव्यांग व्यक्तींचाही मतदानासाठी उत्साह दिसत होता.

राज्यात सातत्याने चर्चेत राहिलेल्या नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदारसंघात १८ लाख ५६ हजार मतदार होते. २०३० मतदान केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडली. सायंकाळी चार वाजेपर्यंत ५० टक्के मतदान झाले. सकाळी सात वाजता मतदानाला सुरवात झाली. सध्या उन्हाचे दिवस असल्याने सकाळीच मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. दुपारी नऊ वाजेपर्यंत दहा टक्के, अकरा वाजेपर्यंत ३० टक्के, एक वाजेपर्यंत ४० टक्के, तर सायंकाळी चार वाजेपर्यंत सरासरी ५० टक्के मतदान झाले.

जिल्ह्यामध्ये अनेक भागांत या वेळी तांत्रिक बिघाडामुळे मतदान यंत्रे बंद पडण्याचे प्रकार घडले. त्यामुळे प्रशासनाला मशिन बदलण्यासाठी धावपळ करावी लागली. त्यामुळे मात्र सुरवातीला एक ते दीड तास मतदान प्रक्रिया उशिराने सुरू झाली. अनेक ठिकाणी मतदारांचे स्वागत करण्यात आले. राज्यात याआधी मोबाईलचा मतदान करतेवेळी गैरवापर झाल्याचे प्रकार घडल्यामुळे नगरमध्ये मोबाईल घेऊन मतदान केंद्रात प्रवेश दिला जात नव्हता. काही ठिकाणी पोलिसांकडून मतदारांना मोबाईलच्या कारणावरून अरेरावी केली जात होती.

नगरमध्‍ये रेणावीकर शाळेतील मतदान केंद्रात पोलिसांकडून नागरिकांची हेळसांड करण्यात आल्याचे सांगण्यात आले. दुपारी चारनंतर पुन्हा मतदारांनी मतदानासाठी केंद्रावर गर्दी केली होती. राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांनी नगर शहरात, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रवादी व भाजपकडून विजयाचा दावा केला जात आहे.

इतर ताज्या घडामोडी
लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची...नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून...
उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले...सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे...
नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठानांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे...
जलसंधारण कामांसाठी पुणे जिल्ह्याला ११...शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त...
पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर...रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी...
अठराशेवर गावांमध्ये घेतल्या जाणार २६५२...औरंगाबाद   : येत्या खरीप हंगामात...
खानदेशात बाजरी मळणीचा हंगाम आटोपलाजळगाव  ः खानदेशात बाजरीचा मळणी हंगाम आटोपला...
धुळे, नंदुरबारमध्ये राष्ट्रीयीकृत...धुळे : धुळे व नंदुरबार जिल्हा बॅंकेने १२ हजारांवर...
कोल्हापुरात ‘पाणीबाणी’ची शक्यताकोल्हापूर : जिल्ह्यात वेळेवर पाऊस सुरू न झाल्यास...
आरग येथे नागिलीच्या पानांचे सौदे सुरूसांगली  ः कधीकाळी खाण्यासाठी वापरण्यात...
अकोला जिल्ह्यात २० टक्क्यांपर्यंत...अकोला :  आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पीक...
नगर जिल्ह्यातील १२४ गावांचे पाणी दूषितनगर  : जिल्ह्यातील २६४५ गावांचे पाणीनमुने...
बुलडाणा जिल्हा कृषी विक्रेता संघटनेच्या...बुलडाणा ः जिल्हा कृषी विक्रेता संघटनेची १४...
निफाड तालुक्यात द्राक्षबागांच्या...नाशिक  : निफाड तालुक्यातील द्राक्षबागांमध्ये...
सोलापूर जिल्हा परिषद करणार ‘रोहयो’ची...सोलापूर ः जिल्हा परिषदेच्या वतीने यंदाच्या...
भूगर्भात पाणीसाठा टिकविण्यासाठी भूमिगत...भूमिगत बंधारा बांधण्याचे काम जमिनीखाली असल्याने...
सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांत टाकली...नागपूर ः दुष्काळी मदत नाही, कर्जमाफीच्या...
वडगाव येथील पाटबंधारे कार्यालयासमोर...वडगाव निंबाळकर, जि. पुणे  ः नीरा डावा...
पुणे बाजार समितीवर पुन्हा प्रशासकीय...पुणे : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पुणे बाजार...
अळिंबी उत्पादनातून केली संकटांवर मातलोणी (जि. जळगाव) येथील अनिल माळी यांच्याकडे कृषी...