agriculture news in marathi, loksabha election at peak in Aurangabad | Agrowon

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील प्रचार शिगेला
टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 एप्रिल 2019

औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. दिग्गजांच्या सभांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना निवडून येण्यामागच्या समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे.

यंदा दुष्काळाची तीव्रता सर्वाधिक जाणवत असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात औरंगाबाद पूर्व, मध्य आणि पश्‍चिम विधानसभा मतदारसंघ हे शहरी; तर कन्नड-सोयगाव, गंगापूर-खुलताबाद, वैजापूर हे मतदासंघ ग्रामीण भागाचा मोठ्या प्रमाणात समावेश असलेले विधानसभा मतदारसंघ येतात. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एकूण १८ लाख ५७ हजार ६४५ मतदार आपल्या मतदानाचा हक्‍क या निवडणुकीत बजावणार आहेत. 

औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. दिग्गजांच्या सभांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना निवडून येण्यामागच्या समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे.

यंदा दुष्काळाची तीव्रता सर्वाधिक जाणवत असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात औरंगाबाद पूर्व, मध्य आणि पश्‍चिम विधानसभा मतदारसंघ हे शहरी; तर कन्नड-सोयगाव, गंगापूर-खुलताबाद, वैजापूर हे मतदासंघ ग्रामीण भागाचा मोठ्या प्रमाणात समावेश असलेले विधानसभा मतदारसंघ येतात. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एकूण १८ लाख ५७ हजार ६४५ मतदार आपल्या मतदानाचा हक्‍क या निवडणुकीत बजावणार आहेत. 

शिवसेना-भाजप, रासप, रिपाइं (आ.) युतीच्यावतीने विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्यावतीने आमदार सुभाष झांबड, वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आमदार इम्तियाज जलील, तर अपक्ष म्हणून हर्षवर्धन जाधव निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या प्रमुख चर्चेतील उमेदवारांशिवाय इतर १९ मिळून २३ उमेदवार या निवडणुकीत आपले भाग्य आजमावीत आहेत. 

दिग्गजांच्या सभांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत चांगलीच रंगत आणली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत औरंगाबादेत महायुतीचा मेळावा झाल्यानंतर निवडणुकीच्या वातावरणाने जोर धरला. युतीच्यावतीने मुख्यमंत्री फडणवीस, आदित्य ठाकरे यांच्या सभा झाल्या आहेत. दुसरीकडे वंचित आघाडीचे असदुद्दीन ओवेसी दोन दिवसांपासून औरंगाबाद शहरात तळ ठोकून आहेत. शुक्रवारी (ता. १९) सायंकाळी औरंगाबादेत शिवसेनेच अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची, तर वंचित बहुजन आघाडीच्यावतीने ॲड. बाळासाहेब आंबेडकर व असदुद्दीन ओवेसी यांची संयुक्‍त सभा होत आहे. या सभांकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. 

आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना कोणता मुद्दा यावेळच्या निवडणुकीत जास्त परिणाम करणार याच्याही चर्चा रंगू लागल्या आहेत. प्रचाराला दोन दिवस बाकी असतानाच प्रमुख राजकीय पक्षांकडून दिग्गज नेत्यांच्या सभांचे आयोजन करण्याचेही नियोजन केले गेले आहे. येत्या २३ एप्रिलला औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी प्रत्यक्ष मतदान होणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
फळबाग लागवड योजनेवर ग्रामसेवकांचा...चिपळूण, जि. रत्नागिरी ः महाराष्ट्र ग्रामसेवक...
‘रिसॅट-२ बी'चे उपग्रहाचे यशस्वी...श्रीहरीकोट : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो...
‘कृष्णामाई’चा कर्नाटकातील काठ तहानला;...कोल्हापूर : कृष्णा नदीवर अवलंबून असणाऱ्या कर्नाटक...
जळगावात लिंबू २२०० ते ५००० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
देशभरात ७२४ महिला उमेदवारांचे भवितव्य...नवी दिल्ली : देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा...
गारपिटीनंतर द्राक्ष बागेची अधिक काळजी...द्राक्ष बागेमध्ये वाढीच्या विविध अवस्थेमध्ये...
अमरावती : नाफेडने अचानक केली तूरखरेदी...अमरावती : ऑनलाइन नोंदणी केलेल्या दहा टक्‍के...
बुलडाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईबुलडाणा ः गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच...
दुष्काळात संत्रा बागेला टँकरच्या...अकोला ः दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्याला चौफेर...
खानदेशात सौर कृषिपंप योजनेतून लवकरच पंप...जळगाव ः सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मिरज, तासगावसह सिंधुदुर्गात पाऊससिंधुदुर्ग, सांगली : विजांच्या कडकडाटांसह...
मराठवाड्यात नवीन खासदारांबाबत उत्कंठानांदेड : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांतील...
कोल्हापूर, सांगलीत निकालाची उत्सुकता...सांगली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता....
सोलापूर, माढ्याच्या निकालाकडे देशाचे...सोलापूर : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात ७५...परभणी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे...
यसनी तोडून पुढे या : रमेश घोलपसोलापूर  : "परिस्थितीने बांधलेल्या यसनी तोडत...
पुणे विभागासाठी साडेपाच कोटींवर वृक्ष...पुणे  ः पर्यावरणाचे संतुलन अबाधित...
सोयाबीन उत्पादकांना पीकविम्याची रक्कम...मुंबई  : शासनाच्या विशेषतः कृषी विभागाच्या...
आमदार निधीतून दुष्काळग्रस्त भागासाठी...मुंबई  ः दुष्काळग्रस्त भागातील जनतेला आमदार...
साडेचौदा टन केशर, बदामी आंबा...मुंबई : वातावरण नियंत्रित करून फळाचे...