agriculture news in marathi, lokshahi din, Mantrayala, Mumbai | Agrowon

जमिनीवर परस्पर फेरफारप्रकरणी ग्रामसेवक, उपसरपंचाविरुद्ध तक्रार
टीम अॅग्रोवन
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

मुंबई : उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या जमिनीवर परस्पर फेरफार करून इतरांची नोंद केल्याप्रकरणी संबंधित ग्रामसेवक आणि उपसरपंचाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आल्याचे महसूल विभागाने मंत्रालयात लोकशाही दिनात स्पष्ट केले.

मुंबई : उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या जमिनीवर परस्पर फेरफार करून इतरांची नोंद केल्याप्रकरणी संबंधित ग्रामसेवक आणि उपसरपंचाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आल्याचे महसूल विभागाने मंत्रालयात लोकशाही दिनात स्पष्ट केले.

मंत्रालयात दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणाऱ्या ऑनलाइन लोकशाही दिनात राज्यातील सामान्य नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत त्यावर तातडीने मार्ग काढला जातो. उस्मानाबादच्या चनबसप्पा घोंगडे यांना काल हा अनुभव आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या लोकशाही दिनात १२ जणांच्या तक्रारींची दाखल घेऊन त्यावर सुनावणी करण्यात आली. श्री. घोंगडे यांची लोहारा जिल्हा उस्मानाबाद येथे जमीन आहे. त्यांच्या मालकीच्या जमिनीवर बनावट कागदपत्रे तयार करून प्लॉटची नोंद झाल्याबाबत त्यांनी तक्रार दाखल केली होती.

या संदर्भात केलेल्या कारवाईबाबत महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी माहिती देताना सांगितले, की या प्रकरणी केलेल्या चौकशीत तथ्य आढळल्याने फेरफार रद्द करण्यात आले असून, गाव नमुन्यावर चुकीच्या नोंदी घेणाऱ्या ग्रामसेवक व उपसरपंचाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे, आपल्या तक्रारीवर झालेली कारवाई ऐकून श्री. घोंगडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली आणि तालुका स्तरावरच न्याय मिळाल्यास चांगले होईल, अशी प्रतिक्रियादेखील त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून व्यक्त केली.

लोकशाही दिनात लातूर, नांदेड, पालघर, वाशीम, सिंधुदुर्ग, धुळे, रायगड, जळगाव येथील नागरिकांच्या तक्रारींवर सुनावणी करण्यात आली. या वेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव मुकेश खुल्लर, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, मनीषा म्हैसकर आदी अधिकारी उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...
हिंगोली, नांदेड, परभणीत आॅनलाइन नोंदणीत...परभणी   ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
वारणा नदीवरील बंधारा दुरुस्तीमुळे...कोल्हापूर  : वारणा नदीवरील विविध बंधाऱ्यांची...
अळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...
शेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...
नांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...
पीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...
गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...
'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...