agriculture news in Marathi, long discussion of commissioner with protester, Maharashtra | Agrowon

पीककापणी प्रयोग प्रकरणी आंदोलकांसोबत आयुक्तांची चर्चा
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 1 नोव्हेंबर 2018

पुणे : शेतकऱ्यांच्या पिकांचे खोटे पीककापणी प्रयोग प्रकरणी सांख्यिकी विभागाविरोधात उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन कृषी आयुक्तांनी चर्चेत केले. मात्र, कोणतीही कारवाई होत नसल्याने उपोषण सोडण्यास शेतकऱ्यांनी नकार दिला. 

पीककापणी प्रयोगात कृषी सांख्यिकी विभाग हेराफेरी करीत असल्याचे परभणीतील शेतकऱ्यांनी पुराव्यासह निदर्शनास आणले आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई आणि न्याय मिळावा या मागणीसाठी कृषी आयुक्तालयासमोर परभणीतील शेतकरी उपोषण करत आहेत. कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी या शेतकऱ्यांना आपल्या दालनात बोलावून सर्व प्रश्न समजावून घेतले.

पुणे : शेतकऱ्यांच्या पिकांचे खोटे पीककापणी प्रयोग प्रकरणी सांख्यिकी विभागाविरोधात उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन कृषी आयुक्तांनी चर्चेत केले. मात्र, कोणतीही कारवाई होत नसल्याने उपोषण सोडण्यास शेतकऱ्यांनी नकार दिला. 

पीककापणी प्रयोगात कृषी सांख्यिकी विभाग हेराफेरी करीत असल्याचे परभणीतील शेतकऱ्यांनी पुराव्यासह निदर्शनास आणले आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई आणि न्याय मिळावा या मागणीसाठी कृषी आयुक्तालयासमोर परभणीतील शेतकरी उपोषण करत आहेत. कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी या शेतकऱ्यांना आपल्या दालनात बोलावून सर्व प्रश्न समजावून घेतले.

आयुक्तांनी इतर सर्व कामकाज रद्द करून तीन तास शेतकऱ्यांशी चर्चा केली. चर्चेत शेतकरी संघटनेचे नेते कालिदास आपेट, गणेश जोगदंड पाटील, माउली कदम, शिवाजी ब्रुद्रुक, विश्वंभर गोरवे, किसनराव मुलगीर, श्रीनिवास देशमुख, विठ्ठलराव घाडगे, संदीप काळदाते यांनी सहभाग घेतला. 

‘‘पीककापणी प्रयोगात झालेल्या घोटाळ्यांबाबत आयुक्तांशी अतिशय सकारात्मक चर्चा झाली. कृषी विभागाची भूमिका चुकल्याचे त्यांच्या लक्षात आले असून, शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचे त्यांनी मान्य केले. शेतकरी पीकविम्यासाठी जोखीमस्तराच्या दोन टक्के हप्ता भरतात. उर्वरित हप्ता अनुदान केंद्र व राज्य शासन देते. हे अनुदान कंपन्यांच्या खिशात घालण्याचे काम चोखपणे सांख्यिकी विभाग करीत असल्याचे आम्ही चर्चेत स्पष्ट केले,’’ असे कालिदास आपेट यांनी सांगितले.

या राज्यात शेतकऱ्यांच्या नावाखाली पीकविमा कंपन्यांनी आपल्याच अधिकाऱ्यांच्या माध्यमातून धंदा मांडला आहे. आम्हाला एक तरी असे वर्ष दाखवा की विमा हप्ता आम्ही १००० कोटी भरला आणि वाटप मात्र १२०० कोटीचे झाले. कंपन्यांच्या भल्यासाठी ही योजना राबविली जात असल्याचे सिद्ध न झाल्यास आम्ही आंदोलन मागे घेऊ, असे आंदोलनकांनी स्पष्ट केले. आयुक्तांनी शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेत विविध विभागांना तातडीने सूचना दिल्या. ‘‘मी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. तुमचा फायदा करण्यासाठी मी प्रयत्नशील राहील. माझ्या शब्दावर तुम्ही उपोषण मागे घ्या,’’ असे आवाहन आयुक्तांनी केले. 

   दरम्यान, मुख्य आंदोलक गणेश जोगदंड पाटील व माउली कदम यांनी चर्चेनंतर सांगितले, की शेतकऱ्यांचा तळतळाट घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई आणि आम्हाला विमा भरपाई मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवले जाणार आहे. 
 

इतर अॅग्रो विशेष
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...
राजकीय उपद्रव्य मूल्य घटल्याने...मुंबई: मर्यादित जनाधार आणि राजकीय उपद्रव मूल्य...
सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावांची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ११४५...
विदेश अभ्यास दौऱ्याच्या शेतकरी यादीत...पुणे : विदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेल्या...
क्रांती कारखाना हुमणीचे भुंगेरे खरेदी...कुंडल, जि. सांगली : एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
परवानाधारक व्यापाऱ्यांनीच केळीची खरेदी...जळगाव : चोपडा बाजार समिती दरवर्षी १४...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर...पणजी : देशाचे माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे...
आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? दुष्काळ पडल्याने पाण्यासाठी बोअर घेण्याची अक्षरशा...
कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नती मिळाली, पण...पुणे : राज्यातील कृषी पर्यवेक्षकांना शासनाने मंडळ...
दुष्काळी मराठवाड्यात मार्चमध्येच ‘केसर'...केज, जि. बीड ः फळांचा राजा आंबा बाजारात...
मिरची पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार (प्रतिनिधी) ः खानदेशातील मिरचीचे आगार...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...
परभणी ठरले देशात उष्णपुणे : राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३७ अंशांच्या...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक थांबणार कधी?नाशिक: नाशिक जिल्ह्यातील मुख्य अर्थकारण...
यवतमाळच्या अनिकेतने तयार केला फवारणीचा...यवतमाळ ः फवारणीमुळे होणाऱ्या विषबाधा सर्वदूर...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर...पणजी : गेल्या एक वर्षापासून अधिक काळ...