agriculture news in Marathi, Loot of farmers in Jalgaon onion sale | Agrowon

जळगावात कांदा विक्रीत शेतकऱ्यांची लूट
टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 मे 2019

जळगाव ः कांद्याचे दर दबावात असतानाच त्याची विपणन व्यवस्था अडतदार, खरेदीदारांनी शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक स्थितीत आणून ठेवली आहे. गोणीमागे शेतकऱ्यांना सुमारे ३९ रुपये खर्च अवाजवी लागत असल्याची तक्रार एका शेतकऱ्याने केली आहे. 

जळगाव ः कांद्याचे दर दबावात असतानाच त्याची विपणन व्यवस्था अडतदार, खरेदीदारांनी शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक स्थितीत आणून ठेवली आहे. गोणीमागे शेतकऱ्यांना सुमारे ३९ रुपये खर्च अवाजवी लागत असल्याची तक्रार एका शेतकऱ्याने केली आहे. 

या शेतकऱ्याने नुकताच १५० क्विंटल कांद्याची विक्री केली. दर्जेदार कांद्याला कवडीमोल दर बाजारात मिळाल्याचे या शेतकऱ्याने सांगितले आहे. शेतकरी म्हणाला, की मी कांद्याची विक्री जळगाव बाजार समितीत टप्प्याटप्प्याने केली. आवक कमी असली तरी २८० रुपये दर आणि आवक अधिक असली तर २५० रुपये दर दर्जेदार कांद्याला मिळाले. कांदा भरण्यासाठी बारदाना लागतो. त्यात तागाची गोणी २७ रुपयाला अडतदाराने दिली. ती ४० किलो क्षमतेची होती. प्लॅस्टिकच्या दोरीच्या गोण्या घेतल्या तर या गोणीमागे ३० रुपये खर्च लागेल, असे अडतदाराने सांगितले. यामुळे तागाची गोणी घ्यावी लागली. गोणी बाजारात आणण्यासाठी प्रति १० किलोमीटरसाठी २० रुपये प्रतिगोणी असा खर्च लागला. बाजार समितीत पहाटेच लिलाव झाले. त्यात प्रत्येक गोणीचे वजन केले नाही. अडतदारांच्या तोलाईदारांनी पहिल्या १५ गोण्यांची तोलाई केली. त्याचे सरासरी वजन काढून सर्व १०० गोण्यांचे वजन गृहीत धरले. गोण्या ट्रॅक्‍टरमधून उतरविणे आणि तोलाई यापोटी प्रतिगोणी पाच रुपये ८० पैसे खर्च लावला. दर २८० रुपये प्रतिगोणी मिळाला. यातून २० रुपये वाहतूक खर्च, पाच रुपये ८० पैसे तोलाई व इतर खर्च, कटती गोणीमागे एक किलो आणि तागाच्या गोणीसाठी २७ रुपये प्रतिगोणी, असा एका गोणीमागे सुमारे ५३ रुपये खर्च लागला. अर्थातच दर २३० रुपये प्रतिगोणी, असा मिळाला. 

कांदा अडतदार परवडू देत नसल्याची स्थिती आहे. या हंगामात आठवड्यातून दोन दिवसच एक हजार ते १३०० क्विंटल आवक असते. इतर चार दिवस आवक फक्त ५०० ते ८०० क्विंटल असते. असे असतानादेखील दरवाढ होत नसल्याने नुकसान होत आहे. कांद्याचे दर किमान १२ रुपये प्रतिकिलो जागेवर (सर्व खर्च वगळून) शेतकऱ्याला मिळाला तरच तो परवडतो, त्याला काहीसा नफा मिळतो. टंचाई अधिक आहे. यामुळे मोठे श्रम कांदा उत्पादनासाठी लागले आहेत, असेही संबंधित शेतकरी म्हणाला. 

इतर बातम्या
‘वैद्यकीय' प्रवेशास मराठा आरक्षण लागू...नवी दिल्ली : वैद्यकीय आणि दंतवैद्यकीयच्या...
राज्यात सर्वदूर पावसाची हजेरी पुणे : राज्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर सर्वदूर...
अडगाव बुद्रुक येथे केली एचटीबीटी बियाणे...अकोला : अडगाव बुद्रुक (ता. तेल्हारा) येथे सोमवारी...
बदलत्या वातावरणाने घटेल भाताचे उत्पादन...भारतामध्ये वातावरण बदलामुळे निर्माण होणाऱ्या...
नगर जिल्ह्यात  ‘उन्नत शेती’बाबत...नगर ः शेतकऱ्यांना अवजारांचा लाभ मिळण्यासाठी...
मराठवाड्यातील १९८ मंडळांत पाऊसऔरंगाबाद  : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर...
धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांत...जळगाव : खानदेशात धुळे जिल्ह्यासह जळगाव,...
नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...नाशिक : जिल्ह्यात द्राक्ष, डाळिंब लागवड मोठ्या...
सांगली जिल्ह्यात पाऊस बरसलासांगली : जिल्ह्यात रविवारी (ता. २३) ठिकठिकाणी...
आठवडाभराच्या खंडानंतर पुन्हा चांगला...पुणे: राज्याच्या बहुतांशी भागात मॉन्सूनचे आगमन...
मुख्यमंत्रिपदाचे काय ठरलेय ते उद्धव...मुंबई : युतीचे काय ठरलेय ते उद्धव ठाकरे यांनी...
सोलापुरात पाऊस; पण जोर कमीसोलापूर : जिल्ह्यात रविवारी (ता. २३) रात्री...
मालेगाव बाजार समितीत ‘इतर’च्या नावाखाली...नाशिक: मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ‘इतर...
मुख्यमंत्रिपदाचे काय ठरलेय ते उद्धव...मुंबई  ः युतीचे काय ठरलेय ते उद्धव ठाकरे...
मॉन्सूनने मराठवाडा, विदर्भ व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी...
संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आज...आळंदी, जि. पुणे  ः  सुखालागी जरी करिसी...
विधान परिषदेच्या उपसभापतिपदी डॉ. नीलम...मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापतिपदी डॉ....
ठिबकसाठी केंद्राकडून २९० कोटीपुणे : राज्यातील शेतकऱ्यांना ठिबक अनुदान वाटप...
पुणे जिल्ह्यातील कोरडवाहू पट्ट्यात...पुणे   : दुष्काळाने होरपळत असलेल्या...
‘जलयुक्त’मधील गैरव्यवहाराची ‘एसीबी’...मुंबई  ः राज्यात जलयुक्त शिवार अभियानातील...