पर्जन्यवृष्टीसाठी महादेवाचा गाभारा पाण्यात

पर्जन्यवृष्टीसाठी महादेवाचा गाभारा पाण्यात
पर्जन्यवृष्टीसाठी महादेवाचा गाभारा पाण्यात

साकोरा, जि. नाशिक : नांदगाव तालुक्यातील साकोरा परिसराकडे यंदा पावसाने पाठ फिरविल्याने नागरिकांसह मुक्या पाळीव जनावरांचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर साकोरा येथील ग्रामदैवत श्री कपिलेश्वर महादेव मंदिरात महिला व बालगोपाळांनी डोक्यावर पाण्याचे हंडे घेऊन शिवलिंग असलेला गाभारा पाण्याने भरून पर्जन्यवृष्टीसाठी महादेवाला साकडे घातले.

पावसाळा सुरू होउन तब्बल दोन महिने उलटले तरी साकोरा परिसर संपूर्ण कोरडा असल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. शिवाय पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. परिसरात वरुणराजाचे आगमन व्हावे, यासाठी बुधवारी (ता. ८) भागवत एकादशीला गावातील महिला व बालगोपाळांनी उपाशीपोटी सकाळपासून डोक्यावर पाण्याचे हंडे घेऊन मंदिरातील शिवलिंग व नंदीसह गाभारा पाण्यात बुडवून ठेवला. दिवसभर हरिनामाचा गजर करत महादेवाला साकडे घालण्यात आले.

पाऊस नसल्याने परिसरात संपूर्ण व्यवहार, व्यवसाय ठप्प झाले आहेत. तसेच बळिराजा हतबल झाला असून, मजुरांना कुठलाही कामधंदा नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. जय जनार्दन भक्त परिवारातील नंदू बोरसे यांनी कपिलेश्वर महादेव मंदिराच्या प्रवेश द्वाराजवळ बुधवार (ता. १) पासून एका जागेवर बसून ‘नम:शिवाय’चा अखंड जप सुरू ठेवला आहे. दररोज सकाळी व रात्री उशिरापर्यंत कपिलेश्वर भक्त मंडळातर्फे भजन कीर्तनाचा कार्यक्रमही सुरू आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com