agriculture news in marathi, The loss to farmer due to the failure of papaya fruit | Agrowon

पपईला फळधारणा न झाल्याने शेतकऱ्याचे नुकसान
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

बुलडाणा : जिल्ह्यात नांदुरा तालुक्‍यातील मोमीनाबाद येथे सचिन काळे व सुरेश लक्ष्मण गवळे या शेतकऱ्यांनी लावलेल्या पपईला फळधारणाच झाली नाही. शिवाय लागवड केलेल्या झाडांपैकी ५० टक्के झाडे नर निघाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले अाहे. संबंधित नर्सरीचालकाने फसवणूक केली असून, नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी या शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे केली अाहे.

बुलडाणा : जिल्ह्यात नांदुरा तालुक्‍यातील मोमीनाबाद येथे सचिन काळे व सुरेश लक्ष्मण गवळे या शेतकऱ्यांनी लावलेल्या पपईला फळधारणाच झाली नाही. शिवाय लागवड केलेल्या झाडांपैकी ५० टक्के झाडे नर निघाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले अाहे. संबंधित नर्सरीचालकाने फसवणूक केली असून, नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी या शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे केली अाहे.

या वर्षी काळे व गवळे यांनी पपईची लागवड केली होती. यासाठी त्यांनी मार्च २०१७ मध्ये सोलापूर जिल्ह्यातील मोहळ येथील बोडखे रोपवाटिकेमधून प्रत्येकाने रोपे अाणली. लागवडीनंतर या रोपांना शिफारशीनुसार खते व फवारण्यासुद्धा केल्या; मात्र एवढे करूनही यातील जवळपास पन्नास टक्के झाडे ही नर जातीची निघाल्याने या झाडांना फळधारणाच झाली नाही.

मोमीनाबाद येथील दोन्ही शेतकऱ्यांनी याबाबत तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे रीतसर तक्रार केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी स्थळ पंचनामा केला. यात जवळपास ३८ टक्के झाडे ही वांझ असल्याचे नमूद केले. यामुळे या शेतकऱ्यांच्या पपई पिकाला फळधारणा होऊ न शकल्याने त्यांचे ५० टक्के नुकसान झाल्याचे स्पष्ट केले.

शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या बियाणे, रोपे, पुरवठा पावतीवर कुठल्याही जातींचा किंवा प्लॉटचा उल्लेख नसल्यामुळे मोबदला मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या. रोपवाटिकाचालकांकडे संपर्क साधला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे अाहे. बियाण्यात नर जातीच्या झाडांचा भरणा झाल्याने शेतकऱ्यांना लागलेला खर्चही निघेल की नाही याची शाश्‍वती राहिलेली नाही.

इतर बातम्या
'ईव्हीएम'ऐवजी आता मतपत्रिकांचा वापर...नवी दिल्ली : आगामी निवडणुकांमध्ये इलेक्‍...
राज-पवार भेटीने चर्चेला उधाणमुंबई : दिल्ली येथे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
कर्जमाफीचा लाभ मिळेपर्यंत व्याज माफ;...बारामती, पुणे ः "छत्रपती शिवाजी महाराज...
सांगलीतील द्राक्ष, बेदाणा उत्पादक ढगाळ... सांगली : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ...
जळगावमधील शेतकऱ्यांचा परदेश अभ्यास दौरा... जळगाव : परदेशातील शेतीचे तंत्रज्ञान, शेती,...
बुलडाणा जिल्ह्यातील ७४८ गावे... बुलडाणा : जिल्ह्यात २०१७-१८ च्या खरीप हंगामात...
टीस विद्यापीठ-एसआयआयएलसी शैक्षणिक करारपुणे : शैक्षणिक क्षेत्रातील नामांकित टाटा...
मोहरीवर्गीय आच्छादन पिके तण...तणनाशकांना प्रतिकारकता विकसित झालेली असल्याने...
बीटी बियाणे भरपूर; पण धुळपेरणी टाळापुणे : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना...
औरंगाबाद विभागात ७२ लाख ५१ हजार टन ऊस...औरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील सहा...
नाशिक जिल्ह्यातील धरणात ४६ टक्केच पाणी...नाशिक : मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात हवामानातील...
मराठवाड्यात शेततळ्यांचे पूर्णत्‍व...औरंगाबाद : मराठवाड्यात उद्दीष्टाच्या तुलनेत...
'कृषी उद्योग'मधील वादग्रस्त सूर्यगण...पुणे : महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळातील...
‘फॉस्फोनिक ॲसिड’च्या आढळाने ‘सॅंपल फेल’...पुणे : डाळिंब पिकात केवळ सातच लेबल क्लेम...
बोंड अळी, धान नुकसानग्रस्तांना मदतीसाठी...पुणे : बाेंड अळीच्या प्रादुर्भावाने नुकसान...
बेदाण्याचे यंदा तीस टक्केच उत्पादनसांगली : राज्यात दरवर्षी सुमारे २ लाख टन...
हमीभावाच्या मुद्द्यावरून गैरसमज पसरवले...नवी दिल्ली : उत्पादन खर्चावर ५० टक्के हमीभाव...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक...पुणे : राज्यावर अवकाळीचे ढग असल्याने पावसाचे सावट...
आसामी रेडकाचा ‘क्लोन’ यशस्वीहिस्सार, हरियाणा : येथील केंद्रीय म्हैस संशोधन...
राज्यात १५ लाख टन साखर उत्पादन वाढलेकोल्हापूर : राज्यात सुरू हंगामात यंदा अंदाजपेक्षा...