सातारा-लातूर महामार्गाच्या कामामुळे शेतपिकांचे नुकसान

सातारा-लातूर महामार्गाच्या कामामुळे शेतपिकांचे नुकसान
सातारा-लातूर महामार्गाच्या कामामुळे शेतपिकांचे नुकसान

सोलापूर  : सातारा-लातूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देताच सुरू आहे. त्यामुळे शेती पिकांचे नुकसान होत असून, त्या संदर्भात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची नुकतीच भेट घेतली. परंतु, आपण कोणत्याही प्रकारचा आदेश दिला नसून, संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटावे, असा सल्ला त्यांनी दिल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे या कामासाठी शेतकऱ्यांचा विरोध असतानाही पोलिस बंदोबस्तात काम करून शेतकऱ्यांवर जबरदस्ती केली जात असल्याचा प्रकारही समोर आला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर भागांतून सातारा-लातूर हा महामार्ग जातो आहे. गेल्या काही दिवसांपासून या रस्त्याच्या कामाबाबत सातत्याने शेतकऱ्यांना त्रास दिला जातो आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतपिकातून सर्रास जेसीबी आणि अन्य वाहने घालून जमीन संपादित केली जात आहे. माळशिरस भागातील रस्त्याच्या कामाला शेतकऱ्यांकडून विरोध करण्यात येत असूनही त्यांच्या मागणीचा विचार न करता पोलिस बंदोबस्तात काम करण्यात येत आहे. या कामामुळे शेतकऱ्यांची शेतातील फळझाडे, ऊस यांसह अन्य पिकांचे नुकसान करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ शेतकऱ्यांच्या हक्‍काच्या जमिनीचा व नुकसान झालेल्या पिकांची भरपाई द्यावी, अन्यथा  बेमुदत उपोषण करू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. त्यासाठीच शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांचीही भेट घेतली, पण त्यांनीही हा विषय आपल्या अधिकारातील नसल्याचे सांगत माघारी पाठवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.

रस्त्याचे काम केंद्र सरकारच्या निर्देशानुसार सुरू आहे. रस्त्याच्या कामाला विरोध करण्याऐवजी शेतकऱ्यांनी शासनाकडे मदतीची मागणी करावी, असे एमएसआरडीसी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com