agriculture news in marathi, low depression goving to be normal | Agrowon

कमी दाबाचे क्षेत्र निवळणार; रविवारपासून कोरडे हवामान
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 16 मार्च 2018

पुणे : अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता कमी होत आहे. शुक्रवारी (ता. १६) सकाळपर्यंत हे क्षेत्र पूर्णपणे निवळणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. तर राज्यात बहुतांशी ठिकाणी गुरुवारी दिवसभर ढगाळ हवामान होते. कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पडल्या. शनिवारपर्यंत (ता. १७) राज्यात हलक्या पावसाची शक्यता अाहे. तर रविवारपासून राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

पुणे : अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता कमी होत आहे. शुक्रवारी (ता. १६) सकाळपर्यंत हे क्षेत्र पूर्णपणे निवळणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. तर राज्यात बहुतांशी ठिकाणी गुरुवारी दिवसभर ढगाळ हवामान होते. कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पडल्या. शनिवारपर्यंत (ता. १७) राज्यात हलक्या पावसाची शक्यता अाहे. तर रविवारपासून राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

दरम्यान, कोकणात अांबा, काजू आदी फळपिकांसह कोल्हापुरातील भाजीपाला पिकांना पाऊस आणि ढगाळ हवामानाचा काही प्रमाणात फटका बसला. रब्बीतील काढणीच्या असवस्थेतील पिकांनाही फटका बसला.

अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटाजवळ कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होते. वायव्य दिशेकडे सरकून शुक्रवारी ते निवळून जाणार आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील चक्राकार वाऱ्यांची स्थिती विरून गली होती. पुढील दोन दिवस राज्यात ढगाळ हवामान राहणार असून, तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. बुधवारी रात्री कोकणातील लांजा, कुडाळ, सावंतवाडी, कोल्हापुरातील करंजफेन, मलकापूर, अंबा, गगनबावडा, साळवण येथे पावसाच्या सरी कोसळल्या, तर गुरुवारी सकाळी पुण्यातील मावळ, मुळशी हवेली तालुक्यात पावसाचा शिडकावा झाला. ढगाळ हवामानामुळे तापमानात घट होत असून, गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये भिरा येथे राज्यातील उच्चांकी ४०.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

गुरुवारी (ता. १५) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३५.५, जळगाव ३६.७, कोल्हापूर ३६.१, महाबळेश्वर २९.४, मालेगाव ३६.६, नाशिक ३३.३, सांगली ३६.१, सातारा ३६.६, सोलापूर ३८.७, मुंबई ३४.२, रत्नागिरी ३४.८, डहाणू ३४.४, भिरा ४०.३, औरंगाबाद ३६.०, परभणी ३९.१, नांदेड ३८.०, अकोला ३९.५, अमरावती ३७.२, बुलडाणा ३६.६, चंद्रपूर ३७.५, गोंदिया ३७.५, नागपूर ३८.८, वर्धा ४०.०, यवतमाळ ३७.५. 

इतर अॅग्रो विशेष
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...
राजकीय उपद्रव्य मूल्य घटल्याने...मुंबई: मर्यादित जनाधार आणि राजकीय उपद्रव मूल्य...
सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावांची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ११४५...
विदेश अभ्यास दौऱ्याच्या शेतकरी यादीत...पुणे : विदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेल्या...
क्रांती कारखाना हुमणीचे भुंगेरे खरेदी...कुंडल, जि. सांगली : एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
परवानाधारक व्यापाऱ्यांनीच केळीची खरेदी...जळगाव : चोपडा बाजार समिती दरवर्षी १४...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर...पणजी : देशाचे माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे...
आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? दुष्काळ पडल्याने पाण्यासाठी बोअर घेण्याची अक्षरशा...
कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नती मिळाली, पण...पुणे : राज्यातील कृषी पर्यवेक्षकांना शासनाने मंडळ...
दुष्काळी मराठवाड्यात मार्चमध्येच ‘केसर'...केज, जि. बीड ः फळांचा राजा आंबा बाजारात...
मिरची पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार (प्रतिनिधी) ः खानदेशातील मिरचीचे आगार...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...