agriculture news in marathi, low rate for mung, black gram, varhad, maharashtra | Agrowon

वऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय हमीभावापेक्षा कमी दर
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

अकोला  ः या हंगामात लागवड झालेल्या मूग, उडदाची मागील १५ दिवसांपासून सर्वच बाजार समित्यांमध्ये आवक वाढलेली आहे. परंतु एकाही ठिकाणी शासनाने जाहीर केलेला हमीभाव या शेतीमालांना मिळत नसल्याची वस्तुस्थिती असून शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. असे असतानाही अजूनपर्यंत हमीभाव खरेदी केंद्र सुरू होण्याची निश्‍चित तारीख जाहीर झालेली नाही. शेतकऱ्यांना पर्याय नसल्याने बाजार समित्यांमध्ये मुगाची ४ हजार ते ५२०० रुपये आणि उडिदाची ३८०० ते ४१०० रुपये दराने विक्री होते आहे. हमीभावापेक्षा मुगाला १७०० रुपये तर उडदाला १५०० रुपये कमी भाव मिळत आहे.
 

अकोला  ः या हंगामात लागवड झालेल्या मूग, उडदाची मागील १५ दिवसांपासून सर्वच बाजार समित्यांमध्ये आवक वाढलेली आहे. परंतु एकाही ठिकाणी शासनाने जाहीर केलेला हमीभाव या शेतीमालांना मिळत नसल्याची वस्तुस्थिती असून शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. असे असतानाही अजूनपर्यंत हमीभाव खरेदी केंद्र सुरू होण्याची निश्‍चित तारीख जाहीर झालेली नाही. शेतकऱ्यांना पर्याय नसल्याने बाजार समित्यांमध्ये मुगाची ४ हजार ते ५२०० रुपये आणि उडिदाची ३८०० ते ४१०० रुपये दराने विक्री होते आहे. हमीभावापेक्षा मुगाला १७०० रुपये तर उडदाला १५०० रुपये कमी भाव मिळत आहे.
 

या हंगामात अकोला, बुलडाणा, वाशीम या तीन जिल्ह्यांमध्ये मुगाची सुमारे ६० हजार तर उडदाची सुमारे ५८ हजार हेक्‍टरवर लागवड झाली होती. मुगाची हेक्‍टरी उत्पादकता ५ क्विंटल गृहीत धरली तर या जिल्ह्यांमध्ये ३ लाख क्विंटल आणि उडदाचे हेक्‍टरी चार क्विंटल उत्पादन गृहीत धरता सुमारे अडीच लाख क्विंटलपर्यंत उत्पादन अपेक्षित आहे.

सप्टेंबरच्या मध्यापासून मुगाची व त्यानंतर काहीच दिवसांनी उडदाची बाजारपेठांमध्ये आवक सुरू झाली. मोठ्या बाजार समित्यांमध्ये मुगाची सरासरी २०० ते ४०० क्विंटल आणि उडदाची १०० क्विंटलपर्यंत आवक झाली. अकोल्यात या महिन्यातील दहा दिवसांत चार हजार क्विंटल मूग विक्री झाला. मुगाला किमान ४२०० रुपये तर कमाल ५४०० रुपये दर मिळाला. जास्तीत जास्त दर हा सुद्धा हमीभावापेक्षा कमी आहे. या दोन्ही दरांमध्ये १५७५ रुपयांची तफावत आहे. विक्री झालेल्या सर्वच मुगाला हा जास्तीत जास्त दर मिळालेला नाही. या दहा दिवसांत विक्री झालेल्या मूग उत्पादकांना लाखोंचा फटका बसला. प्रत्येक बाजार समितीत अशाच प्रकारची स्थिती आहे.

हमीभावाने खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणीची शासनाने गेल्या महिन्यात २५ सप्टेंबरला घोषणा केली. त्यानंतर आठवडाभर नोंदणी प्रक्रीया सुरू व्हायला वेळ लागला. वाशीम जिल्ह्यात तर या आठवड्यात नोंदणीला मुहूर्त मिळाला. आता मूग, उडदाची ही नोंदणी २४ ऑक्‍टोबरपर्यंत केली जाणार असल्याचे सांगितले जाते. सोयाबीनची नोंदणी तर बहुतांश केंद्रांनी ऑक्‍टोबरचा दुसरा आठवडा लोटला तरी सुरू केली नव्हती.

यावर्षी तीनही जिल्ह्यांत उद्दिष्टाच्या सरासरी ३० टक्केसुद्धा खरीप पीककर्ज वितरित झालेले नाही. शिवाय रब्बी हंगाम तोंडावर आलेला आहे. उत्पादनही अपेक्षित आलेले नाही. अशा पेचात शेतकरी अडकला असून तो पिकवलेला शेतीमाल मिळेल त्या भावात विकून मोकळा होत आहे. शेतकऱ्यांना हमीभाव खरेदी केंद्रे सुरू होण्याची प्रतीक्षा करायलाही वेळ नाही. या तीन जिल्ह्यांतील बाजार समित्यांमध्ये दररोज मिळून किमान दोन हजार क्विंटल मूगाची कमी दरात विक्री होत आहे. तर हजार क्विंटलपर्यंत उडीद विकला जात आहे. दोन्ही शेतमाल उत्पादकांचे दररोज लाखोंचे नुकसान सुरू आहे.

इतर ताज्या घडामोडी
सागरी नत्र साखळीतील महत्त्वाच्या...सागरी पाण्यातील अमोनिया ऑक्सिडेशन करणारे...
पुणे जिल्ह्यात ३७ लाख ३३ हजार टन ऊस...पुणे ः पुणे जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांचा गळीत...
नांदेड विभागात २८ लाख क्विंटल साखरेचे...नांदेड ः नांदेड येथील प्रादेशिक साखर सहसंचालक...
जतला पाणी देण्यास कर्नाटकचे मुख्यमंत्री...जत, जि. सांगली ः तुबची बबलेश्वर (कर्नाटक)...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ३०० ते १२००...सोलापुरात सर्वाधिक दर ८०० रुपये सोलापूर ः...
दुष्काळात बॅंकांची सक्तीची वसुली थांबवा...बुलडाणा ः सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे...
सव्वाआठ रुपये दर मिळाला तरच पपईची विक्रीजळगाव  : खानदेशात पपई उत्पादकांना सव्वाआठ...
केळी दरांची अंमलबजावणी होईनाजळगाव : खानदेशात केळीच्या दरांबाबत दबाव...
मराठा आरक्षण : ज्येष्ठ विधिज्ञ हरीश...मुंबई : राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि...
जिनिंग मालकाने शेतकऱ्याला घ्यायला लावली...वर्धा : एका हातात पाण्याचा ग्लास आणि दुसऱ्या...
स्वतंत्र भारत पक्षाकडून ‘आपले सरकार’चा...नगर : राज्यात आणि देशात शेतकऱ्यांची लूट करणारे...
ढगाळ वातावरण, भुरीच्या धोक्याकडे लक्ष...बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वादळाचा परिणाम...
पीकविम्याच्या हप्त्याची वेळ अत्यंत...हवामानातील विविध घटकांमुळे पिकांचे अनेक वेळा...
खानदेशात रब्बीचे ७९ टक्के क्षेत्र नापेरजळगाव :खानदेशात रब्बी पिकांमध्ये मका, गव्हाची...
फरदड कपाशीचे उत्पादन टाळावे ः कुलगुरू...नांदेड ः आगामी खरीप हंगामामध्ये कपाशीवर गुलाबी...
पायाभूत सुविधांअभावी रेशीम उत्पादक...बीड : रेशीम कोष उत्पादन वाढीसाठी महारेशीम अभियान...
‘एफआरपी’ थकविलेल्या कारखान्यांना दणकाकोल्हापूर : हंगाम सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी...
अकोल्यात ‘अात्मा’ शेतकरी सल्लागार...अकोला ः शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोचवण्‍...
भंडारा जिल्ह्यातील भूजल पातळी खोलभंडारा : जिल्ह्यात सामान्य पर्जन्यमानाच्या...
साताऱ्यात गवार प्रतिदहा किलो ३०० ते ४५०...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...