पुणे जिल्ह्यात धीम्यागतीने बियाणांचा पुरवठा

पुणे जिल्ह्यात धीम्यागतीने बियाणांचा पुरवठा
पुणे जिल्ह्यात धीम्यागतीने बियाणांचा पुरवठा

पुणे : गेल्या आठवड्यापासून शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. सध्या बियाणे कंपन्याकडून धीम्यागतीने बियाणांचा पुरवठा सुरू आहे. जिल्ह्यातील अनेक दुकांनात बियाणांना पुरवठा झाला नसल्याची माहिती असून, ऐन खरिपाच्या तोंडावर बियाण्यांचा तुटवडा निर्माण होऊन, नये अशी मागणी शेतकऱ्यांनी केली अाहे.   यंदा पुणे जिल्ह्यात दोन लाख ३० हजार ८२६ हेक्टरवर पेरणी होण्याची शक्यता आहे. चांगल्या पावसामुळे खरिपाचे क्षेत्र वाढण्याचे अंदाज गृहीत धरून कृषी विभागाने २६ हजार ६८७ क्विटंल बियाणांची मागणी नोंदविली आहे. यामध्ये खासगी कंपन्या, सार्वजनिक विभाग आणि महाबीजकडून बियाणांचा पुरवठा सुरू आहे. सध्या अवघा ११ हजार ६०० क्विंटल म्हणजेच ४४ टक्के बियाणांचा पुरवठा झाला आहे. यामध्ये सोयाबीन, ज्वारी, मका, मूग, उडीद, भात या बियांणाचा समावेश आहे.  खरिपात तृणधान्याची खरीप भात, खरीप ज्वारी, बाजरी, रागी, मका या पिकांची पेरणी शेतकरी करतात. कडधान्यामध्ये तूर, मगू, उडीद, तर गळीतधान्यामध्ये भूईमूग, खरीप तीळ, कारळा, सूर्यफूल, सोयाबीन या पिकांची शेतकरी पेरणी करतात. गेल्या वर्षी भाताची ५९ हजार ४४५ हेक्टरवर पेरणी झाली होती. त्यामध्ये यंदा पाच हजार ३५५ हेक्टरने वाढ होणार आहे. भातापाठोपाठ यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यासाठी बियाणांचा वेळेवर पुरवठा होण्याची गरज आहे. सध्या भाताचे ४०-५० टक्के, तर सोयाबीनचा अत्यल्प बियाणांचा पुरवठा झाला असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.   पिकनिहाय बियाणांचा झालेल पुरवठा  ः (क्विटंलमध्ये) : खरीप ज्वारी २०, संकरित बाजरी ५२८, सुधारित बाजरी २३२, भात ७१५१, मका २५५, तूर ४०, मूग ८२, उडीद ३९, भूईमूग ८२, सूर्यफूल ६, सोयाबीन ३२२७, हिरवळीचे २० 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com